ताज्या

Maha Shivratri 2022: देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई …

Read More »

“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

नागरिकांनी संयम ठेवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून …

Read More »

Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रहमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रहमण्यम स्वामींनी उपस्थित केलाय. रशिया हा ब्रिक्स देशांचा …

Read More »

Snake Island: रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती

युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवशी रशियन नौदलासोबतच्या संघर्षात काय घडलंय हे सांगण्यात आलंय. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय. बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं …

Read More »

रशियाचा दोन शहरांवर ताबा ; युक्रेनशी शांतता चर्चेची पहिली फेरी निष्फळ, दुसरी लवकरच

किव्ह :राजधानी किव्हसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.    रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही …

Read More »

मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवला! सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रमांचा इतिहास जाणीवपूर्वक दडविण्यात आला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे केले. दीपा मंडलिक लिखीत ‘पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे’ पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पुरातत्व वेत्ते आणि मूर्तीशास्त्र व मंदिरांचे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र प्रकाशनने हे पुस्तक …

Read More »

लतादीदी आदर्श जीवनाचा वस्तुपाठच ! सरसंघचालक मोहन भागवत यांची भावना

पुणे : देवदत्त स्वर लाभलेल्या लतादीदींचे अस्तित्व चिरंतन आहे. खडतर जीवनाचा धैर्याने सामना केलेल्या लतादीदी या आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच होत्या. त्यांचा हा वस्तुपाठ आपण आचरणात आणू शकलो तर ते आचरण हीच लतादीदींच्या अस्तित्वाची खूण असेल, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लता मंगेशकर यांना  श्रद्धांजली अर्पण केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत …

Read More »

शहरातील २५ बोगस मजूर संस्थांची बँक खाती सील ; आर्थिक गुन्हे विभागाकडून कारवाई

संदीप आचार्य, निशांत सरवणकर, लोकसत्ता मुंबई : मुंबै बँकेतील कथित घोटाळय़ाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीअंतर्गत शहरातील २५ मजूर संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहेत. संचालक मंडळाने एकाच दिवशी मंजुरी दिलेल्या ७४ मजूर संस्था बोगस असल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यापैकी सुमारे सात-आठ प्रकरणांत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका प्रकरणात आरोपपत्र दाखल …

Read More »

मेट्रोसाठी ६२५० कोटींची तरतूद ; ‘एमएमआरडीए’चा १८,४०४.६३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या १८,४०४.६३ कोटी रुपयांच्या सुमारे ७६७९.९३ कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. नगर विकास मंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ िशदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी ६,२५० कोटी रुपयांची अशी भरीव तरतूद करण्यात आली असून सागरी मार्ग, रस्ते …

Read More »

लोकलमधील लससक्तीसंदर्भातील निर्णय उद्या ; निर्णयावर मुख्य सचिवांची स्वाक्षरी न झाल्याने सरकारकडून मुदतवाढीची मागणी

मुंबई : करोनावरील लशीची एकच मात्रा घेतल्यांना किंवा एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवासाची मुभा द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणखी दोन दिवसांची म्हणजेच बुधवापर्यंतची मुदत सोमवारी दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मुख्य सचिवांच्या अन्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत सतत बैठका सुरू असल्याने त्यांनी नव्या करोना निर्बंधांबाबतच्या निर्णयावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे सरकारतर्फे निर्णयासाठी …

Read More »

महामुंबईत पनवेलचे महत्त्व अनन्यसाधारण

‘पनवेलायन’ कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी परिसंवादातील सूर पनवेल :  पनवेलच्या कुशीत  होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे टर्मिनस, मेट्रो, भव्य गृहनिर्माण प्रकल्प यांमुळे पनवेल परिसराला महामुंबई क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे, असा सूर पनवेलमधील आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला. त्याच वेळी विकासाच्या कक्षा रुंदावत असताना नियोजनही काळजीपूर्वक करण्याची गरज परिसंवादात व्यक्त झाली. पनवेलच्या इतिहास वर्तमान भविष्यकाळ या तिन्हींचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता …

Read More »

मुंबईत घरविक्री कमी, तरीही महसुलात वाढ

मुंबई : करोनाचा फटका बसलेला बांधकाम व्यवसाय आता बऱ्यापैकी वधारत असल्याची बाब दिसून येत आहे. घरविक्रीची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असली तरी महसूलात मात्र चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कात सवलत असल्यामुळे घरविक्री वधारली. पण यंदा घरविक्री कमी झाली असली तरी महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम व्यवसायासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. ‘नाइट …

Read More »

रशियाबरोबरच्या निर्यात व्यवहारांवरील विम्याचे कवच कायम – ईसीजीसी

रशियातील सध्याची परिस्थिती पाहता, ईसीजीसीने रशियाच्या जोखीम हमीदारी धोरणाचा आढावा घेतला. मुंबई : रशियाला होणाऱ्या निर्यातीवरील पतविम्याचे कवच काढून घेतले नसल्याचा खुलासा निर्यात पतहमी महामंडळ अर्थात ईसीजीसीने सोमवारी केला. या संबंधाने विविध माध्यमांनी दिलेले वृत्त चुकीचे असल्याचा मंडळाने दिलेला निर्वाळा हा भारतीय निर्यातदारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ईसीजीसी हे निर्यात प्रोत्साहन मंडळ असून, भारतीय निर्यातदारांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी ते त्यांनी निर्यात …

Read More »

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : स्मृतीची प्रकृती स्थिर

रॅनिओरा (न्यूझीलंड) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मानधनाच्या डोक्यावर चेंडू आदळला. त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले होते. मात्र, तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी दिली. आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला उसळणारा चेंडू डावखुऱ्या स्मृतीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर भारतीय संघाच्या डॉक्टरांनी …

Read More »

अग्रलेख : धोरण आणि धारणा!

‘पुतिन यांच्यामुळे आपले भले होत असेल तर कशाला बोला त्यांविरोधात’ अशी मध्यममार्गी लबाडीच जर्मन राजकारण्यांनी मुत्सद्देगिरी म्हणून खपवलेली नाही.. ‘‘धारणा बदलली की धोरणात बदल करणे अपरिहार्य असते’’ असे अत्यंत सैद्धांतिक म्हणावे असे विधान जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेअरबॉक यांनी त्या देशाच्या बुंडेश्टॅगमध्ये –  म्हणजे त्यांच्या संसदेत – करणे यास फार महत्त्व आहे. याचे कारण बेअरबॉक या ‘ग्रीन पार्टी’च्या. पर्यावरण या विषयास …

Read More »

समोरच्या बाकावरून : उत्तर प्रदेशच्या लोकांना कोणी निराश केले?

पी. चिदम्बरम प्रचार कोणीही, कसाही करो- उत्तर प्रदेशाची सद्य:स्थिती काय आहे? इथल्या तरुणांना स्थलांतराशिवाय पर्याय का नाही आणि इथल्या बालकांचे आरोग्य कसे आहे? शिक्षणाची स्थिती कशी आहे? याची वस्तुनिष्ठ उत्तरे मिळू शकतात.. उत्तर प्रदेश हे राज्य राजकीय आणि आर्थिक पातळीवर विकसित, यशस्वी ठरेल असे सगळे  गुणधर्म इथल्या मातीत आहेत. या राज्याकडे  विस्तीर्ण  (२४३,२८६ चौ.कि.मी.)  अशी जमीन आहे. राज्याची लोकसंख्या (२०४ दशलक्ष …

Read More »

उन्हाळी कांद्याच्या लागवडीत ३० टक्के वाढ

चार-पाच महिने दरवाढीची शक्यता नसल्याने ग्राहकांना दिलासा एप्रिल महिन्यात वखारीत साठवणूक पुणे, नाशिक : लाल कांद्याला अवकाळी पावसाने तडाखा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता उन्हाळी कांद्याचा (गरवी) हंगाम सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात गरवी कांद्याच्या लागवडीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, बाजारात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात प्रतििक्वटलमागे ३५० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. पुढील चार ते पाच महिने कांदा दरात वाढ …

Read More »

‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमांतर्गत खास कार्यक्रम

ठाण्यात गुरुवारी ‘लता : एक आठवण’ ठाणे: ज्या स्वरांनी गेली आठ दशके जगावर आपली जादू पसरवली, ज्या स्वरांनी प्रत्येकाला जगण्याचे बळ दिले आणि ज्या स्वरांवर प्रत्येकाने मन:पूत प्रेम केले, त्या स्वरांचा आठव येत्या गुरुवारी एका विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता अभिजात’ या उपक्रमांतर्गत जागतिक कीर्तीच्या कलावंत भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या निवडक गीतांचा ‘लता : एक आठवण’ हा खास …

Read More »

ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्राकडे नागरिकांचा ओढा

बांबू पुलाऐवजी लाकडी पुलाची उभारणी लवकरच नवी मुंबई : खाडी किनारा आणि जैवविविधता यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. पक्षीप्रेमींना बोटीने खाडीसफरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता दिवसेंदिवस नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरणप्रेमी, पर्यटकांचा या केंद्राकडे ओढा वाढत आहे. करोनाच्या अनुषंगाने बंद ठेवण्यात आलेले हे केंद्र फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू …

Read More »

नवाब मलिक पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या प्राकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे शुक्रवारी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुल्र्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांना ३ मार्चपर्यंत सक्तवसुली संचलनालय (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने त्यांना बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात नेले. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारीला सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते0. नवाब मलिक …

Read More »