“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक


नागरिकांनी संयम ठेवायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंग पुढे म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं.

हेही वाचा :  Video: भारत-चीन सीमेवर उणे तापमानात बर्फावर ITBP जवानांची रंगवला कबड्डीचा सामना | Video: ITBP jawans play Kabaddi match on snow on minus temperature on Indo-China border

भारतीय नागरिकांना युद्धभूमीतून परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत चार मंत्र्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजीजू आणि निवृत्त जनरल व्ही. के. सिंग हे चार मंत्री या मोहिमेवर जाणार आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …