ताज्या

आचार्य चाणक्य नुसार ‘या’ ४ गोष्टी माणसाला घेऊन जाऊ शकतात यशाच्या शिखरावर, जाणून घ्या

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही विशेष गुण सांगितले आहेत जे माणसाला श्रेष्ठ बनवतात आणि त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातात. महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. चाणक्यजींनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की …

Read More »

विश्लेषण : देशाच्या रक्षणासाठी युक्रेनचे खेळाडू रणभूमीवर!

युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे प्रशांत केणी रशियाने केलेल्या आक्रमणानंतर एकीकडे देशवासी खेळाडूंकडून टीका होत असताना युक्रेनमधील क्रीडाक्षेत्रातील आजी-माजी ताऱ्यांना हाती शस्त्र घेणे, हेच आद्यकर्तव्य वाटत आहे. त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी बॉक्सर व्हिटाली आणि व्लादिमिर क्लिट्स्को बंधू, व्हॅसिली लोमाशेन्को, लेकसँड्र युसिक, सर्जी स्टॅखोवस्की या युक्रेनच्या खेळाडूंसह ड्नीप्रो फुटबॉल क्लब रणभूमीवर उतरला आहे. यात देशातील प्रतिष्ठित …

Read More »

मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप

तिथे आमचा जीवही जाऊ शकत होता, असं प्रचीतीने सांगितलं. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने …

Read More »

ठाणे : शेअर बाजारातून अधिक परतावा देतो सांगून व्यवसायिकाला घातला ४० लाखांचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २५ टक्के जादा परतावा मिळेल असे सांगून एका भामट्याने वागळे इस्टेट भागातील एका व्यवसायिकाची ४० लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वागळे इस्टेट येथील समतानगर परिसरात व्यवसायिक राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एका समाजमाध्यमावर जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २५ टक्के …

Read More »

LIC आयपीओचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचं लक्ष

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक वाईट बातमी आहे. बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे त्रस्त झालेले सरकार LIC चा IPO पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकते. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांसाठी एक वाईट बातमी आहे. बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे त्रस्त झालेले सरकार LIC चा IPO पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आतापर्यंतच्या माहितीनुसार सरकारने मार्च अखेरपर्यंत IPO लाँच करण्याची तयारी पूर्ण केली …

Read More »

धक्कादायक! प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबार, 80 हजारांची सुपारी

प्रफुल्ल पवार / रायगड : shooting case : प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबारकरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील माणगावातील गुन्‍हयाचा छडा लागल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. मागील महिन्‍यात  माणगाव येथील मेडिकल दुकानदारावर झालेला गोळीबार (Mangaon shooting case) प्रेमप्रकरणातून झाल्‍याचे तपासात समोर आले आहे. (Shooting at the …

Read More »

“हा माझ्या आयुष्यातील…”, आकाश थोसरने केला आमिर खानसोबतचा तो व्हिडीओ शेअर

आकाश थोसरने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेता आकाश थोसर हा सैराट या चित्रपटामुळे प्रेकाश झोतात आला. आकाश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. लवकरच आकाश अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आकाश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर आमिर खानसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. …

Read More »

UP election : योगी आदित्यनाथांचं भवितव्य ठरवणारं मतदान उद्या ; सहाव्या टप्प्यात ६७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

५७ जागांसाठी मतदान होणार ; अनेक दिग्ग्जांची प्रतिष्ठा लागली पणाला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उद्या (गुरुवार) ५७ जागांसाठी मतदान होणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यासारख्या राजकीय दिग्गजांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सहाव्या टप्प्यात पूर्वांचलमधील आंबेडकर नगर ते गोरखपूरपर्यंतच्या जागांवर राजकीय संघर्ष होणार आहे. ४०३ पैकी २९२ जागांवर पाच …

Read More »

अंकिता लोखंडे पुन्हा अडकली लग्नाच्या बेडीत! पूर्ण केली आईची अपुरी इच्छा

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये सहभागी झाली आहे. अंकिता लोखंडे डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. पण आता ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये या दोघांनीही पुन्हा लग्न केलं आहे. यासोबतच अंकितानं तिच्या आईची अपुरी इच्छा देखील पूर्ण …

Read More »

TCL चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच येणार, चपातीसारखा करू शकता रोल, जाणून घ्या वैशिष्ट्य

TCL आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच करणार आहे. TCL ने दोन डिव्हाइस सादर केली आहेत. एक डिव्हाइस प्रोटोटाइप असून त्याची स्क्रीन आत आणि बाहेर करता येऊ शकते. दुसरे उपकरण फोल्ड करण्यायोग्य आहे. TCL आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच करणार आहे. TCL ने दोन डिव्हाइस सादर केली आहेत. एक डिव्हाइस प्रोटोटाइप असून त्याची स्क्रीन आत आणि बाहेर करता येऊ शकते. दुसरे …

Read More »

Mangal Gochar 2022: मंगळ ग्रहाचा शत्रू राशीत प्रवेश, ‘या’ चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे, मकर ही शनीची राशी असून …

Read More »

“महाराष्ट्र झुकणार नाही हा यांचा ठरलेला डायलॉग, पण…”, देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारवर टीका!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज्यातली १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, तुम्ही महाराष्ट्र नाही” गुरुवारपासून अर्थात उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपानं घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सरकारवर परखड शब्दांत टीका करण्यात आली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात भाजपाची काय रणनीती …

Read More »

कल्याणमधील वालधुनी भागात भटक्या श्वानाचा आठ जणांना चावा

कल्याण पूर्वेतील शिवाजीनगरमधील वालधुनी प्रभागात मंगळवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान एका भटक्या श्वानाने तासाभरात आठ जणांना चावा घेतल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. श्वान चावलेल्यांमध्ये एक दाम्पत्य, विद्यार्थी, पादचारी यांचा समावेश आहे. वालधुनी भागात भटक्या श्वानांचा वावर अधिक प्रमाणात आहे. मंगळवारी रात्री अचानक एक श्वान अचानक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना चावू लागला.  श्वान चावल्याचा आरडाओरडा झाल्यावर या भागातील रहिवासी …

Read More »

Ukraine War: जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानी विद्यार्थी घेतायत भारतीय तिरंग्याचा सहारा

युक्रेनमधून रोमानियात आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दिली माहिती ; तुर्की विद्यार्थ्यांना देखील तिरंग्याची झाली मदत रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवर हवाई हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियासमोर शरणागती पत्कारण्यास तयार नसून रशियाला प्रत्युत्तर देत आहे. परिणामी युक्रेनचं रुपांतर सध्या युद्धभूमी झाल्यासच पाहायला मिळत आहे. या युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर पडताना दिसत आहे. …

Read More »

IND vs SL : काय योग आहे..! १००व्या कसोटीत कोहलीला ‘विराट’ विक्रमाची संधी; ३८ धावा करताच…

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. मोहालीत पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपले १०० कसोटी सामने पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो १२वा भारतीय खेळाडू असेल. या सामन्यात विराट त्याच्या ८००० कसोटी धावाही पूर्ण करू शकतो. असा विक्रम करणारा कोहली हा सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कसोटीत ८००० …

Read More »

IPL 2022 नंतर रोहित ब्रिगेडसमोर असणार ‘ही’ मोहीम!

भारतीय संघ जूनच्या अखेरीस ‘या’ देशाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ यावर्षी जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयरिश संघ चार संघांचे आयोजन करेल. भारतीय संघ जूनच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळणार आहे. पहिला सामना मालाहाइड येथे होणार आहे. आयर्लंड यंदा बांगलादेशचे यजमानपद भूषवणार नाही आणि मालिका पुढील वर्षी हलवण्यात आली आहे. २६ जून रोजी मालाहाइड येथे भारत आयर्लंडविरुद्ध पहिला …

Read More »

Chamma Chamma गाण्यात उर्मिलाने मातोंडकरने घातले होते, १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९८ मध्ये ‘चायना गेट’ या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ या गाण्यामुळे उर्मिला चर्चेत आली होती. झी टिव्हीच्या रिअॅलिटी शो ‘सा रे ग म पा’मध्ये हजेरी लावली होती. सगळ्या स्पर्धकांनी गाणी गायली त्यानंतर अनन्या नावाच्या स्पर्धकाने ‘छम्मा-छम्मा’ गाणं गायलं. हे ऐकल्यानंतर उर्मिलाच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या या विषयीचा एक धक्कादायक किस्सा शेअर केला …

Read More »

Russia-Ukraine War: ऑटो आणि क्रीडा क्षेत्रानंतर अ‍ॅपल मोबाईल कंपनीचा रशियावर दबाव, बंद केली ‘ही’ सेवा

युक्रेनवरील आक्रमक भूमिकेनंतर अनेक देशांनी रशियाची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देश आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी रशियावर बंधनं लादली आहेत. ऑटो आणि क्रीडा क्षेत्रानंतकर आयफोन कंपनीने रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. युक्रेनवरील आक्रमक भूमिकेनंतर अनेक देशांनी रशियाची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देश आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी रशियावर बंधनं लादली आहेत. ऑटो आणि क्रीडा क्षेत्रानंतकर आयफोन कंपनीने रशियावर दबाव …

Read More »

सोलापूर: साखरपुड्यासाठी पुण्याला गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा; आठ लाख ५५ हजारांचे दागिने लंपास

सोलापुरमधील एका व्यापाऱ्याच्या घरावर चोरांनी आठ लाखांचा डल्ला मारल्याची घटना घडलीय. सोलापुरातील हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथे राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यात ही चोरी झालीय. चोरांनी बंगल्याचं कुलूप तोडून घरातील तब्बल आठ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आलीय. व्यापाऱ्याच्या घरामध्ये घडलेला चोरीचा प्रकार काल (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अफसर मोहम्मद शफी …

Read More »

Russia Ukraine War: खनिज तेलाचा दर शंभरी पार, सात वर्षातला उच्चांक; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडणार?

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू झाल्यापासून ज्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता. आता तीच भीती खरी ठरताना दिसत असून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या ७ वर्षांतला उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती आता १०६ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि …

Read More »