ठाणे : शेअर बाजारातून अधिक परतावा देतो सांगून व्यवसायिकाला घातला ४० लाखांचा गंडा


शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २५ टक्के जादा परतावा मिळेल असे सांगून एका भामट्याने वागळे इस्टेट भागातील एका व्यवसायिकाची ४० लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वागळे इस्टेट येथील समतानगर परिसरात व्यवसायिक राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एका समाजमाध्यमावर जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास २५ टक्के जादा परतावा मिळेल असे त्या जाहिरातीमध्ये लिहीले होते. तसेच एक मोबाईल क्रमांकही त्यामध्ये देण्यात आला होता.

व्यवसायिकाने तात्काळ संबंधित मोबाईल क्रमांकवर संपर्क साधून गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. जानेवारी महिन्यात व्यवसायिकाने संबंधित व्यक्तिच्या खात्यावर ४० लाख रुपये जमा केले. दाेन महिने उलटत असतानाही त्यांना परतावा मिळाला नव्हता. त्यानंतर व्यवसायिकाने त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधला. पण त्या व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक बंंद केला होता.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यवसायिकाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

The post ठाणे : शेअर बाजारातून अधिक परतावा देतो सांगून व्यवसायिकाला घातला ४० लाखांचा गंडा appeared first on Loksatta.

हेही वाचा :  'मविआ' - 'एमआयएम' युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता; 'एमआयएम'ला दिला स्वबळावर लढण्याचा सल्ला | Ramdas Athwale on MIM and Mahavikas aghadi government alliance recited poem - vsk 98

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

Kotak Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. …

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …