ताज्या

पूर्वी फक्त भूमिपूजन, आता प्रकल्पपूर्तीही ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

पुणे : याआधी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे, पण उद्घाटन केव्हा होणार, हे अनिश्चित असायच़े  आता मात्र प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, हा संदेश पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे जनतेत पोहोचला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस राजवटीवर नाव न घेता टीका केली. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पीएम गती-शक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा केंद्र सरकारने तयार केल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे …

Read More »

महापालिकांना एक हजार कोटी ; निवडणुकांच्या तोंडावर राज्याकडून मदत

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या सूत्रात बदल करीत नागरी लोकसंख्येला प्राधान्य देतानाच तब्बल एक हजार कोटींची विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे यातील निम्मा म्हणजेच ५१८ कोटींचा निधी केवळ मुंबई, ठाणे आणि पुण्याला देण्यात आला आहे. राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे लवकरच बिगूल वाजणार आहे. गेल्या …

Read More »

परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता परवानगी ; पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक

मुंबई :  परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि करोनाची साथ किंवा सध्याची युद्धजन्य स्थितीमुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता (इंटर्नशिप) पूर्ण करण्याची संधी देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, असे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच परदेशात इंटर्नशिप करत असलेल्या विद्यार्थ्यांना इंर्टनशिपचा उर्वरित भाग भारतातील …

Read More »

राखीव निधी वापरण्याची ‘एमएमआरडीए’वर नामुष्की ; १३०० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी

मंगल हनवते, लोकसत्ता मुंबई : श्रीमंत प्राधिकरण अशी ओळख असणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोरील (एमएमआरडीए) आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. कोटय़वधींचे प्रकल्प सुरू असताना निधी अपुरा पडत असल्याने आता एमएमआरडीएवर चक्क राखीव निधी (रिझव्‍‌र्ह फंड) वापरण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यानुसार राखीव निधीतील १३०० कोटी निधी खात्यात वर्ग करून ती वापरून प्रकल्प सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत मंजुरी देण्यात …

Read More »

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम पुन्हा मागासवर्ग आयोगाकडे?

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता मुंबई : मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्याचे काम पुन्हा राज्य मागासवर्ग आयोगाकडे देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून ओबीसींचे राजकीय मागासलेपण तपासण्यासाठी माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समर्पित आयोग नेमण्यात येत असल्याने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम पुन्हा राज्य मागासवर्ग आयोगाला  दिले …

Read More »

‘वसंतोत्सवा’त राहुल देशपांडेंच्या सुरांचा वर्षांव

मुंबई : कधी आक्रमक, कधी अलवार गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक पं. वसंतराव देशपांडे यांची गाणी, त्यांचे सूर, त्यांच्या आठवणी जागवणारा आगळावेगळा वसंतोत्सव रविवारी पुन्हा एकदा रसिकांनी अनुभवला. आपल्या चतुरस्र गायकीचा अलौकिक वारसा मागे ठेवून गेलेले लोकप्रिय गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्त रविवारी, (६ मार्च) नेहरू सेंटर वरळी येथे ‘वसंतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘वसंत एक स्मरण’ हा खास …

Read More »

निवडणुका टाळण्यासाठी मंत्रालयात दोन दिवस धावपळ

मुंबई: इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात धावपळ सुरु होती. नगरविकास, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच विधि व न्याय विभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत ही विधेयक तयार करण्याची करसत करीत होते.  राज्यातील सुमारे ५०० हून अधिक स्थानिक …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील एकाही मंत्र्याने  गेल्या सव्वा दोन वर्षांत मंत्रिमंडळांच्या बैठकांना १०० टक्के हजेरी लावलेली नसून दांडीबहाद्दरह्ण मंत्र्यांमध्ये शंकरराव गडाख, डॉ. राजेंद्र शिंगणे, उदय सामंत आघाडीवर आहेत. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. तेव्हापासून २३ डिसेंबर २०२१ पर्यंत मंत्रिमंडळाच्या ९४ बैठका झाल्या असून त्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेच सर्वाधिक बैठकांना उपस्थित होते. …

Read More »

अनधिकृत बांधकामप्रकरणी नारायण राणे यांना नोटीस

मुंबई : मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आठ मजली बंगल्याची दोन आठवडय़ांपूर्वी पाहणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. बंगल्यातील अनधिकृत बांधकाम आणि वापरात केलेला बदल याप्रकरणी राणे यांना शुक्रवारी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. बगिचाच्या जागेचे खोल्यांमध्ये रूपांतर करण्यात आल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. जुहू …

Read More »

काश्मीरमधील पत्रकारास महिन्याभरात तिसऱ्यांदा अटक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पत्रकार फहद शाह यांची शनिवारी शोपिआन न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यानंतर काही तासांतच त्यांना श्रीनगर पोलिसांकडून अन्य एका प्रकरणात अटक करण्यात आली. श्रीनगर शहरात मे २०२० मध्ये झालेल्या चकमकीच्या वृत्तांकनासंदर्भात हे प्रकरण आहे.   शोपिआन न्यायालयाने शाह यांची सुटका करण्याच्या आधी त्यांची विशेष न्यायालयाकडूनही सुटका झाली होती. आता त्यांना महिन्याभरातच तिसऱ्या वेळी अटक करण्यात आली आहे.   ३३ वर्षांचे शहा …

Read More »

एक कोटी ६४ लाख नागरिकांची दुसऱ्या मात्रेकडे पाठ; राज्यातील स्थिती, लसीकरण पूर्ण करणे आवश्यक

मुंबई : गणिती प्रारूपानुसार करोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा आयआयटी कानपूरने दिला असला तरी करोनाचे नवे उत्परिवर्तन न झाल्यास आणि लसीकरण पूर्ण केल्यास पुढील सहा ते नऊ महिने देशाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान राज्यात लसीकरणाचा जोर ओसरला असून सुमारे एक कोटी ६४ लाख नागरिकांनी दुसऱ्या मात्रेकडे पाठ फिरवली आहे. राज्यात तिसरी लाट ओसरताच लसीकरणाचे प्रमाणही घटले आहे. …

Read More »

दिल्लीत १६ मार्चपासून पर्यावरणपूरक वाहने

नागपूर : सीएनजीवरील वाहनानंतर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने शहरात आणत आहोत. ग्रीन हायड्रोजनवरील जगात रेल्वे धावत असून काही देशात कारही धावत आहे. आता हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत १६ मार्चपासून चालणार आहे. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. १२ ते १४ मार्चदरम्यान आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाची माहिती देताना रविवारी ते …

Read More »

Russia-Ukraine War : १५०० भारतीय आज परतणार

नवी दिल्ली : दीड हजारहून अधिक भारतीयांना घेऊन आठ विमाने सोमवारी युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात येतील, असे असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले.  रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनचे हवाई क्षेत्र २४ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे. युक्रेन सोडून बाहेर पडणाऱ्या भारतीयांना रुमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया व पोलंड यांसारख्या युक्रेनच्या शेजारी देशांतून विमानाने परत आणले जात आहे.  भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत २१३५ …

Read More »

६३६ पोलीस उपनिरीक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा शासन निर्णय रद्द, मॅटचा आदेश

औरंगाबाद : राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन २३० पेक्षा अधिक गुण घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना टप्प्या-टप्प्याने सेवेत सामावून घेण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने २२ एप्रिल २०१९ रोजी काढलेला अध्यादेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविला आहे. याप्रकरणाची सुनावणी मॅटचे न्या. पी. आर. बोरा व न्या. बिजयकुमार यांच्यापुढे झाली. या सुनावणीत शासन निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकारावर गदा येत …

Read More »

वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग ; कोह सामुई येथील निवासस्थानाच्या तपासणीनंतर थायलंड पोलिसांची माहिती

कोह सामुई (थायलंड) :ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचे शुक्रवारी थायलंडमधील कोह सामुई येथे निधन झाले. वॉर्न थायलंड येथे काही मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. वॉर्नच्या निधनानंतर कोह सामुई येथील निवासस्थानाची तपासणी केली असता थालयंड पोलिसांना त्याच्या खोलीतील फरशी, तसेच आंघोळीच्या टॉवेलवर रक्ताचे डाग आढळले. ‘‘आम्हाला वॉर्नच्या खोलीत मोठय़ा प्रमाणात रक्त आढळले आहे,’’ असे स्थानिक प्रांतीय पोलिसांचे प्रमुख सतित पोल्पिनित यांनी …

Read More »

विश्लेषण : सीबीआयला फरक पडतो का?

निशांत सरवणकर [email protected] एखाद्या गुन्ह्यप्रकरणी तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) संबंधित राज्याची सर्वसाधारण मंजुरी (जनरल कन्सेन्ट) असते. अशा मंजुरीची- तसेच राज्यांना ती काढून घेता येण्याच्या मुभेचीही- तरतूद कायद्यातच आहे. अशी सर्वसाधारण मंजुरी अलीकडेच मेघालय राज्याने काढून घेतली. अशी मंजुरी काढून घेणारे मेघालय हे नववे राज्य ठरले आहे. यापूर्वीच्या आठपैकी मिझोराम वगळता उर्वरित सात राज्यांत बिगरभाजप सरकारे आहेत. सीबीआयच्या …

Read More »

Pune Metro : पुणे, पिंपरी चिंचवडकरांनी मेट्रोतून प्रवासासाठी पहिल्याच दिवशी केली प्रचंड गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज की जय… गणपती बाप्पा मोरया.. जयघोष करत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी स्वत: मेट्रोमधून प्रवास करत नागरिकांना प्रवासासाठी मेट्रो खुली करून दिली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रचंड उत्साह दाखवत पहिल्याच दिवशी मेट्रोतून प्रवासासाठी मोठी गर्दी केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक …

Read More »

बीड : कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनास भीषण अपघात ; मंडळ अधिकार्‍याचा मृत्यू

तहसीलदार गंभीर जखमी ; अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवरील कारवाईसाठी गेले होते पथक अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवरील कारवाईसाठी गेलेल्या महसुल पथकाच्या वाहनास अपघात झाल्याने मंडळ अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाला. तर बीडचे तहसीलदार गंभीररित्या जखमी झाले असुन हा अपघात रविवारी पहाटे सावळेश्‍वर फाटा (ता.गेवराई) येथे घडला. अपघाताची माहिती कळताच स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा जिल्हा रुग्णालयात आले होते.  सावळेश्‍वर फाटा येथे …

Read More »

Russia Ukraine War : युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नाही – पृथ्वीराज चव्हाण

“पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांची भाषणं व उद्घटानं करत फिरत असल्याची बाब गंभीर”, असंही म्हणाले आहेत. “युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या युध्दाच्या अनुषंगाने युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या भारतातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना, मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटानं करीत फिरत असल्याची बाब गंभीर आहे.” अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज …

Read More »

कल्याण : ठेकेदारास १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक ; न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

कामगारांना रेल्वेच्या पडीक कॉटर्समध्ये डांबून ठेवून मारहाण देखील करण्यात आली होती. कल्याण पूर्व येथील रेल्वेच्या मालगाडी थांब्यावरील जमिनीला संरक्षक भिंत बांधण्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील ठेकेदाराकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजय कदम आणि एस.जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मेसर्स एस. बी. खंकाळा कंपनीच्या माध्यमातून कल्याण पूर्वकडील रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या …

Read More »