बीड : कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनास भीषण अपघात ; मंडळ अधिकार्‍याचा मृत्यू


तहसीलदार गंभीर जखमी ; अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवरील कारवाईसाठी गेले होते पथक

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवरील कारवाईसाठी गेलेल्या महसुल पथकाच्या वाहनास अपघात झाल्याने मंडळ अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाला. तर बीडचे तहसीलदार गंभीररित्या जखमी झाले असुन हा अपघात रविवारी पहाटे सावळेश्‍वर फाटा (ता.गेवराई) येथे घडला. अपघाताची माहिती कळताच स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा जिल्हा रुग्णालयात आले होते. 

सावळेश्‍वर फाटा येथे रविवारी पहाटे महसूल पथकाचे वाहन (क्र. एमएच २३ एडी ४४३५) रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळले. या अपघातात वाहनातील म्हाळसजवळा (ता.बीड) येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव (वय ३६ रा.बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबतचे बीड तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाचा समोरील भाग झाडाच्या खोडात अडकला होता. अपघात होताच आजुबाजुच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना बाहेर काढले. जखमी सुरेंद्र डोके यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमी डोके यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे रवाना केले. नितीन जाधव यांच्या मृत्युबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.

हेही वाचा :  Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्याप्रमाणावर –

आज (रविवार) दुपारी मोंढा रस्त्यावरील अमरधाम स्मशानभूमीत नितीन जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह महसूल मधील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान गेवराई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असुन, उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने महसूल पथक नियुक्त केले आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तहसीलदार सुरेंद्र डोके आणि मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षसभुवन, सावळेश्‍वर, म्हाळसपिंपळगाव येथे गस्तीवर गेले होते. परत येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात होऊन नितीन जाधव यांचा मृत्यू झाला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …