ताज्या

तालिबानच्या ‘दहशतवादी’ मंत्र्याचे छायाचित्र प्रथमच प्रसिद्ध

हक्कानी हा हक्कानी नेटवर्क या वेगाने प्रसार होत असलेल्या इस्लामी दहशतवादी माफिया गटाचाही प्रमुख आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचा प्रभारी अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी याचे छायाचित्र तालिबानने प्रथमच शनिवारी प्रसिद्ध केले आहे. हक्कानी याला संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्येच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले असून अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी एक कोटी डॉलरचे इनामही जाहीर केलेले आहे. हक्कानी हा हक्कानी नेटवर्क या वेगाने प्रसार …

Read More »

युद्धबंदी कालावधीतही युक्रेनमधील नागरिकांची कोंडी

रशिया व युक्रेन यांनी त्यांच्या शब्दांत ‘शांततेचा कालावधी’ म्हणून युद्धबंदी जाहीर केली असली, आणि मारिउपोल आणि वोल्नोवखा या शहरांतून बाहेर पडण्याकरता नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्याचे जाहीर केले असले, तरी पूर्व युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना हे मार्ग वापरता आलेले नाहीत. त्याऐवजी, काही जण युक्रेनच्या पश्चिम सीमेच्या दिशेने जाऊ शकले असून, रशियासोबतच्या पूर्व सीमेकडे जाऊ शकलेले नाहीत.  सुमी व पिसोचिन वगळता युक्रेनमध्ये …

Read More »

युद्धविषयक पुस्तकांच्या मागणीत वाढ

पुणे : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर  गेल्या आठवडाभरात युद्धाच्या कथा असलेल्या पुस्तकांना पुणेकरांकडून पसंती मिळत असून या विषयावरील पुस्तकांच्या खपामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्याचा परिणाम वाचकांच्या आवडनिवडीवर दिसून आला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशातून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर लिखित ‘पुतीन’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी राहिली. त्याचबरोबरीने युद्धविषयक …

Read More »

महिलांसाठी वसतिगृहांची उभारणी करा; पुण्यातील युवतींना मारहाण प्रकरणामुळे भारतीय महिला फेडरेशनची मागणी

पुण्यातील युवतींना मारहाण प्रकरणामुळे भारतीय महिला फेडरेशनची मागणी पुणे : शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर राहणाऱ्या किंवा बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मोठय़ा प्रमाणावर वसतिगृहे उभारावीत, अशी मागणी भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य शाखेकडून शनिवारी करण्यात आली आहे.   भाडेकरू महिला, घर मालक आणि गृहनिर्माण संस्था यांच्यातील संबंधांबाबत एक आचारसंहिता तयार करावी, अशीही मागणी फेडरेशनकडून करण्यात आली आहे. कथित …

Read More »

“…हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे” ; नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

“काय बोलावं की कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही”. असंही राणेंनी बोलून दाखवलं. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला …

Read More »

Disha Salian Case : “शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर… ; नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर राणेंचं माध्यमांसमोर विधान!

”सुशांत आणि दिशाची हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आला होता”, असंही सांगितलं आहे. दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी आज मालवणी पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी मालवणी पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले होती. …

Read More »

पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर ; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा भाजपाचा डाव असल्याची विरोधकांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या (रविवार) पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. तर, मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोद दर्शवण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांकडून आंदोलन केले जाणार आहे. काँग्रेसच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर समोरील घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यलायासमोर आंदोलन केले जाणार आहे. …

Read More »

अबब! ‘रायगड भूषण’ पुरस्काराचे यंदा २५७ मानकरी ; निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुरस्काराची खैरात?

अलिबाग येथे उद्या होणार पुरस्कार वितरण  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून यंदा रायगड जिल्हा परीषद  ‘रायगड भूषण‘ पुरस्काराची खिरापत वाटप करत असल्याचे दिसून येत आहे. कारण, तब्‍बल २५७ जणांना यंदा ‘रायगड भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार वितरण उद्या ( दि. ६ मार्च) केले जाणार आहे.    रायगड भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांचे निकष हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला …

Read More »

स्टेट बँक फसवणूक प्रकरणात आठ कर्जधारकांसह बनावट आयकर कागदपत्रे तयार करणाऱ्याला अटक

आरोपींची एकूण संख्या २३ ; बँक अधिकारी फरार, तीन अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज भारतीय स्टेट बँकेतील १४ कोटी २६ लाखाच्या फसवणूक प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा आठ कर्जधारकांसह बनावट आयकर कागदपत्रे तयार करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. या सर्वांची एक दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सर्व आरोपी मजूर वर्गातील आहेत. ५० हजार ते एक लाखाचे आमिष दाखवून आधारकार्ड घेवून …

Read More »

Russia-Ukraine War : युक्रेनमधून आतापर्यंत १३ हजार ३०० भारतीय परतले ; २४ तासांत १५ विमानं दाखल

परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती ; पुढील २४ तासांसाठी १३ विमानं नियोजित असल्याचंही सांगितलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली …

Read More »

नागराज मंजुळेंचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झुंड’ प्रदर्शित, पहिल्या दिवशी कमवले इतके कोटी

नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण …

Read More »

विनायक चतुर्थीनिमित्त श्री गणेश देवाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास ठेवतात आणि विधीवत पूजा देखील करतात. तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी जर मनोभावे पूजा केली गेली तर विशेष फळ प्राप्त होतं. ६ मार्च रोजी रविवारी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्याच्या चतुर्थीला हा उत्सव साजरा केला जाईल. या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास ठेवतात आणि विधीवत पूजा देखील करतात. तसेच विनायक …

Read More »

कल्याण डोंबिवलीतील निर्बंध कायम; ५० टक्के उपस्थितीची अट

कल्याण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील लसीकरण, करोना रुग्णांचा उपचारी दर यांचे निकष अद्याप पूर्ण केले नसल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील करोना प्रतिबंध नियमांचे यापूर्वीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट यामुळे कायम राहणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने हे निर्बंध …

Read More »

ठाणे जिल्हा सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून ५२७ कोटीचा निधी मंजुर

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ९०० खाटांचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी मंजुर केला आहे. यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या वृत्तास ठाणे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार …

Read More »

International Women Day 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुपर वुमनला पाठवा ‘या’ शुभेच्छा

तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुपर महिलांना काही प्रेमळ संदेश पाठवू शकता आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देखील देऊ शकता. ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला महिलांच्या योगदानाची, तपश्चर्याची आणि त्यागाची आठवण करून देतोच पण महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका खास थीमवर साजरा केला जातो. अशा परिस्थितीत, हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी, तुम्ही …

Read More »

IND Vs SL 1st Test Match : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंका ४६६ धावांनी पिछाडीवर, जडेजाने केल्या १७५ धावा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळला जातोय. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस होता. आजच्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय फलंदाजांनी आज नेत्रदीपक कामगिरी केली. भारताने ५७४ धावांवर डाव घोषित केला. तर दिवसाअखेर श्रीलंकेची स्थिती चार गडी बाद १०८ धावा अशी राहिली. आजच्या खेळात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत तब्बल १७५ धावा …

Read More »

“मुलींसारखं का वागतोयस आणि पर्स…”, अक्षय कुमारचा मुलगा आरव झाला ट्रोलिंगचा शिकार

ट्विंकल खन्ना आणि आरवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा मुलगा आरव हा नेहमीच पॅपाराझी पासून लांब राहतो. पण यावेळी आरव हा नुकताच ट्विंकल खन्नासोबत मुंबईत दिसला. यावेळी त्याने ग्रीन स्लिंग बॅग घेतली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड …

Read More »

“महानायकाला आणि महामानवाला तू एकाच फ्रेममध्ये आणलंस हे फक्त…”, ‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची भावूक प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच मराठी अभिनेता जितेंद्र …

Read More »

सरकार म्हणजे अजित पवार ना…; जेव्हा उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना सुनावतात, पाहा VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यातील साखर संकुल येथे साखर महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. त्यानंतर अजित पवारांनी एका तक्रारीनंतर तात्काळ अधिकाऱ्याला फोन लावत त्याची कानउघडणी केली. पुण्यात साखर संकुल येथे बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीचं ‘आपलीच हवा’ गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

प्रशांत नाकतीची या आधी ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी अनेक गाणी सोशल मीडियावर गाजली होती. ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान …

Read More »