ताज्या

“महानायकाला आणि महामानवाला तू एकाच फ्रेममध्ये आणलंस हे फक्त…”, ‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची भावूक प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच मराठी अभिनेता जितेंद्र …

Read More »

सरकार म्हणजे अजित पवार ना…; जेव्हा उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना सुनावतात, पाहा VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यातील साखर संकुल येथे साखर महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. त्यानंतर अजित पवारांनी एका तक्रारीनंतर तात्काळ अधिकाऱ्याला फोन लावत त्याची कानउघडणी केली. पुण्यात साखर संकुल येथे बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीचं ‘आपलीच हवा’ गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

प्रशांत नाकतीची या आधी ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी अनेक गाणी सोशल मीडियावर गाजली होती. ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान …

Read More »

सामुद्रिक शास्त्र: डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव अन् नशीब, तपकिरी डोळे असलेले लोक…

डोळे सर्व काही बोलून जातात, असं म्हणताना तुम्ही अनेकांना ऐकले असेल. पण सामुद्रिकशास्त्रात डोळ्यांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांद्वारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेता येते. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे अवयव आणि त्यांची रचना व्यक्तीचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य सांगण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे डोळ्यांचा रंगही माणसाच्या आयुष्यातील गुपिते …

Read More »

हीरोची इलेक्ट्रिक फ्लॅश स्कूटर एका चार्जमध्ये देते ५० किमीची रेंज, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

हिरो इलेक्ट्रिकची फ्लॅश स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. कारण ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये ५० किमीची रेंज देते. हीरो इलेक्ट्रिक कंपनीने सर्वच रेंजमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली आहेत. जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एचएक्स ही तुमच्यासाठी सर्वोत्तम स्कूटर असेल. पण जेव्हा तुम्हाला रोज जास्त अंतर जावे लागत नाही, तेव्हा हिरो इलेक्ट्रिकची फ्लॅश स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम …

Read More »

UP Election : …अखेर भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाचा समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश

अखिलेश यांनी मंचावरून केली घोषणा ; भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत, पण तरी देखील नेतेमंडळीचे पक्ष प्रवेश सुरूच आहेत. आता भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे चिरंजीव मयंक जोशी यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मयंक जोशी सपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच होत्या, या चर्चांना …

Read More »

अचानक का गळू लागतात पुरुषांचे केस? जाणून घ्या यावरील उपचार

केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही अतिशय सामान्य समस्या आहे. परंतु काही पुरुषांमध्ये अचानक केस गळण्याची समस्या सुरु होते. केसगळतीमुळे पुरुषांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला टक्कल पडू लागते. असे मानले जाते की जास्त ताण, वैद्यकीय स्थिती, औषधांचे सेवन किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पुरुषांचे केस गळू लागतात. चला तर मग जाणून घेऊया या समस्येला कसे सामोरे जावे. केसगळती रोखण्यासाठी या टिप्स …

Read More »

मधुमेहांच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे ‘हा’ पेय, उच्च रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे आणि नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या रक्तातील साखरेची पातळी दिवसातून अनेक वेळा बदलते. दुसरीकडे, हायपरग्लाइसेमिया, म्हणजेच उच्च रक्तातील साखरेच्या बाबतीत, मधुमेह रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण, जर त्यावर उपचार केले गेले नाहीत तर ते नंतर अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे कारण बनू शकते. डाळिंबाचा रस मधुमेहावर गुणकारी आहे मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या …

Read More »

Disha Salian Case: स्वत: कार चालवत नितेश राणे वडिलांसहीत चौकशीसाठी पोलीस स्थानकात पोहचले; Tweet करत म्हणाले…

दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी आज मालवणी पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी मालवणी पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे राणेंचा ताफा जेव्हा पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला तेव्हा यावेळी नितेश राणे हे स्वत: गाडी …

Read More »

अजय देवगण नव्हे तर ‘हा’ अभिनेता होता काजोलची पहिली पसंती, एक झलक पाहण्यासाठी असायची उत्सुक

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय देवगण आणि काजोल. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचे नात अधिक मजबूत आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले असले तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत. लग्नानतंर काजोलने सिनेसृष्टीतून ब्रेक घेत कौटुंबिक आयुष्याला जास्त महत्त्व दिले. पण काजोलची पहिली …

Read More »

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’साठी अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार पण…

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण हे नागपूरमध्ये झालं आहे. चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य …

Read More »

…तेव्हा मंत्रिमंडळातून काढलं नाही; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी भाजपला दिला नारायण राणेंचा दाखला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे.  न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली आहे. त्यावरुन आता भाजपाने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची …

Read More »

जिनिलियाने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली “आज मी…”

जिनिलियाने नुकतंच तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. जिनिलियाने नुकतंच तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. जिनिलिया ही लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक करणार आहे. तिने याबाबत …

Read More »

Russia Ukraine War: रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा!

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी युद्धविराम जाहीर केला आहे. गेल्या १० दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये ३३१ नागरिक ठार झाले. त्यात १९ मुलांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या ६७५ आहे. (युक्रेन आणि रशिया युद्धाच्या लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ) युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही संयुक्त …

Read More »

Women’s Day 2022: पत्नीच्या नावाने गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या यावर कशापद्दतीने आकारला जातो कर

International Women’s Day : दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यावेळी महिला दिनानिमित्त तुम्ही आपल्या पत्नीला काही भेट देण्याचा विचार करत असाल तर त्यांच्या नावावर गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. तथापि, अशा गुंतवणुकीतून मिळणार्‍या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. कर नियम सांगतात की पतीने पत्नीच्या नावावर केलेली कोणतीही गुंतवणूक ही …

Read More »

‘चला हवा येऊ द्या’ शो मधून ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता घेणार ब्रेक, समोर आले कारण

मात्र या कार्यक्रमातील एक प्रसिद्ध विनोदवीर हा ब्रेक घेण्याची शक्यता आहे. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. मात्र या कार्यक्रमातील एक प्रसिद्ध विनोदवीर …

Read More »

International Women’s Day 2022 : तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या महिलांना द्या ‘या’ खास भेटवस्तू

आज आपण जाणून घेऊया, आंतरराष्ट्रीय महिला दिनी तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना कोणती भेट देऊ शकता? महिलांच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल वूमन्स डे’ साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते. यंदा ‘शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता आवश्यक’ अशी संकल्पना ठरवण्यात आली आहे. या खास प्रसंगी महिलांना सन्मान देणे, त्यांना यशस्वी होण्यासाठी …

Read More »

Video: युद्धाविरोधात ना’राजीनामा’… एकाच वेळी Live Telecast दरम्यान सर्वांनी सोडली नोकरी

रशियामधील बातम्या देणारं हे चॅनेल मंगळवारी बंद करण्यात आलं. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाला अनेक रशियन लोकांचा देखील विरोध आहे. युद्धाला नकार देत रशियाच्या एक आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी ऑन एअर राजीनामा दिला आहे. या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” म्हणत राजीनामा दिला. रशियन अधिकार्‍यांनी युक्रेन युद्धाच्या कव्हरेजबद्दल त्यांचे ऑपरेशन स्थगित केल्यानंतर टीव्ही रेनच्या (Dozhd) कर्मचार्‍यांनी …

Read More »

रशियामध्ये Facebook वर पूर्णतः बंदी; खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी ट्विटरवरही लागू केले निर्बंध

तज्ञांचे असे मानणे आहे की युक्रेनमध्ये लढाई वाढत असताना, अधिकाऱ्यांनी टीका करणाऱ्या आवाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांपासून फेसबुकची पोहोच कमी करून, त्यांना इशारा दिल्यानंतर आता रशियाने देशात फेसबुकवर पूर्णतः बंदी लादली आहे. रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सी रॉस्कोमन्डझोरने फेसबुक रशियन मीडियासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. द कीव इंडिपेंडंटच्या अहवालानुसार रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने फेसबुकवर बंदी घालत …

Read More »

चांगभलं : शाळा सुटल्यानंतर भरते ‘पुस्तकांची शाळा’

दिगंबर शिंदे सांगली : समाजमाध्यमातून धो-धो वाहत येणाऱ्या आभासी दुनियेपासून मुलांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्यात वाचनाची गोडी लागावी यासाठी तासगाव तालुक्यातील खुजगावच्या एका निवृत्त शिक्षकाने चालतं-बोलतं ग्रंथालय शाळकरी मुलांसाठी सुरू केलं आहे. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर शाळेसमोर मुलांसाठी पुस्तकांचा खजिना घेऊन बसणारा हा शिक्षक मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी कविता आणि गद्य वेचेही त्यांच्याकडून वाचून घेतो. तासगाव – सावळज रस्त्यालगत तालुक्याच्या …

Read More »