बिग बॉस मराठी हा (mahesh manjrekar bigg boss marathi) कार्यक्रम ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत असे महेश मांजरेकर त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि कार्यक्रमात त्यांच्या डॅशिंग अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या स्पेशल स्टाईलमध्ये होणार वीकेंडचा डाव नसेल तर कार्यक्रमात मजा नाही. दर आठवड्याच्या शेवटी येऊन स्पर्धकांची शाळा घेणारे मांजरेकर बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी तब्बल 25 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. तर त्यांचं एकूण मानधन हे कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात हे आकडे आधीच्या सीझनचे असून या सिझनला त्यांच्या मानधनात वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या मानधनाबद्दल कोणीतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याची पुष्टी न्यूज18 लोकमत देत नाही.
हे ही वाचा- Utkarsh Shinde: ‘आज तुला पाहिलं आणि…’ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उत्कर्षला भेटली स्पेशल व्यक्ती
बिग बॉस मराठीसारखा चर्चित कार्यक्रम वगळता सुद्धा महेश यांनी दिग्दर्शक म्हणून अफाट लोकप्रियता मिळवली आहे. महेश यांचं नेट वर्थ हे जवळपास चाळीस कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. महेश प्रत्येक सिनेमासाठी 30-50 लाख रुपये आकारतात असं सुद्धा सांगितलं जातं. याबद्दलची पुष्टी न्यूज18 लोकमत करत नाही.
सध्या महेश मांजरेकर यांचा दे धक्का 2 सिनेमा रिलीज झाला असून येत्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील जीवनपट ते घेऊन येणार आहेत. वास्तव सिनेमातून सुरु झालेला महेश यांचा प्रवास आजही अविरत सुरु आहे.
हे ही वाचा- वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट
वास्तव, नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा सुपरहिट सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं. येत्या काळात महेश बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचे होस्ट म्हणून दिसणार आहेत. त्यांनी णुकीतच कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे आणि पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली आहे.
(सदर माहितीची न्यूज18 लोकमत पुष्टी देत नाही.)
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या