आलिया भट्ट (Alia Bhatt Baby Shower New Pics) हिनं तिच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला पारंपरिक ड्रेस घातला होता. आलिया पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत आहे. आलियानं या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. हे शेअर करत असताना ‘निव्वळ प्रेम…’ अशी छोटीशी पण खूप काही सांगून जाणारी पोस्ट लिहिली आहे.
आलियाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमावेळी रणबीर कपूर (Ranbir Kapoor)नं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या कार्यक्रमाला त्यानं गुलाबी रंगाची शेरवानी घातली असून त्यात तो हँडसम दिसत आहे.
भट्ट आणि कपूर कुटुंबाची उपस्थिती
आलियाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला तिचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहिण पूजा भट्ट, शाहीन भट्ट देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांच्याबरोबरचा फोटोही आलियानं शेअर केला आहे. आलियानं कपूर कुटुंबाबरोबरचा ग्रुप फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये नीतू कपूर, रिद्धिमा, करिश्मा, श्वेता बच्चन यांच्यासह कुटुंबातील अनेकजणी उपस्थित होत्या. या सर्वांनी पारंपारिक कपडे घातले होते.
आलियाच्या मैत्रिणीही आल्या होत्या
आलियाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला तिच्या मैत्रिणी देखील हजर होत्या. या कार्यक्रमाला आलियच्या अगदी जवळच्या चार मैत्रिणी उपस्थित होत्या.
आलिया रणबीरचा लुक
सोशल मीडियावर आलियानं जे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिचा आणि रणबीरचा सुंदर फोटो आहे. त्यामध्ये दोघंजण काही विधी करताना दिसत आहेत. सर्वाधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.
दरम्यान, आलिया आणि रणबीर यांचं लग्न याचवर्षी झालं होतं.अत्यंत जवळच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्याचं लग्नसोहला पार पडला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियानं सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याची बातमी शेअर केली होती.
आलियाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात दिसणार आहे. तसंच जी ले जरा या फरहान अख्तरचा सिनेमाही तिच्याकडे आहे. याशिवाय हॉलिवूडचा हार्ट ऑफ स्टोनमध्येही आलियानं काम केलं आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तर रणबीरच्या कामाबद्दल सांगायचं तर एनिमल मध्ये दिसणार आहे. त्यात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या