ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत नव्या कॉमेंटेटरची होणार एन्ट्री…

मुंबई, 19 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियात होणारा आगामी टी20 वर्ल्ड कप आता काही दिवसांवर आला आहे. 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होईल. पण त्याआधी उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संंघांमध्ये टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतात या सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन होणार आहे. त्यासाठी आज हिंदी कॉमेंटेटर्सची यादी जाहीर झाली आहे. महत्वाचं म्हणजे 2007 चा वर्ल्ड कप खेळलेल्या आणि नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एका माजी क्रिकेटरचा समालोचकांच्या या पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रॉबिन उथप्पा करणार कॉमेंट्री

2007 च्या टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महत्वाचं नाव म्हणजे रॉबिन उथप्पा. उथप्पानं त्या वर्ल्ड कपमध्ये 7 सामन्यात एका अर्धशतकासह 113 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध बॉल आऊटवर गेलेल्या सामन्यात चक्क उथप्पानंही स्टम्प्सचा वेध घेतला होता. त्यानंतर त्यानं केलेलं सेलिब्रेशन अजूनही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. हाच उथप्पा आता पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पण आता त्याच्या हातात बॅटऐवजी असणार आहे माईक. वर्ल्ड कप आधी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी हिंदी समालोचकांच्या यादीमध्ये उथप्पाचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – T20 World Cup: टीम इंडियाचे हीरो नव्या जर्सीत… पाहा भारतीय खेळाडूंचे टी20 जर्सीतले Photo

शास्त्री-गावस्करांसह दिग्गजांचा आवाज घुमणार

हिंदी समालोचकांच्या यादीत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर, माजी प्रशिक्षक आणि समालोचकांमधलं मोठं नाव रवी शास्त्री यांचा समावेश आहे. याशिवाय आकाश चोप्रा, जतिन सप्रू, संजय बांगर आणि रॉबिन उथप्पा हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी समलोचनाची जबाबदारी पार पाडतील.

 

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पराभव कोच द्रविड यांच्या जिव्हारी लागला; टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIकडे केली ही मागणी

मुंबई: ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक २०२२ सुरू होत आहे. या मोठ्या टूर्नामेंटपूर्वी टीम इंडिया …

जसप्रीत बुमराह कधी खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर आली मोठी अपडेट

मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात २०८ धावा करून देखील टीम इंडियाचा पराभव झाला. ३ सामन्यांच्या …