Ashes To Clean Utensils: भांडी घासायच्या राखेची Amazon वरील किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का; 1 Kg राखेची किंमत…

ashes of the stove to clean utensils is available on amazon: इंटरनेटवर अनेक गोष्टी आपल्यापैकी अनेकजण थेट घरीच ऑर्डर करतात. ऑनलाइन डिलेव्हरीच्या माध्यमातून आज अगदी किराणामालापासून ते खाण्यापर्यंत आणि कपड्यांपासून ते औषधांपर्यंत सर्व गोष्टी घरबसल्या (online delivery) मिळतात. या नवीन तंत्रज्ञानाच्या जगात अनेक जुन्या गोष्टी बदलून आपण नव्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. आपण आता केवळ ऑनलाइन ऑर्डर देऊन घरी गोष्टी मागवत नाही तर सर्व गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही बदलला आहे.

अनेक पर्याय शोधले

आपलं राहणीमान बदलल्याने त्याचा आरोग्यावर आणि वस्तूंच्या वापरावही परिणाम होऊ लागला आहे. आधी आपण लस्सी, लिंबू पाणी यासारख्या गोष्टींचा प्राधान्य द्यायचो. तेच आता आपण कोल्ड ड्रिंक्सला देतो. आधी घरी गुळ आणि शेंगदाणे खायचो आता घरी चिप्स खातो. अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अगदी साबणापासून ते शॅम्पूपर्यंत आणि लिक्वीड सोपपासून ते घासण्यांपर्यंत. पूर्वी आपल्या आजी-आजोबांच्या काळात भांडी घालण्यासाठी राख वापरली जायची. मात्र आता हीच राखेने भांडी घासण्याची पद्धत ऑनलाइन जमान्यात नव्या रुपात मार्केटिंग करुन विकली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे पूर्वी चुल्हीत लाकडं जाळून निरोपयोगी म्हणून वापरली जाणारी ही राख आता हजारोंची झाली आहे.

हेही वाचा :  Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत

राखेची किंमत पाहून लोक थक्क

पूर्वी मोफत मिळणारी चुल्हीतील राख आता पॅकेजिंगच्या माध्यमातून आणि आकर्षक स्वरुपात ऑनलाइन वेबसाईटवर उपलब्ध आहे. पण ही राख तब्बल 1800 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. या राखेची पाकिटं पाहून अनेकांना आधी मोफत मिळणाऱ्या या राखेसाठी इतकी किंमत का मोजावी असा प्रश्न विचारला आहे. 1800 रुपये किलो दराने ही राख नॅचरस आणि ऑरगॅनिक वूड अ‍ॅश नावाने विकली जात आहे. तसेच या पावडरच्या डिस्क्रिप्शनमध्ये अ‍ॅश पावडर फॉर डिशवॉशिंग म्हणजेच भांडी घासण्यासाठी राख असं लिहिलेलं आहे.

शेण खताची किंमत थक्क करणारी

बरं अ‍ॅमेझॉनवर केवळ अशापद्धतीने राखच विकली जाते असं नाही. तर नारळाच्या करवंट्या, नारळाच्या शेंड्या, खाट, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या समिधा यासारख्या गोष्टीही विकल्या जात आहे. इतकच काय तर शेणाच्या गोवऱ्याही विकल्या जात आहेत. शेणखतही ऑनलाइन विकलं जात असून त्यांची किंमत तब्बल 450 रुपयांपर्यंत आहे.

तसेच दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या काड्याही 100 ते 150 रुपयांना विकल्या जात आहेत.

अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास पूर्वी ज्या गोष्टी जवळजवळ मोफत मिळायच्या किंवा टाकाऊपासून टिकाऊ श्रेणीत मोजल्या जायच्या त्याच आकर्षक पॅकेजिंगच्या माध्यमातून शेकडो, हजारो रुपयांना विकल्या जात आहेत.

हेही वाचा :  मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटणार? BMC चा मास्टर प्लान तुम्हीही पाहून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …