US Presidential Election 2024: ‘मी राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत’; भारतीय वंशाच्या महिलेचं ट्रम्प यांना चॅलेंज

US presidential election 2024 Indian American Nikki Haley launch campaign for Republican nomination: भारतीय वंशाच्या अमेरिकी नेत्या निकी हेली (Nikki Haley) यांनी मंगळवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक (US presidential election) लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2024 साली होणाऱ्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी निकी हेली माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार आहे. ट्रम्प यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान देणार्या निकी हेली या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या आहेत. त्यामुळे निकी हेलींना खरोखरच उमेदवारी मिळाली आणि त्या जिंकल्या तर ब्रिटनपाठोपाठ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदीही भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाल्याचं कादाचित पुढील वर्षी पहायला मिळेल.

काय म्हणाल्या निकी हेली?

51 वर्षीय निकी हेली या दक्षिण कॅरोलिनाच्या दोनवेळा गव्हर्नर राहिल्या आहेत. त्या संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही कार्यरत होत्या. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नरने एक व्हिडीओ जारी करत, “मी निकी हेली आहे. मी राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहे. नेतृत्वाच्या एका नव्या पिढीला पुन्हा जबाबदारीची जाणीव करुन देण्याची, आपल्या सीमा सुरक्षित करण्याची, देशाचा गौरव आणि ध्येय निश्चित व अधिक सक्षम करण्याची ही वेळ आहे,” असं निकी हेली यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  Vivek Ramaswamy: कोण आहेत अमेरिकेतील सर्वात चर्चित हिंदू नेते विवेक रामास्वामी? संपत्ती वाचून हैराण व्हाल

भारतीय कनेक्शनचा अभिमान

स्वत:ला प्रवासी भारतीयांची मुलगी म्हणून घेण्याचा मला अभिमान वाटतो असं निकी हेली सांगतात. हेली दक्षिण कॅरोलिनामधील बामबर्ग येथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. अमेरिकेला एका सकारात्मक वाटेने घेऊन जाण्यास आपण सक्षम आहोत असा विश्वास निकी हेली यांनी व्यक्त केला आहे.

पुन्हा गौरव मिळवून देणार

स्वत:ला तरुण नेतृत्व म्हणवणाऱ्या निकी हेली या आपण 76 वर्षीय ट्रम्प यांना पर्याय म्हणून अधिक सक्षम असल्याचं सूचित करत आहेत. निकी हेली यांनी काही आठवड्यांपूर्वीच आपल्या या उमेदवारीचे संकेत दिले होते. हेली या स्वत:ची जाहिरात करताना आपण आपला पक्ष आणि देशाला पुन्हा एकदा गमावलेला गौरव पुन्हा मिळवून देऊ शकतो असं सांगताना दिसत आहेत. 

…म्हणून आपण महान देश

“आपण देव आणि त्याच्याशी संबंधित मूल्यांबद्दल असणार्या भितीपासून दूर झालो आहोत. त्यामुळेच आपण आज जगातील सर्वात स्वतंत्र आणि महान देश ठरतो. आपल्याला पुन्हा त्याच दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे,” असं निकी हेली म्हणाल्या. ट्रम्प यांच्या तुलनेत स्वत:ला तरुण आणि नवीन पर्याय म्हणून लोकांसमोर आपली उमेदवारी घोषित करताना निकी हेली फारच उत्साही आणि आत्मविश्वासाने बोलत असल्याचं दिसून आलं.

ट्रम्प यांनी मागील वर्षीच केली घोषणा

हेली यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्या ट्रम्प यांना त्यांच्याच पक्षातून थेट विरोध करणाऱ्या पहिल्या नेत्या ठरल्या आहेत. कालपर्यंत ट्रम्प हे त्यांच्या पक्षाकडून 2024 साली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी दावेदारी सादर करणारे एकमात्र रिपब्लिकन नेते होते. 76 वर्षीय ट्रम्प यांनी मागच्या वर्षीच आपण पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

हेही वाचा :  डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील तब्बल 34 गुन्हे सिद्ध; अडल्ट स्टारकडे आहे त्यांचं सर्वात मोठं सिक्रेट... आता पुढे काय?

पहिल्या भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्ष

हेली यांना खरोखरच पक्षाने उमेदवारी दिली त्या निवडणूक लढल्या आणि जिंकल्या तर त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा ठरण्याबरोबरच अमेरिकेच्याही पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. सध्या उपराष्ट्राध्यपदी असलेल्या कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्षा ठरल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. सुनक यांच्या माध्यमातून ब्रिटनला पहिल्यांदाच भारतीय वंशांची व्यक्ती पंतप्रधान म्हणून मिळाली.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …