सद्गुरूंनी दिल्या प्रेम-नात्याच्या 5 भन्नाट ट्रिक्स, फॉलो केल्यास तुमच्या प्रेमात आंधळे होईल जग

आज तुम्हाला हवा गुलाबी, पाणी गुलाबी इतकंच काय तर सारं जगच गुलाबी गुलाबी दिसू शकतं, त्याचे कारण म्हणजे Valentine Day 2023. 7 ते 14 फेब्रुवारी या आठवडाभर चालणाऱ्या प्रेमाच्या उत्सवात अनेक हृदये एकमेकांच्या कायमसाठी जवळ येतात तर दुसरीकडे लाखो मने नकार मिळाल्याने दु:खाच्या खाईतही जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्रेम आणि नात्याचे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहोत, जे तुमच्या हृदयातील जखमा भरून काढण्याचे काम करू शकतात. जगदीश वासुदेव उर्फ ​​सद्गुरु हे ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहेत.

तसेच, ते आजच्या काळातील अशा धर्मगुरू किंवा अध्यात्मिक गुरूंपैकी एक आहेत, जे तरुण पिढीच्या मनातील गोंधळ व दडपण समजून घेतात आणि ते कसे सोडवायचे हे जाणतात. त्यांनी सांगितलेले प्रेम आणि नातेसंबंधांचे नियम समजून घेतल्यास तुम्हीही रिलेशनशिपचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता. किंबहुना त्यांनी सांगितलेले नियम पाळल्यास तुमचं नातं चिरंतर टिकू शकतं तेही कोणत्याही वादविवादाशिवाय. (फोटोज सौजन्य – सद्गुरु इंस्टाग्राम, iStock)

प्रेमाचा अर्थ आहे स्वातंत्र्य

प्रेमाचा अर्थ आहे स्वातंत्र्य

जेव्हा आपण कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा त्या व्यक्तीने नेहमी आपले ऐकावे अशी अपेक्षा असते आणि जी चुक सुद्धा नाही. अनेकवेळा आपल्या जोडीदाराला गमावण्याच्या भीतीने किंवा तो सतत आपल्या सोबत असावा या निष्पाप हेतूमुळे आपण त्याला जबरदस्ती ओवरपॉवर करण्याचा प्रयत्न करतो. पण सद्गुरु म्हणतात की, खरे आणि आत्मीय प्रेम हेच आहे जे समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे किंवा त्याला आवडतं ते करू देतं. प्रेम हे स्वातंत्र्य आहे, कोणालाही त्याचा कैदी बनवू नका.

हेही वाचा :  World TB Day 2022 :- 'या' 5 प्रकारच्या लोकांना एका क्षणात विळख्यात घेतो टीबी, दुर्लक्ष करू नका अन्यथा बेतेल जीवावर..!

(वाचा :- आम्ही रोमॅंटिक डेटवर गेलो, रात्रंदिवस चॅटिंग केली, सुखी संसाराची स्वप्न रंगवली अन् एके दिवशी अचानक भयानक..!)​

नातं सतत बदलत राहतं

नातं सतत बदलत राहतं

कोणतेही नाते नेहमीसारखे राहत नाही. त्याचा स्वभाव बदलणारा किंवा परिवर्तनशील आहे. सद्गुरु स्पष्ट करतात की, निरपेक्ष किंवा एब्सल्यूट नाते हे केवळ एका मृत व्यक्तीशीच असू शकते. प्रत्येक मनुष्याची काम करण्याची स्वतःची एक विशिष्ट पद्धत असते. नात्यात याबाबत स्वीकृती असणे खूप गरजेचे आहे. तसेच, नाते टिकवण्यासाठी कौशल्य आणि चौकसपणा अर्थात स्किल आणि अटेंटिव्हनेस असणे आवश्यक आहे.

(वाचा :- मी सप्तपदी चालत होती व बॉयफ्रेंड रडत कोप-यात उभा होता, याच हळव्या झालेल्या मुलाने पुढे जे केलं ते ऐकून हादराल)​

कोणताही माणूस चुक किंवा बरोबर नसतो

कोणताही माणूस चुक किंवा बरोबर नसतो

जर तुम्ही तुमच्या मिस्टर किंवा मिस राईटची वाट पाहत असाल, तर सद्गुरुंचे हे मत किंवा सल्ला तुमचे हृदय तोडू शकते. सद्गुरु स्पष्ट करतात की, या पृथ्वीतलावर असा कोणीही बरोबर किंवा चुकीचा माणूस नाही. प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच असतो, फक्त परिस्थिती व त्याचा स्वभाव त्याला वाईट व चांगलं ठरवत असतो. म्हणून परिपूर्ण व्यक्तीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःला एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थितीसाठी योग्य बनवा.

हेही वाचा :  Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि 'हे' नाव बाळासाठी ठरेल खास

(वाचा :- मलायका अरोराचा समस्त पुरूष जातीला प्रेमळ सल्ला, अरबाजसोबत 19 वर्षांचा संसार तोडल्यानंतर हळवी होत म्हणाली की..!)​

प्रेम आपल्या ह्रदयाचं वेगळेपण असतं

प्रेम आपल्या ह्रदयाचं वेगळेपण असतं

कोणी सोडून गेल्यावर प्रेम संपत नाही. प्रेम हे आपल्या हृदयातून येते अन् ते फक्त हृदयाचेच वैशिष्ट्य आहे, ते शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबतच असते, ते कोणी व्यक्ती आला किंवा गेला, वाईट वागला म्हणून संपत नाही. सद्गुरु समजावून सांगतात की, जेव्हा तुम्ही आपलं प्रेम दुसऱ्याला कंट्रोल करण्याची पॉवर देता तेव्हा तुम्ही कधीही त्याचा आनंद घेऊ शकत नाही. जे लोक प्रेम शेअर करतात त्यांना जगातील सर्वात सुंदर नाते मिळते.

(वाचा :- Sleep Divorce: घटस्फोट घेण्याचा काळ गेला आताचे कपल्स घेतात थेट स्लीप डिवोर्स, संकल्पना ऐकून हलेल डोक्याची नस.!)​

प्रेम करू नका, कोणाचेतरी प्रेम बना

प्रेम करू नका, कोणाचेतरी प्रेम बना

जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा त्यांनी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी तुमची इच्छा असते. परंतु हे करणे कोणालाही शक्य नसते. सद्गुरू स्पष्ट करतात की, प्रेम करण्याऐवजी प्रेम बनण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही इतरांमुळे कधीही निराश राहणार नाही. उलट तुम्ही त्यांच्या आनंदाचे कारण व्हाल. कारण जितक्या अपेक्षा कमी तितकाच आनंद, शांती व मानिसक समाधान जास्त असं सद्गुरू सांगतात.

हेही वाचा :  सीएसएमटी कडे जाणारी लोकल... मध्य रेल्वेच्या स्टेशन वरील उद्घोषक कर्मचारीच अडचणीच्या फेऱ्यात

(वाचा :-मी बहिणीच्या लग्नात अप्सरेसारखी सजून पोहचली अन् समोर बघते तर काय..! ज्यामुळे आम्हा दोघींचं आयुष्य झालं बेचिराख)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …