बाजारात खोटा बटाटा! तुम्ही खाताय का हा नकली बटाटा? कसा ओळखावा Fake Potato जाणून घ्या

Fake Potato Vs Real Potato: बाजारामध्ये नकली बटाटा आला आहे असं तुम्हाला सांगितल्यास नकली बटाटा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र खरोखरच असा प्रकार घडत असून अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही. खऱ्या बटाट्यांबरोबर खोटे बटाटे मिक्स करुन ते बाजारात विकले जात आहेत. मात्र यासंदर्भातील माहिती ग्राहकांना आणि सर्वसामान्यांना नाही. बाजारामध्ये ‘हेमांगिनी’ किंवा ‘हेमालिनी’ प्रजातीचे बटाटे ‘चंद्रमुखी’ बटाट्यांच्या दरात विकले जात आहेत. हे बटाटे दिसायला चंद्रमुखी प्रजातीच्या बटाट्यांसारखे असले तरी त्यांची चव फारच विचित्र आहे.

फरक समजणं कठीण

मात्र हे खरे आणि खोटे बटाटे एकत्र ठेवल्यास त्यांच्यातील फरक समजणं कठीण आहे. बाजारामध्ये ‘चंद्रमुखी’ बटाटा 20 ते 25 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर ‘हेमांगिनी’ बटाटा 10 ते 12 रुपये प्रति किलोने विकाला जात आहे. अनेकदा छोट्या गाड्यांमध्ये 5-5 किलोच्या गोणींमध्ये स्वस्त बटाटा म्हणून हे बटाटे विकले जातात. मात्र काही व्यापारी या ‘हेमांगिनी’ बटाट्यांना दर्जेदार ‘चंद्रमुखी’ बटाट्यांबरोबर एकत्र करुन विकत आहेत. याचमुळे जास्त पैसे मोजूनही हे कमी दर्जाचे म्हणजेच नकली ‘हेमांगिनी’ बटाटे लोकांना विकले जात आहेत.

हेही वाचा :  व्यंकय्या नायडू, वैजयंती माला यांना पद्मविभूषण तर मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

उत्पादनामध्ये फरक

हुगळी कृषी सहकारी समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार ‘हेमांगिनी’ बटाटे हे मिश्र प्रजातीचे बटाटे आहेत. या बटाटांचं उत्पादन पंजाबमधील वेगवेगळ्या भागांमध्ये घेतलं जाते. या बटाट्याचं बीज हे इतर राज्यांमधून पंजाबमध्ये येतं. या बटाट्याची शेती हुगळीमधील वेगवेगळ्या भागांमध्ये होते. या बटाट्याच्या बीजीपासून मोठ्या प्रमाणात फळ मिळतं. एका एकरामध्ये 150 ते 180 गोणी ‘चंद्रमुखी’ बटाट्याचं उत्पादन होतं. हेच प्रमाण ‘हेमांगिनी’बाबत एक एकराला 270 ते 285 गोणी इतकं आहे. मात्र बाजारपेठेत या हलक्या दर्जाच्या ‘हेमांगिनी’ बटाट्याला कमी मागणी आहे. हे बटाटे लवकर शिजत नाहीत. तसेच या बटाट्यांची चवही फारशी चांगली नाही. 

गावकऱ्यांना कळतो फरक पण शहरात होतो फसवणूक

हुगळीतील कृषी अधिकारी मनोज चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शहरांमधील लोकांना ‘हेमांगिनी’ बटाटा आणि ‘चंद्रमुखी’ बटाट्यामध्ये फरक लगेच कळत नाही.” ‘हेमांगिनी’ बटाट्याचं उत्पादन हे ‘चंद्रमुखी’ बटाट्याबरोबर क्रॉस ब्रिडींग करुन घेतलं जातं. ‘हेमांगिनी’ बटाटा हा क्रॉस ब्रिडींग प्रोडक्ट असल्याने तो कमी वेळेत, कमी पैशांमध्ये उत्पादन घेता येण्यासारखा आहे. ‘हेमांगिनी’ बटाट्याचं उत्पादन हुगळीमधील पुरशुरा आणि तारकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ‘चंद्रमुखी’ बटाटा हा 3 ते 4 महिन्यांमध्ये हाताशी येतो तर ‘हेमांगिनी’ हायब्रिड बटाटा अवघ्या दीड ते 2 महिन्यांमध्ये तयार होते. म्हणजेच एकाच सिझनमध्ये दोन वेळा हे पिक घेता येतं. हायब्रिट बटाट्याचं प्रोडक्शन दरही अधिक आहे.

हेही वाचा :  VIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच...

‘हेमांगिनी’ बटाट्याला अनेक व्यापारी ‘चंद्रमुखी’ बटाटा नावाने विकतात. गावाकडी लोकांना या दोन्ही प्रजातींमधील फरक लगेच कळतो. मात्र शहरांमध्ये हा फरक लगेच कळून येत नाही. त्यामुळेच व्यापारी या अज्ञानाचा फायदा घेतात.

‘हेमांगिनी’ बटाटा आणि ‘चंद्रमुखी’ बटाटा फरक कसा ओळखावा?

कृषी निर्देशक मनोज चक्रवर्तींनी दिलेल्या माहितीनुसार, “वरवर पाहता दोन्ही प्रजातीचे बटाट्यांमधील फरक लवकर समजत नाही. दोन्ही बटाट्यांचं साल हे पातळ असतं. मात्र दोन्हींमधील फरक दोन मुख्य गोष्टींमधून कळतो. पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही प्रजातीचे बटाटे साळल्यानंतर त्यांचा रंग हा वेगवेगळा असल्याचं दिसतं. ‘चंद्रमुखी’ बटाट्याचा रंग हा हलकासा मळकट असतो तर ‘हेमांगिनी’ बटाटा हा सफेद असतो. दुसरी गोष्ट म्हणजेच चव घेऊन कोणता बटाटा चांगला आहे हे समजू शकतं. ‘हेमांगिनी’ बटाट्याला अजिबात चव नसते. हा बटाटा पूर्णपणे पिकलेला नसतो.”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …