प्रेमात पडण्याआधी समजून घ्या ग्रीन फ्लॅग म्हणजे काय.? या 5 संकेतावरूनच ओळखाल लग्न करण्यालायक आहे का तुमची निवड

असं म्हणतात की जोड्या या स्वर्गातच बनतात. जो जोडीदार आपल्या नशिबात लिहिलेला असतो तोच आपल्याला मिळतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी स्वत:साठी जोडीदार कसा निवडावा हे सुद्धा आपल्या हातातच असतं. अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांना इतरांच्या दबावाखाली लग्न करावं लागतं, मात्र अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना जोडीदार निवडण्याची सुवर्णसंधी मिळते. अशीच संधी जर तुम्हाला मिळाली तर त्याचं नक्की सोनं करा. खास करून तरुणींनी य दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

कारण त्या आपल्या घरातल्या व्यक्तींना सोडून दुसऱ्याच्या घरात जातात. अशावेळी आपण ज्या व्यक्तीची निवड करतो आहोत तो खरंच आपल्यासाठी योग्य व सुरक्षित आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. असे नाही केले तर मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आज जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक तरुणीने आपल्या जोडीदारात शोधल्याच पाहिजेत. शिवाय ग्रीन फ्लॅग दिसल्याशिवाय मुलांनीही रिलेशनशिपमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेऊ नये. (फोटो सौजन्य :- iStock)

रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग

रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग

रेड फ्लॅग जोडीदाराच्या त्या सवयी असतात, ज्यामुळे तुम्ही दुःखी किंवा अस्वस्थ होतात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच्यावर संशय निर्माण होतो. एकंदर त्या व्यक्ती बाबत खात्री राहत नाही. याचा सरळ अर्थ असे दाखवतो की हे नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. ग्रीन फ्लॅग चा अर्थ असा की जोडीदाराच्या त्या गोष्टी ज्या दर्शवतात की हे नाते तुम्ही दुसऱ्या स्टेजकडे घेऊन जाऊ शकता आणि बिनधास्त त्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. तो तुम्हाला नक्की आयुष्यभर सांभाळेल.

हेही वाचा :  एकाचवेळी एक नाही तर अनेक मुली माझी पत्नी बनण्यास तयार झाल्या, अचानक एक भयंकर प्रसंग ओढावला व सा-याची माती झाली

(वाचा :- सावधान..! ही 3 लोकं दुस-याचा पार्टनर हिरावून घेण्यात असतात माहीर, मित्र-मैत्रीण बनून उद्धवस्त करतात सुखी संसार)​

नात्याबाबत त्यालाही आत्मविश्वास हवा

नात्याबाबत त्यालाही आत्मविश्वास हवा

वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी, व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्या प्रियकराला तुमच्यावर किंवा या नात्यावर विश्वास नसेल, तर याचा अर्थ त्याला तुमच्यासोबत भविष्य दिसत नाही. लग्नासाठी नेहमी अशी व्यक्ती निवडा जी तुमच्यावर फक्त प्रेमच करत नाही तर अवघे आयुष्य तुमच्यासोबत व्यतीत करण्यासाठी ती व्यक्ती ठाम असायला हवी. अशी क्वालिटी जर तुम्हाला तुमच्या आताच्या जोडीदारात दिसत असले तर लग्नाचा विचार करण्यास हरकत नाही.

(वाचा :- Valentine Day: सदगुरूंनी दिल्या प्रेम-नात्याच्या 5 भन्नाट ट्रिक्स, फॉलो केल्यास तुमच्या प्रेमात आंधळे होईल जग)​

तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवणारा असावा

तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवणारा असावा

तुमच्या ध्येयांना आणि स्वप्नांना आधार देणारा जीवनसाथी जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान असाल. म्हणूनच, त्याच्यासोबत भविष्याची स्वप्ने पाहण्याआधी आपल्या प्रियकरामध्ये ही गुणवत्ता आहे का ते पाहणे महत्वाचे आहे. जर तुमचा प्रियकर तुमच्या निर्णयांकडे लक्ष देत नसेल किंवा तुमच्या इच्छांना निरर्थक म्हणत असेल तर तो तुमचा जीवनसाथी होण्यास योग्य नाही असेच संकेत त्यातून मिळतात. कारण जोडीदार असा हवा जो तुमची प्रत्येक गोष्ट आपली म्हणेल.

हेही वाचा :  Sanjay Raut: "सभा होत असल्याने डॉक्टर मिंधे आणि फडणवीसांच्या..."; संभाजीनगरच्या सभेवरुन राऊतांचा टोला

(वाचा :- आम्ही रोमॅंटिक डेटवर गेलो, रात्रंदिवस चॅटिंग केली, सुखी संसाराची स्वप्न रंगवली अन् एके दिवशी अचानक भयानक..!)​

मनमोकळा संवाद साधणारा असावा

मनमोकळा संवाद साधणारा असावा

संवाद ही आनंदी नात्याची गुरुकिल्ली मानली जाते. जिथे दोन लोक एकमेकांचे ऐकायला तयार असतात तिथे संघर्षाची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आणि तुमचा प्रियकर कोणत्याही गोष्टीबाबत जर मनमोकळा संवाद साधत असाल तर याचा अर्थ तुमच्यामधील बॉन्डीन्ग आणि केमिस्ट्री खूप सुंदर आहे आणि तुम्ही हे नाते आयुष्यभरासाठी जपू शकता.

(वाचा :- मी सप्तपदी चालत होती व बॉयफ्रेंड रडत कोप-यात उभा होता, याच हळव्या झालेल्या मुलाने पुढे जे केलं ते ऐकून हादराल)​

कोणत्याही प्रभावाखाली येणारा नसावा

कोणत्याही प्रभावाखाली येणारा नसावा

अशा लोकांवर विश्वास ठेवणे कठीण आहे जे चटकन एखाद्याच्या प्रभावाखाली येतात. म्हणूनच बॉयफ्रेंडमध्ये आपल्या भावी पतीला शोधण्यापूर्वी नेहमी त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे तपासा. तो कोणाच्याही बोलण्यात लगेच येत नाही ना, किंवा छोट्याश्या गोष्टीवरून सुद्धा संशयी वृत्तीने वागत नाही ना ते तपासा. जर त्याला अशी सवय असले तर लग्नानंतर तुमचे आयुष्य उध्वस्त व्हायला वेळ काग्णार नाही. कारण अशी लोकं कधीच सारासार विचार करणारी नसतात आणि त्याचा त्रास स्वत:ला होतो.
(वाचा :- मलायका अरोराचा समस्त पुरूष जातीला एक प्रेमळ सल्ला, अरबाज खानसोबतचा 19 वर्षांचा संसार तोडल्यानंतर म्हणाली की..!)​

हेही वाचा :  Netflix पासवर्ड मित्रालाही दिलाय?, आताच बंद करा, कारण...

चुकांची जबाबदारी घेणारा असावा

चुकांची जबाबदारी घेणारा असावा

आपल्या चुका मान्य करणे हे एक उत्तम व्यक्ती असण्याचे लक्षणे आहे. जे आपल्या चुका मान्य करत नाहीत, ते सर्व चुकांसाठी इतरांना दोष देतात. मग अशा व्यक्तीसोबत आयुष्यभर आनंदाने जगता येईल का? हा प्रश्न स्वत:ला विचारा आणि अशा जोडीदारापासून दुरच राहा.

(वाचा :- Sleep Divorce: घटस्फोट घेण्याचा काळ गेला आताचे कपल्स घेतात थेट स्लीप डिवोर्स, संकल्पना ऐकून हलेल डोक्याची नस.!)​

तुमच्यासाठी वेळ काढणारा असावा

तुमच्यासाठी वेळ काढणारा असावा

जर तुमचा जोडीदार त्याच्या बिझी वेळापत्रकातूनही तुमच्यासाठी वेळ काढत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात. त्याच्या आयुष्यात तुमची किंमत खूप मोठी हे आणि तुमचे स्थान अव्वल आहे. ही गोष्ट चांगल्या जोडीदाराचेही लक्षण आहे. त्यामुळे अशा व्यक्तीसोबत तुम्ही सुखी संसाराची स्वप्ने पाहू शकता.

(वाचा :- मी बहिणीच्या लग्नात अप्सरेसारखी सजून पोहचली अन् समोर बघते तर काय..! ज्यामुळे आम्हा दोघींचं आयुष्य झालं बेचिराख)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …