Breaking News

अली फजल- रिचा चड्ढाच्या रिसेप्शनला जोडीनं गेले हृतिक- सबा, तर कतरिनाशिवायच दिसला विकी

मुंबई : सध्या बी टाऊनमध्ये रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नसोहळ्याची आणि रिसेप्शनचीच चर्चा आहे. लग्नसोहळ्याआधी झालेला संगीत सोहळा, हळदी आणि मेंदी सोहळ्यानंतर दोघांनी थाटामाटात लग्न केलं. लग्नानंतर या दोघांनी मुंबईत बॉलिवूडमधील मंडळींसाठी खास रिसेप्शन सोहळा ठेवला होता. हा रिसेप्शन सोहळा मुंबईतील १७६ वर्षे जुन्या असलेल्या एका मिलमध्ये ठेवला होता. या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आवर्जून उपस्थित होते. यावेळी रिचानं मल्टीकलरचा आऊटफिट घातला होता. तर अली काळ्या रंगाच्या फॉर्मलमध्ये होता. दोघंही खूप छान दिसत होते.


नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी हृतिक रोशन, सबा आजाद, विकी कौशल, मनोज बाजपेयी, तापसी पन्नू, कल्कि कोचलीन, दिव्या दत्ता, तब्बू, विशाल भारद्वाज, सान्या मल्होत्रा, आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे, सयानी गुप्ता, अमृता पुरी, सुधीर मिश्रा, करिश्मा तन्ना यांच्यासह अनेक कलाकार आले होते.

रिचा चड्ढा आणि अली फजल २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत. इतकी वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०२० मध्ये ते लग्न करणार होते, परंतु मार्चमध्ये करोनाची पहिली लाट आली त्यामुळे लग्नसोहळा रद्द करावा लागला. रिचा आणि अली २०२१ मध्ये लग्न करणार होते.


परंतु पुन्हा एकदा करोनाची दुसरी लाट आली त्यामुळे पुन्हा लग्नसोहळा रद्द करावा लागला. अखेर या दोघांनी नवी दिल्लीत लग्न केलं लग्नात जवळची मोजकी मंडळी उपस्थित होती. दरम्यान, रिचा आणि अलीनं अडीच वर्षांपूर्वी रजिस्टर लग्न केल्याचं जाहीर केलं.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

त्यानंतर दादा कोंडकेंनी दसरा मेळाव्यात भाषण करणं थांबवलंच, कारण फक्त हेच की…

मुंबई: जेव्हा जेव्हा अभिनेते दादा कोंडके यांच्याबद्दल बोललं जातं, लिहिलं जातं तेव्हा तेव्हा शिवसेना, बाळासाहेब …

Dasara Melava 2022- अवधूत गुप्ते शिंदेंच्या दरबारी, बीकेसीतील मेळाव्यात सादर केले शिवसेना गीत

मुंबई- बीकेसीतील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकरने मंचावर हजेरी लावली …