अक्षर पटेलची पडली विकेट, क्रिकेटर्सनी लावला लग्नाचा धडाका,सफेद मोत्यांत विणलेला नवरीबाईचा लेहंगा घालतोय मोहिनी

भारताचा अष्टपैलू खेळाडू akshar Patel ने त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड Meha Patel सोबत 26 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित असलेले इतर खेळाडू त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत आहेत, ज्यामध्ये आमची नजर खेचून घेतली ती वधूच्या अर्थात मेहाच्या सुंदर आणि आकर्षक लेहेंग्याने..!

हा लेहंगा होताच इतका सुंदर की त्याची माहिती काढण्याचा मोह आम्हाला सुद्धा आवरला नाही आणि आता हीच माहिती आम्ही तुमच्या सोबत सुद्धा शेअर करणार आहोत. अक्षर आणि मेहा दोघांनीआपल्या आयुष्यातील खास क्षणाकरता स्वतःसाठी आयव्हरी कलरचे आउटफिट निवडले होते, ज्यामध्ये ते खूपच सुंदर दिसत होते. दोघांनी ही लाईफटाईम मोमेंट्स अक्षरश: जगून घेतली हेच त्यांच्या गोड फोटोजवरून दिसते आहे. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम, ट्विटर @CricketCountry, CricTracker)

नवरीसोबत अक्षरने केली ट्युनिंग

नवरीसोबत अक्षरने केली ट्युनिंग

फोटोजमध्ये अक्षर पटेल आणि मेहा पटेल या नवदामपत्याने आयवरी शेडच्या कपड्यांमध्ये ट्यूनिंग केली. या खास क्षणी ते दोघेही अगदी सुंदर व नजर लागावे इतके आकर्षक दिसत होते.

हेही वाचा :  भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, "मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर..."

(वाचा :- गडगंज श्रीमंत असूनही नीता अंबानीने मुलाच्या साखरपुड्यात केली ही अनपेक्षित गोष्ट, ज्याचा वाटला पूर्ण जगाला हेवा)​

लेहंग्यावर दिसली इंट्रीकेट एंब्रॉइडरी

लेहंग्यावर दिसली इंट्रीकेट एंब्रॉइडरी

ब्रायडल लेहंगा म्हटलं की तो लालभडक किंवा गुलाबी शेडमध्येच असावा असं आधी काही वर्षांपूर्वी लोकांचं मत असायचं पण आता जमाना बदलला आणि मुलींची आवडही. आता मुली पहिल्यासारखे भडक रंगाचे ब्रायडल ड्रेस पसंत करत नाहीत तर पेस्टल रंगाला जास्त महत्त्व देतात. मेहाने घातलेल्या लेहेंग्यावर इंट्रीकेट एम्ब्रॉईडरी फ्लोरल वर्क दिसत होते आणि जरी वर्क सुद्धा होते. शिवाय हा संपूर्ण लेहंगा पांढ-या मोत्यांनी विणला गेला होता.

(वाचा :- ‘बलमा घोड़े पे सवार..’ या व्हायरल गाण्याच्या गायिकेला पाहिलं का? देखणं रूप बघून विसराल मलायका व जान्हवीची जादू)​

हेवी ज्वेलरी केली कॅरी

हेवी ज्वेलरी केली कॅरी

मेहाने तिचा ब्रायडल लूक गोल्डन नेकपीस, मॅचिंग कानातले, माथापट्टी, नथ आणि टिकली या अॅक्सेसरीजने कम्प्लिट केला होता. तिने केसांचा बन बांधला होता आणि सुंदर फुलांनी सजवला होता.

(वाचा :- वाईन कलर साडी, सोन्याचे भरगच्च दागिने, 53 वर्षांच्या भाग्यश्रीचं विशीतल्या मुलीला लाजवणारं तारूण्य करतंय अवाक्)​

हेही वाचा :  प्रजासत्ताक दिनाला भरभरून खाल्लेल्या जिलेबीचे Health Benefits जाणून घ्या

कस्टमाईज्ड बांगड्यांनी वेधले लक्ष

कस्टमाईज्ड बांगड्यांनी वेधले लक्ष

दुसरीकडे, मेहाच्या या लूकमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे तिचा बांगड्यांचा सेट होय, ज्यावर बॅट धरलेल्या एका खेळाडूचा फोटो बनवला होता आणि यातून तिने आपल्या होणाऱ्या पतीच्या प्रोफेशनबाबत अभिमान व्यक्त केला होता. प्रत्येक नवरा बायकोला आपल्या पार्टनरचा अभिमान असावा आणि त्याने तो आपल्या कृतीतून व्यक्त करावा. जसं की मेहाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

(वाचा :- Athiya Shetty बनली 2023 ची युनिक नवरी, लुकमधील या 4 हटके गोष्टींची झाली तुफान चर्चा, KL Rahul च्या नवरीचा जलवा)​

अक्षरचा लुक होता असा

अक्षरचा लुक होता असा

आता अक्षर पटेलच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याने हेवी एम्बॅलिश्ड बंदगला शेरवानी परिधान केली होती ज्यावर फ्लोरल एम्ब्रॉईडरी दिसत होती. पारंपारिक पगडी परिधान करून त्याने त्याच्या लूकला पूर्ण केले होते. शिवाय त्याच्या गळ्यात मल्टी लेयर्ड मोतीहार होता, जो लुकला अधिक जास्त स्पेशल बनवत होता.

(वाचा :- अर्जुन कपूरची प्रेयसी मलायका व बहिण अंशुलात ग्लॅमरची जुगलबंदी, मलायकाला मागे सारत अंशुलानेच लावली इंटरनेटवर आग)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …