प्रजासत्ताक दिनाला भरभरून खाल्लेल्या जिलेबीचे Health Benefits जाणून घ्या

नुकताच ७४ वा प्रजासत्ताक दिवस २६ जानेवारीला साजरा झाला. हा उत्सव भारतात उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय तिरंगा फडकवून या दिवशी आपल्या बलिदान केलेल्या विरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

अनेक ठिकाणी हा दिवस जिलेबी वाटून, खाऊन साजरा केला जातो. पण प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिनी का खाल्ली जाते जिलेबी? किंवा तुम्ही जी आवडीने जिलेबी खाताय त्याचे फायदे देखील फार आहेत. थंडीत जिलेबीचे सेवन केल्याने तुम्हाला त्याचे सर्वाधिक फायदे होतात. (फोटो सौजन्य – iStock)

या दिवसांमध्ये जिलेबी का खाल्ली जाते?

या दिवसांमध्ये जिलेबी का खाल्ली जाते?

भारतात सहज उपलब्ध होणारा गोड खाद्यपदार्थ म्हणजे जिलेबी. जिलेबी भारतीय उत्सवांमध्ये मानाचं स्थान आहे. जिलेबी हा असा पदार्थ आहे जो आवडीने खाल्ला जातो. मग कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा कोणत्याही भागात राहणारी ती व्यक्ती असो. तसेच पहिल्यांचा ,स्वातंत्र्य दिनी जिलेबी वाटून स्वातंत्र्याचे आनंद साजरा केला. त्यानंतर प्रत्येक प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य दिनी जिलेबी वाटून तोच आनंद नव्याने साजरा केला जातो.

हेही वाचा :  'या' सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

​(वाचा – १०८ किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढलं Anant Ambani चं वजन, आई नीता अंबानीने सांगितलं या आजाराचं कारण)​

जिलेबी मुळची कुठची आहे?

जिलेबी मुळची कुठची आहे?

जिलेबी हा शब्द अरबी शब्द ‘जलेबिया’ आणि फारशी शब्द ‘जलिबिया’ यावरून आला आहे. काही पुस्तकात ‘जलबिया’ असा या मिठाईचा उल्लेख आहे. ज्याचा उगम पश्चिम आशियामध्ये झाला आहे. इराणमध्ये जिलेबीला ‘जुलाबिया किंवा जुलुबिया’ या नावाने ओळखले जाते.

​(वाचा – दारूमुळे Liver सडू लागल्याची ही सुरूवातीची ६ लक्षणे, किती प्रमाणानंतर दारू बनते विष)​

भारतात जिलेबी कशी

भारतात जिलेबी कशी

तुर्की आक्रमकांसोबत जिलेबी भारतात पोहोचली. भारतातील जिलेबीचा इतिहास हा ५०० वर्षांचा आहे. भारतात सण आणि जिलेबी हे लोकप्रिय समीकरण आहे. जिलेबी वेगवेगळ्या प्रकारात खाल्ली जाते. कधी जेवणासोबत तर कधी पोह्यासोबत, रबडीसोबत, फाफडासोबतही लोकप्रिय आहे. तर कधी जिलेबी आणि मठ्ठा खाल्ला जातो. महाराष्ट्रात हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे.

​(वाचा – Piles Causing Foods : पचनक्रियेला अक्षरशः गंज लावतात हे १० पदार्थ, यामुळेच होतो मुळव्याधाचा त्रास)

दूध – जिलेबी का एकत्र खातात?

दूध - जिलेबी का एकत्र खातात?

हिवाळा सुरू झाला की, प्रत्येकाला दूध जिलेबी एकत्र खाण्याची इच्छा असते. हिवाळ्यातील अनेक कार्यक्रमातही जिलेबी- दूधचं कॉम्बिनेशन असतं.महत्वाचं म्हणजे हा कॉम्बो खाल्ल्याने थंडीची संवेदना कमी करताना शरीराला ऊर्जा प्रदान करते. गोड खाणं शरीरासाठी आरोग्यदायी नसलं तरीही गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्यास पाठदुखी, थकवा, सर्दी आणि ताप, सांधेदुखी आणि अस्वस्थता कमी होते. वृद्धांचा असा विश्वास आहे की सर्व प्रकारच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी हे जगातील सर्वोत्तम औषध आहे.

हेही वाचा :  कमी बजेटमुळे Second Hand Smartphone खरेदी करताय? या गोष्टींकडे द्या लक्ष, नुकसान होणार नाही

(वाचा – मुंबईतील साराने एक गोष्ट कटाक्षाने पाळत तब्बल २५ किलो वजन कमी केलं, असा होता डाएट)​

जिलेबीचे आरोग्यदायी फायदे

जिलेबीचे आरोग्यदायी फायदे

तज्ञांच्या मते, हिवाळ्यातील जिलेबी – दूध हे मिश्रण तणाव संप्रेरकांवर जादूसारखे कार्य करते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. इतकंच नाही तर गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्यास मायग्रेनची डोकेदुखी कमी होण्यासही मदत होते. असेही मानले जाते की, जे खूप बारीक आहेत ते वजन वाढवण्यासाठी या मिश्रणाचे सेवन करू शकतात. हिवाळ्यात गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्याने दम्यापासून आराम मिळू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

(वाचा – Suniel Shetty च्या दिवसाची सुरूवात होते या पदार्थाने, ६१ व्या वर्षी जावई KL Rahul ला लाजवेल असा Fitness)

हे कधी खावे

हे कधी खावे

तज्ञांचा असा विश्वास आहे की, दूध आणि जिलेबी हे मिश्रण सकाळी नाश्ता म्हणून घेतले पाहिजे. कारण ते दिवसभर टिकून राहण्यास मदत करू शकते.

(वाचा – शौचातून अन्नाचे तुकडे येणे हे जीवघेण्या आजाराचे लक्षण, लगेच सुरू करा २ कामं)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …