Republic Day Parade: राजपथावरील परेड पाहण्यासाठी Online तिकीट बुक करा, पाहा प्रोसेस

नवी दिल्ली: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिन जवळ येत असून सध्या देशभरात या दिवसाची तयारी जोरात सुरू आहे. या दिवशी परेडचे आयोजन केले जाते. ही परेड पाहण्यासाठी जगभरातून हजारो लोक येतात. अशात इथे जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तिकीट काढावे लागते. तुम्हाला स्वतःसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी तिकिटे खरेदी करायची असतील तर, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कारण, तुम्ही हे फक्त ऑनलाइनच करू शकता. पोर्टलद्वारे तिकिटांची विक्री केली जात असून एका दिवसात किती तिकिटे उपलब्ध होतील हे सकाळी ९ वाजता वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाते. त्यांची किंमत २० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. परेडसाठी ऑनलाइन तिकीट कसे बुक करायचे ते जाणून घेऊया.

वाचा: तुमच्या Aadhaar Card चा कधीच गैरवापर होणार नाही, फॉलो करा सोपी टिप्स, राहा सेफ

ऑनलाइन तिकीट कसे बुक करावे?

सर्वप्रथम तुम्हाला www.aaamantran.mod.gov.in वर जावे लागेल. मग तुम्हाला लॉगिन करावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमचा नंबर टाकावा लागेल आणि नंतर कॅप्चा करावा लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता. जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल. तर, तुम्हाला साइन अप करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करावे लागतील. यानंतर तुमच्या नंबरवर OTP येईल, तो टाका. आता येथून तुम्हाला ज्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्याची निवड करा.

हेही वाचा :  'आमची विवेकबुद्धी हादरली'; कायद्याच्या विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याची याचिका पाहून कोर्टानं फटकारलं

वाचा: जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, होणार फायदा, मिळेल चांगली किंमत

यामध्ये तुम्हाला रिपब्लिक डे परेड, रिपब्लिक डे परेड, रिहर्सल – बीटिंग द रिट्रीट, बीटिंग द रिट्रीट – एफडीआर आणि बीटिंग द रिट्रीट सेरेमनी पर्याय मिळतील. यशस्वी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागेल. कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाची माहिती तुम्हाला प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच त्यांचा ओळखपत्रही अपलोड करावे लागणार आहे. यासोबतच काही तपशीलही टाकावे लागतील. यानंतर तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल आणि ऑर्डर पूर्ण करावी लागेल.

सर्व तिकिटांवर एक युनिक QR कोड दिला जाईल, जो परेडच्या ठिकाणी स्कॅन केला जाईल. तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकत नसाल तर प्रगती मैदान, सेना भवन, जंतरमंतर, शास्त्री भवन आणि संसद भवन येथे जाऊन तुम्ही ऑफलाइन तिकीट खरेदी करू शकता.

वाचा: Paytm वर बुक करा ट्रेनचे तिकिट, चेक करा लाईव्ह स्टेटस, या ट्रिक्स करतील मदत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …