वाईन कलर साडी, सोन्याचे भरगच्च दागिने, 53 वर्षांच्या भाग्यश्रीचं विशीतल्या मुलीला लाजवणारं तारूण्य करतंय अवाक्

एक काळ होता जेव्हा Bhagyashree तरूणाईच्या मनावावर राज्य करत होती. सलमान सोबत केलेल्या तिच्या चित्रपटांनी रातोरात तिला जगभरात स्टार केलं. पण नंतर हळुहळू ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होत गेली.अर्थात त्याला अनेक कारणे होती. तिने सांगितले होते जेव्हा तिला पुन्हा परतावेसे वाटेल तेव्हा ती नक्की परतेल पण आत काही काळ तिची फिल्म, सिरीयल करण्याची इच्छा नाही. शेवटी दीर्घकाळ चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर भाग्यश्रीने जेव्हा पुनरागमन केले, तेव्हा तो क्षण तिच्या चाहत्यांसाठी मोठ्या सणापेक्षा कमी नव्हता.

ती जरी इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिने स्वतःचा चार्म कमी होऊ दिला नव्हता. ती तरुण असताना जेवढी फ्रेश दिसायची तेवढीच ती आता दिसत होती. शिवाय ती भले मागच्या पिढीमधली असेल पण ज्या पद्धतीने तिने स्वतःची स्टाइल आणि फॅशन आजच्या पिढीला मॅच केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. नुकतेच भाग्यश्रीने तिचे साडीतील सुंदर फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खरंच अप्रतिम दिसत आहे. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @bhagyashree.online)

वाईन कलर साडी मधला भाग्यश्रीचा अंदाज

वाईन कलर साडी मधला भाग्यश्रीचा अंदाज

भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ब्लू आणि वाईन रंगाची साडी परिधान करून जबरदस्त अदाकारी करताना दिसत आहे. भाग्यश्रीने कांजीवरम सिल्क साडी घातली होती, जी तिने तुराजा या कपड्यांच्या ब्रँडमधून पीक केली होती. या साडीवर सोनेरी जरीचे वर्क दिसत होते. बारीक धाग्यांच्या साहाय्याने दाट फुलांची नक्षी केली होती, जी खूप सुंदर दिसत होती. एकंदर ही साडी जणू भाग्यश्रीच्या सौंदर्याला खूप जास्त सूट होत होती.

हेही वाचा :  सलमानची अभिनेत्री खास व्यक्तीसोबत दुबईत, 53 वर्षीय भाग्यश्रीचा स्लिट ड्रेसमध्ये रोमान्स, फोटो व्हायरल

(वाचा :- Athiya Shetty बनली 2023 ची युनिक नवरी, लुकमधील या 4 हटके गोष्टींची झाली तुफान चर्चा, KL Rahul च्या नवरीचा जलवा)​

परिधान केली गोल्डन ज्वेलरी

परिधान केली गोल्डन ज्वेलरी

भाग्यश्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सोन्याचे दागिने घातले होते. गळ्यात सोन्याचा हार, कानात झुमके आणि हातात ब्रेसलेट दिसत होते. केसात अंबाडा घालून लो-बन स्टाइल करून तिने मिनीमल मेकअपवर भर दिला होता.

(वाचा :- अर्जुन कपूरची प्रेयसी मलायका व बहिण अंशुलात ग्लॅमरची जुगलबंदी, मलायकाला मागे सारत अंशुलानेच लावली इंटरनेटवर आग)​

साडीवर होतं गोल्डन जरी वर्क

साडीवर होतं गोल्डन जरी वर्क

याखेरीज भाग्यश्रीच्या साडीच्या बॉर्डरवर निळ्या रंगाची अत्यंत सुंदर अशी फ्लोरल एम्ब्रॉयडरी केली होती, ज्यामुळे एक अप्रतिम रंगसंगती निर्माण होत होती. हा साडी मधला एक युएसपी पॉईंट होता असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

(वाचा :- कोरियन मुलींसारखी ग्लॉसी स्किन व त्यावर चमचमतं ब्लश, नोरा फतेहीचा हा चार्मिंग लुक बघून म्हणाल, ‘जपानी गुडियॉं’)​

साड्यांचे सुंदर कलेक्शन

साड्यांचे सुंदर कलेक्शन

या 53 वर्षीय सुंदरी अभिनेत्रीजवळ तुम्हाला नेहमीच साड्यांचे सर्वोत्तम कलेक्शन पाहायला मिळेल. या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये किती सुंदर दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता. साडी परिधान करणे हा भाग्यश्रीचा छंद आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही कारण ती नेहमीच साडी मध्ये दिसते आणि तिच्या सर्वच साड्या ह्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात.

हेही वाचा :  Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

(वाचा :- KL Rahul Athiya Shetty: अखेर सुनिल शेट्टीची लेक बनली नवरीबाई, लग्नाआधीच लाल भरजरी लेहंगा घालून केलं मंत्रमुग्ध)​

साडीमध्ये असे दिसावे सुंदर

साडीमध्ये असे दिसावे सुंदर

या लूकमध्ये पहा, तिने हॉल्टर नेकलाइन ब्लाउजसह पांढरी, काळी आणि लाल प्रिंटेड साडी घातली होती, तर दुस-या फोटोत पिवळ्याधम्मक साडीवर केसांची पोनी बांधून सेम कलरची रिबीन बांधून व खळखळत्या हास्याने लुक आणखीनच सुंदर बनवला आहे. ज्यामुळे तिच्या दोन्ही लूकमध्ये आकर्षिकतेची छटा होती. तुम्हाला साडीत सुंदर कसे दिसावे याच्या टिप्स हव्या असतील तर नक्की भाग्यश्रीला फॉलो करा. तिच्या टिप्स तूमचा फॅशन आणि स्टाईल सेन्स वाढविण्यासाठी नक्कीच मदत करतील.

(वाचा :- साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्नातही जपली संस्कृती व परंपरा, 150 वर्ष जुन्या हवेलीमध्ये रचला राजेशाही विवाहसोहळा)​

भाग्यश्रीच्या फिटनेसचे व चिरतारूण्याचे रहस्य

भाग्यश्रीच्या फिटनेसचे व चिरतारूण्याचे रहस्य

भाग्यश्री आज एक फिट अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. आज तिचे वय 53 वर्षे आहे पण तिच्याकडे पाहून ती आजही तिशीतली वाटते. यामागे सुद्धा तिची खूप जास्त मेहनत आहे. भाग्यश्री इनोवेटिव्ह वर्कआउट करण्यावर जास्त भर देते. ती कोणत्याही उपकरणांशिवाय घरच्या घरी सहजपणे केला जाणारा वर्कआउट करते. एवढेच नाही तर आपला मुलगा अभिमन्यूसह हेल्दी रेसिपी व्हिडिओ देखील पोस्ट करते. शोल्डर-स्ट्रेंथ आणि बेंच प्रेस तिचे आवडते व्यायाम प्रकार आहेत. तर मैत्रीणींनो तुम्ही सुद्धा भाग्यश्रीला नक्की फॉलो करा आणि वेगवेगळे उपाय वापरून आपले सौंदर्य टिकवा व फॅशनेबल दिसा.

हेही वाचा :  सोने, चांदी अन् बरंच काही...; समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन मंदिरात सापडला मौल्यवान खजिना

(वाचा :- नीता अंबानींपेक्षाही सुंदर आहे त्यांची विहीणबाई, राधिकाच्या मेहंदीत रॉयल अंदाज दाखवत केली थेट अंबानींशी बरोबरी)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …