आरोग्यवार्ता : उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची | Adequate sleep is important for good health akp 94


गेल्या दोन वर्षे करोनाने जगभर थैमान घातले होते. त्यामुळे साऱ्यांनाच चिंता होती. यातून आरोग्याबाबत अधिक जागृती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: करोनाकाळात आरोग्य तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय करावे? यासाठी सर्वसामान्यांकडून तज्ज्ञांसह विविध माध्यमांचा आधार घेतला जात होता. अगदी इंटरनेटवर याबाबत सर्वाधिक शोधले जात होते. आहारतज्ज्ञ याबाबत विविध सल्ले देतात. उत्तम आरोग्यासाठी सात ते आठ तास झोप महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

गेल्या दोन वर्षे करोनाने जगभर थैमान घातले होते. त्यामुळे साऱ्यांनाच चिंता होती. यातून आरोग्याबाबत अधिक जागृती निर्माण झाली आहे. आरोग्यविषयक जीवनशैलीसाठी काय करावे? काय खावे असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. यातून प्रतिकारशक्ती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी किमान पाच गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यात सात ते आठ तास झोप, रोज किमान अर्धा तास व्यायाम, आरोग्यदायी असा आहार यामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश गरजेचा

आहे. पुरेसे पाणी पिणे तसेच आहारात प्रथिनांचा समावेश गरजेचा आहे. अनेक जण उशिरा उठणे, प्रक्रिया केलेले अन्न खाणे तसेच पुरेशी झोप घेत नाहीत त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. हे सर्व टाळले पाहिजे असे आहारतज्ज्ञांनी नमूद केले आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी पुरेशी झोप तसेच सकस आहार  आणि व्यायाम हे महत्त्वाचे  आहे.

हेही वाचा :  सोशल मीडियाचा वापर करून केली जातेय तरुणांची लूट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …