सोशल मीडियाचा वापर करून केली जातेय तरुणांची लूट

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप चा वापर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच करताना दिसून येतात. यात सर्वात जास्त वापर 20 ते 30 वयोगटातील तरुण करताना दिसून येतो. पालकांचं दुर्लक्ष झाल्याने मुलं सोशल मीडियाच्या आहारी जातात आणि याचा दुष्परिणाम पालकांना भोगावा लागतो. याच सोशल मीडियाचा आधार घेत नाशिक मध्ये एका तरुणाला गंडवण्यात आले आहे.

फिर्यादिने फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम शर्मा नामक एका महिलेच्या फेसबुक अकाउंट वरून नाशिक मधील एका तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. याही मुलाने ही फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारली. मुलासोबत काही दिवस चॅटिंग करण्यात आली. चॅटिंग करताना मुलाशी ओळख वाढविण्यात आली. ही ओळख अजून वाढावी याकरिता महिलेकडून मोबाईल नंबर घेण्यात आला होता.

या मोबाईल नंबरवर मुलांसोबत चॅटिंग करून संबंध वाढण्याचा प्रयन्त मुलींकडून केला जातो. यानंतर व्हिडिओ कॉल करून सदर महिला विवस्त्र होऊन अश्लील हावभाव करते. हाच व्हिडिओ कॉल महिला रेकॉर्ड करून मुलांना पाठवतात. पैसे द्या अन्यथा व्हिडिओ फेसबुक वर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. आणि यासोबत पैश्याची मागणी केली जाते.

हेही वाचा :  मोठी बातमी! तुळजाभवानीच्या चरणी फक्त 50% शुद्ध सोने, आता संस्थानाने घेतला मोठा निर्णय

बदनामी होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात याची तक्रार केली जात नाही. याचाच फायदा ह्या महिला घेत असतात.

सोशल मीडियावर येणारी प्रत्येक रिक्वेस्ट तपासून घेणे तसेच आपल्या फ्रेंड लिस्ट पैकी सदर महिलेच्या फ्रेंड लिस्ट मध्ये कोणी आहे का याची खात्री करून मगच रिक्वेस्ट स्वीकारण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर पालकांनी सुद्धा मुलाला दिलेल्या मोबाईलचा वापर योग्य कामासाठी होत आहे का याची खात्री वारंवार करत राहणे गरजेचे आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …