Sharad Pawar: ‘ना थका हूँ ना हारा हूँ’, शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात…

Sharad Pawar NCP Crisis: साल होतं 2019… राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार अशी चिन्ह दिसत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) गेम फिरवला तो पावसाच्या जोरावर… भर पावसात शरद पवारांनी भाषण ठोकलं अन् फक्त साताराच नाही तर राज्यातील समीकरण बदलल्याचं पहायला मिळालं. श्रीनिवास पाटील यांचा दणदणीत विजय झाला अन् राष्ट्रवादीला (NCP) देखील विधानसभेत 56 जागा मिळाल्या. आता राष्ट्रवादी पुन्हा अडचणीत असताना शरद पवारांना पुन्हा पावसाने आशीर्वाद दिल्याचं दिसून आलंय. 

वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले आहेत. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली. त्याचा फोटो सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे. त्यावेळी त्यांनी काही ओळी शेअर करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला आहे.

सुप्रिया सुळेंचं ट्विट-

भाग गए रणछोड़ सभी, 
देख अभी तक खड़ा हूँ मैं
ना थका हूँ ना हारा हूँ 
रण में अटल तक खडा हूँ मैं

हेही वाचा :  53 वर्षांच्या भाग्यश्रीने नेसली इतकी सुंदर साडी की पडली 27 वर्षांच्या लेकीवरच भारी, आई कोण अन् लेक कोण फरक सांगा..!

पाहा ट्विट –

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत शरद पवारांचा फोटो शेअर केला. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. त्यावेळी सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सभेपूर्वी आसनगाव येथील एका उपहारगृहाबाहेर त्यांच्या समर्थकांची भेट घेतली.

आणखी वाचा – Supriya Sule: ‘आलं तर आलं तुफान…’, सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!

अनेकजण भेटत आहेत, महिला, तरूण, जाणते अनेक भेटतायेत. प्रत्येक चेहऱ्यावर कुतूहल, आश्चर्य, अभिमान आणि त्याहीपेक्षा विश्वास आहे. हा माणूस लढतो आहे. स्वतःसाठी नाही तर तत्वांसाठी, मूल्यांसाठी, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतचा गाडीतील फोटो देखील शेअर केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …