Khayyam Birth Anniversary : आपली संपूर्ण संपत्ती दान करणारा संगीतकार

Khayyam Birth Anniversary : भारतीय संगीत जगतातील अनमोल हिरा ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम यांचा आज वाढदिवस (18 फेबुवारी) आहे. 1947 मध्ये फिल्मी करिअर सुरू करणाऱ्या खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. ‘कभी-कभी’ आणि उमराव जान या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्या संगिताने अजरामर झाले. खूप कमी संगीत प्रेमी आणि चाहत्यांना माहित असेल की संगीतकार होण्यापूर्वी ते सैनिक होते. त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यात दीर्घकाळ सेवा केली होती. यादरम्यान खय्याम दुसऱ्या महायुद्धातही लढले होते.

पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. 1953 मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले.

पद्मभूषण खय्याम यांनी उमराव जान, त्रिशूल, थोडीसी बेवफाई, नूरी, बाजार, हीर रांझासह अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है, कभी कभी मेरे दिल में, जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने, दिखाई दिए यूँ, दिल चीज क्या है, परबतों के पेडोंपर श्यामका बसेरा, मै पल दो पल का शायर हूँ, ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है, हैं कली कली के लब पर,’ अशी त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

हेही वाचा :  Bollywood Film Release 2022: बॅक टू बॅक मनोरंजनाची मेजवानी, वर्षभरात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार

खय्याम हे उत्तम संगीतकार असण्यासोबतच एक मोठ्या मनाचे माणूस देखील होते. त्यांनी आपल्या 90 व्या वाढदिवशी आपली सुमारे 12 कोटींची संपत्ती दान केली होती. या दान केलेल्या संपत्तीतून खय्याम आणि त्यांची गायिका पत्नी जगजीत कौर यांनी चित्रपट जगतातील गरजू आणि नवोदित संगीतकारांसाठी एक ट्रस्ट स्थापन केले होते. ‘खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ असे या ट्रस्टचे नाव असून गझल गायक तलत अजीज आणि त्यांची पत्नी बिना हे त्याचे मुख्य विश्वस्त आहेत. दीर्घकाळापासून फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या खय्याम यांनी 19 ऑगस्ट 2019 रोजी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमधून ते आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.  

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हा अर्थसंकल्प…’; विवेक अग्रिहोत्री यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Budget 2023: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी)  संसदेत …

द रोमांटिक्स सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज

The Romantics Trailer: प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यावर आधारित डॉक्यू-सीरिज ‘द रोमांटिक्स’ (The …