अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ या दिवशी तिच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर जियाने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. मात्र जियाने आत्महत्या केली नसल्याचं तिची आई राबिया यांनी म्हटलं होतं. जियाचा बॉयफ्रेंड अभिनेता सूरज पांचोली याने जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप राबिया यांनी केला होता. यामुळे जिया खान आत्महत्या प्रकरण चांगलच चर्चेत आलं होतं. आता ९ वर्षांनी पुन्हा एकदा या केसची चर्चा सुरू झाली आहे.
हे वाचा-आयुष्मान खऱ्या आयुष्यातही बनलेला ‘विकी डोनर’; या कारणामुळे केले होते स्पर्म डोनेट
राबिया यांनी जिया खानच्या आत्महत्येला सूरज पांचोलीला जबाबदार ठरवलं आहे. ही केस पुन्हा ओपन करावी यासाठी राबियाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राबिया यांच्या म्हणण्यानुसार सीबीआयने या केसमध्ये पुरेशी चौकशी केलेली नाही. त्यामुळे या केसचा पुन्हा नव्याने तपास करावा आणि सुनावणी पुन्हा घ्यावी. मात्र मुंबई हायकोर्टाने जियाच्या आईच्या याचिकेवर सुनावणी घेऊन याचिका फेटाळत असल्याचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर केला.
राबिया यांनी जियाच्या आत्महत्या केसचा तपास फेडरल ब्युरो ऑफ इव्हेस्टीगेशन (एफबीआय) कडे सोपवण्यात यावा असंही अर्जात म्हटलं आहे. राबिया यांचे वकील शेखर जगताप आणि सारूचिता चौधरी यांनीही मुंबई पोलिसांनी या केसबाबत सुरूवातीपासून चुकीच्या पध्दतीने तपास केल्याचे म्हटले होते. त्यानंतर जिया खान आत्महत्या केसचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र सीबीआयकडूनही त्याच त्रुटी ठेवण्यात आल्या असं राबिया यांचं म्हणं होतं. म्हणूनच स्वतंत्र तपास करावा अशी मागणी राबिया यांनी केली होती.
हे वाचा-शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ च्या निर्मात्यांवर नाराज? म्हणाले- शेवटचं कधी खरं बोलला होतात
न्यायाधीश ए. एस. गडकरी आणि एम. एन. जाधव यांनी राबियांची याचिका फेटाळताना असं म्हटलं आहे की त्यांना सीबीआयवर पूर्ण विश्वास आहे. तर सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनीही या प्रकरणी निष्पक्षपणे तपास केल्याचं म्हटलं आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या