Devednra Fadnavis, Amruta Fadnavis : काही दिवसांपूर्वी भरगच्च अशा भोजनाच्या थाळीसमोर बसून जेवणाचा आस्वाद घेताना भाजप नेत्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) देखील होते. या फोटोवरुन काही ट्रोलरांनी फडणवीसांच्या खाण्यावरुन त्यांना ट्रोल देखील केलेलं. आता फडणवीसांच्या खवय्येगिरीबद्दल खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या सहज खायचे, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे. झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या. हा एपिसोड अजून प्रसारित झालेला नाही. लवकरच हा भाग प्रसारित होणार आहे.
‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांना अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानं एक मजेशिर प्रश्न विचारला या प्रश्नाला अमृता यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. अमृता यांनी सांगितले की पातेलेभर तुपासोबत देवेंद्र फडणवीस हे 30 ते 35 पुरणपोळ्या सहज खायचे. तसेच की मी न बनवलेल्या पुरणपोळ्या खाताना त्यांना पाहण्याची माझी अशी इच्छा आहे, असंही अमृता यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं.
‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये अनेक कालाकार हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये येऊन हे कालकार वेगवेगळे पदार्थ तयार करतात. किचन कल्लाकार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करतो आणि परिक्षण हे अभिनेते प्रशांत दामले हे करतात.
हेही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha