Breaking News

अभिषेक बच्चनने मध्येच सोडला रितेश देशमुखचा शो, बिग बींरील विनोदामुळे भडकला अभिनेता; Video

मुंबई: अभिषेक बच्चन याचं त्याच्या आई-वडिलांशी खूप छान बाँडिंग आहे. तो आपल्या आई-वडिलांच्या विरोधात काहीही बोललं ऐकून घेत नाही. परंतु ‘केस तो बनता है’ कार्यक्रमात पाहुणा म्हणून गेलेल्या अभिषेकसमोर असं काही घडलं की त्यामुळे तो खूपच नाराज झाला. कार्यक्रमाचं चित्रीकरण मध्येच थांबवत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली आणि तिथून निघून गेला.

अभिषेकला का आला राग?

रितेश देशमुख, परितोष त्रिपाठी आणि कुशा कपिला यांच्या ‘केस तो बनता है’ कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. कार्यक्रमात अभिरूप न्यायालय दाखवण्यात आलं असून त्यात आरोपी म्हणून अभिषेक बच्चन सहभागी झाला आहे. अभिषेक आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला दिसत आहे. तर त्याच्या समोर परितोष विनोद सांगताना दिसत आहे. त्यामुळे वातावरण एकदम हलकफुलक होतं.

हे वाचा-तू माझ्यासाठी जग… अंजली बाईंनी शेअर केला राणादाचा कधीही न पाहिलेला VIDEO

पण जोक सांगण्याच्या भरात परितोषनं सांगणाऱ्यानं असं काही सांगितलं की त्यामुळे अभिषेक चांगलाच नाराज झाला. त्यानं आपली नाराजी परितोष समोरच रितेशकडे व्यक्त केली. कारण परितोषनं अमिताभ बच्चन यांच्यावर जोक केलेला असतो. हा जोक अभिषेकला अजिबात आवडला नाही. त्यानं त्यावर लगेचच त्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे कार्यक्रमाचं चित्रीकरणमध्येच थांबवावं लागलं.

चित्रीकरण थांबल्यावर अभिषेक म्हणाला की, ‘हे जरा अती झालं आहे. खेळामध्ये मला सामावून घेतलं आहे. माझ्या पालकांवर इथं बोलणं योग्य नाही. विनोद माझ्यापुरता मर्यादित ठेवा. वडिलांना त्यात आणणं बरोबर नाही. हे मला अजिबात आवडलं नाही. तो माझे वडिल आहे. मी त्यांच्याबाबत खूपच संवेदनशील आहे. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी थोडाफार आदर दाखवायला हवा. विनोदाच्या आड त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. विनोद करण्याच्या नादात आपण खूप वहावत जातो…मी मुर्ख नाही.’ असं म्हणून अभिषेक तिथून उठतो आणि निघून जातो.


अभिषेकनं केली का मस्करी?

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या प्रोमोची जोरदार चर्चा होती. काही नेटकऱ्यांच्या मते हा प्रँक आहे. या कार्यक्रमाच्या प्रमोशनमध्ये असं अनेकदा होतं की आलेला पाहुणा नाराज झालेला दाखवला आहे. तो प्रँक असल्याचं समोर येतं. तर दुसरीकडे अभिषेकला यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. अनेक युजर्सच्या मते जर यानं सिनेमात असा चांगला अभिनय केला तर ते अपयशी ठरले नसते. अभिषेकचं असं नाराज होणं हा प्रँक आहे की खरोखरच त्याला राग आला हे लवकरच कळले. परंतु प्रोमो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

हे वाचा-अनन्या पांडेची झाली फजिती, आर्यन खानला म्हटलं क्रश पण त्याने भर पार्टीत केलं दुर्लक्ष

अभिषेक बच्चन याच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा घुमर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर सयामी खेर दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आर. बाल्की करत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ देखील या सिनेमात दिसणार आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत; समोर आला ‘ताली’चा फर्स्ट लुक

Check Also

बादशाहच्या आवाजाचे नमुने घ्या, कोर्टाचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदिया याला एका प्रकरणाच्या …

अवधुत गुप्ते शिंदे गटात? शिवसेना गीतामुळे झालेल्या चर्चांवर दिलं उत्तर

मुंबई, 06 ऑक्टोबर : यंदा मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले. शिवाजी पार्कात शिवसेना …