अबब! अवकाशातून दिसत होती इतकी भीषण आग; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

US Chicago Firing: अमेरिकेतील शिकागो येथील मॉर्गन ली मॅन्युफॅक्चरिंग (Morgan Li manufacturing) ला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 500,000 स्क्वेअर फुटांचं गोदाम जळून खाक झालं. NBC Chicago च्या वृत्तानुसार, सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास Morgan Li मध्ये आग लागली. Washington Avenue च्या 1100 block मध्ये ही आग लागली होती. 

या आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आग इतकी भयंकर होती की, गोदाम (Warehouse) पूर्णपणे खाक झाल्याचं दिसत होतं. आगीनंतर धुराचे लोट हवेत होते. ही आग आकाशातूनही दिसत होती. 

एका साक्षीदाराने ABC Chicago शी बोलताना आपण कधीही इतकी मोठी आग पाहिली नसल्याचं म्हटलं आहे. “मी नुकतंच हवेत धुराचे ढग पाहिले आहेत. ते पूर्णपणे काळ्या रंगाचे होते. माझ्या आयुष्यात मी कधीही असं काही पाहिलं नव्हतं. फक्त चित्रपटांमध्ये मी पाहिलं आहे,” असं या साक्षीदाराने म्हटलं.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसंच घटनास्थळी आगीवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक पथकं तैनात कऱण्यात आली होती. आग लागली तेव्हा कोणीही आत नव्हतं. आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान आगीचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

हेही वाचा :  Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

हे गोदान Morgan Li च्या मालकीचं आहे. ही कंपनी कस्टम फर्निचरची निर्मिती करते. त्यांनी वर्षभरापूर्वी शिकागो हाइट्सची मालमत्ता घेतली होती.

मॉर्गन लीच्या प्रवक्त्यांनी फेसबुकवर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, “सोमवारी 6 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 1001 वॉशिंग्टन स्ट्रीट, शिकागो हाइट्स येथील आमच्या कारखान्यात आग लागली. आगीत मोठे नुकसान झाले असले तरी, सर्वात महत्त्वाचे गोष्ट अशी आहे की आमचे सर्व लोक सुरक्षित आहेत”.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …