Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी  7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याती मागणी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यात यावं ही यातील प्रमुख मागणी आहे. बंदच्या निमित्ताने शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. लाल महालाजवळ जाहीर सभेने मोर्चाचा समारोप होणार आहे.

हेही वाचा :  Ram Mandir Ayodhya : चार्टर्ड प्लेनने अभिताभ बच्चन आणि माधूरी दीक्षित पोहोचणार अयोध्येला

पुरोगामी संघटनांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

विविध सामाजिक संघटना, दलित संघटना, राज्यातील विरोधी पक्ष तसेच पुरोगामी संघटनांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल आहे. शहरातील व्यापारी महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे मर्चंट चेंबर त्याच प्रमाणे वाहतूक संघटनानी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केला आहे. 

संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत तसेच महापुरुषाबाबत वारंवार अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे शहर बंद बाबत पुकारण्यात आला आहे. त्याविरोधात संपूर्ण मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संबधित संघटनांनी घेतला आहे. मार्केट यार्ड आज रात्रीपासूनच बंद आहे.

शाळा बंदबाबत संभ्रम, सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम!

शहरातील शाळा महाविद्यालयमध्ये बंद बाबत कुठल्याच स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. असं असलं तरी रिक्षा वाहतूक तसेच सार्वजनिक वाहतुकीवर बंदचा परिणाम अपेक्षित आहे. त्यामुळे शाळामध्ये फारशी उपस्थिती असण्याची शक्यता नाही. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सुमारे साडेसात हजार पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. 

पुण्यात या रस्त्यावरील वाहतूक बंद

पुण्यामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल समोरच्या काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
– लक्ष्मी रस्ता : सोन्या मारुती चौक ते टिळक चौक
– शिवाजी रस्ता : स गो बर्वे चौक ते बेलबाग चौक
– बाजीराव रस्ता : पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक
– गणेश रस्ता : फडके हौद चौक ते जिजामाता चौक
– केळकर रस्ता : आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक

हेही वाचा :  Sunny Leone मुळे पाकिस्तानात नवा राजकीय वाद! जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …