सुधारा या 5 सवयी, वाचेल हजारो रूपये फी व येईल गाढ शांत झोप

झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही मनाला वाटेल तेव्हा झोपाल आणि त्याचे फायदे शरीराला मिळतील. गोष्टी एवढ्या सोप्प्या असत्या तर आजार कदाचित उद्भवलेच नसते. त्यामुळे लक्षात घ्या की रात्री पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य चांगले राहते. झोपेचे तास वयानुसार कमी किंवा वाढू शकतात. प्रौढांसाठी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रात्री झोप न लागणे हा देखील एक आजार आहे ज्याला अनिद्रा (Insomnia) असं म्हणतात.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा सांगतात की, “दिवसभर अॅक्टीव्ह राहण्यासाठी शरीराला रात्री 6 ते 8 तासांची पुरेशी आणि चांगली झोप गरजेची असते. परंतु बरेच लोक असे हे करू शकत नाही. ते आपल्या शरीराला एवढी झोप देण्यास अपयशी ठरतात. लोकांना कमी झोपेचे कारण विचारले तर सगळ्यांचे एकच उत्तर असते की रात्रीची झोपच लागत नाही. पण कोणी हा विचार करतच नाही की रात्रीची झोप का येत नाही. त्यामागे आपल्याच काही सवयी कारणीभूत आहेत का?” आज आम्ही तुम्हाला अशाच सवयींबद्दलं सांगणार आहोत ज्या रात्री झोप न येण्याला कारणीभूत ठरू शकतात.

हेही वाचा :  विस्कटलेले केस, हाय हिल्स अन् शॉर्ट ड्रेस, काजोलची लेक न्यासा देवगणचा लुक चर्चेत

झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरू नयेत

बहुसंख्य लोकांना झोपण्यापूर्वी चित्रपट पाहण्याची किंवा मोबाईल वापरण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का, हे डिव्हाईस तुमच्या झोपेचे शत्रू आहेत. तुमच्या फोनमधून निघणारा निळा प्रकाश तुमच्या सर्केडियन रिदममध्ये अडथळा आणतो. त्यामुळे तुम्हाला पुरेशी किंवा आरामदायी झोप घेता येत नाही. याव्यतिरिक्त, हा प्रकाश मेंदूतील मेलाटोनिनचे उत्पादन देखील कमी करतो, जे झोपी जाणे आणि पुन्हा जागे होणे या स्लीप सायकलमधील हार्मोनचे नियमन करते. मेलाटोनिनच्या कमततेमुळे निद्रानाश, चिडचिड होऊ शकते.

(वाचा :- Mental Health Tips : मेंटल हेल्थ खराब करतात या गोष्टी, झोप आणि शांती घेतात कायमची हिरावून, व्हा सावध)

रात्री हलका आहार घ्यावा

दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वात मोठे जेवण असावे. रात्रीचे हलके जेवण आरोग्यासाठी फायदेशीर असते. हलके जेवण म्हणजे कमी खाणे असा त्याचा अर्थ नाही तर जेवण असे असावे जे पचायला हलके असेल. याउलट झोपण्यापूर्वी पोटभर खाल्ल्याने झोपेत अडथळा निर्माण होतो. कारण रात्री पचनसंस्था मंद गतीने काम करते आणि अन्न पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे शरीर आराम करू शकत नाही.

(वाचा :- Uric Acid : गुडघ्यासोबत सांधेही होतील लाकडासारखे खिळखिळे, हे पदार्थ हाडांत भरतात युरिक अ‍ॅसिड, चुकूनही खाऊ नका)

हेही वाचा :  विकली जाणारी लोक असतात तेव्हा... निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

कॅफिनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करणे

कॅफिनयुक्त पदार्थ तुमच्या शरीराला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आळस कमी करण्यासाठी बहुतेक लोक सकाळी चहा/कॉफीने दिवसाची सुरूवात करतात. या पेयांचे नियमित प्रमाण जरी आरोग्यदायी असले तरी, जर तुम्ही त्याचे प्रमाणाबाहेर सेवन करत असाल तर यामुळे तुमची झोप खराब होणारच कारण ही पेये शरीराला सतत अॅक्टीव्ह ठेवतात आणि यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो.

(वाचा :- Walking for Heart : रोज न चुकता इतकी पावलं चाला, हृदय होईल ‘Bulletproof’, पण सोबत ठेवावी लागेल ‘ही’ 1 वस्तू..!)

चांगल्या झोपेसाठी नॅच्युरल लाईटमध्ये राहा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा आपण स्वतःला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवतो तेव्हा शरीरात मेलेनिनची कमतरता असते, ज्यामुळे मेलाटोनिन हार्मोन तयार होतो. मेलाटोनिनच्या मदतीने तुमचा मेंदू झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ लक्षात ठेवतो. म्हणूनच अधिकाधिक नेच्युरल लाईट मध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला उत्तम झोप मिळेल आणि तुमचं आरोग्य देखील हेल्दी राहिलं.

(वाचा :- Joint Pain: पुरूषहो, सर्व समस्या व गुडघेदुखीतून मिळेल 100 टक्के कायमची मुक्ती, फक्त भाजून खा या भाजीच्या बिया)

तणावमुक्त आयुष्य जगा

तणाव आणि झोप यांचा एकमेकांशी संबंध आहे. जर तुम्ही तणावात असाल तर तुम्हाला झोप येत नाही आणि रात्री नीट झोप न आल्यास दिवसभर तणाव जाणवतो. म्हणूनच नैराश्यग्रस्त किंवा तणावग्रस्त लोकांना झोपेचे औषध दिले जाते. तज्ञांचे म्हणणे आहे की झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या ताण प्रतिसाद प्रणालीला चालना मिळते, ज्यामुळे तणाव संप्रेरक असलेला कॉर्टिसॉल हा घटक वाढतो आणि झोपेमध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करायला शिका.

हेही वाचा :  अनेक महिने 'या' गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर सोनम कपूर राहिली प्रेग्नेंट, गायनेकोलॉजिस्टने केली मोठमोठी सिक्रेट्स उघड..!

(वाचा :- Yoga for Healthy Lung: थंडीत फुफ्फुसांना असतो इनफेक्शनचा सर्वात जास्त धोका, ऑक्सिजन बंद होण्याआधी करा हे 1 काम)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

या कारणांमुळे लागत नाही रात्री शांत झोप..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा …

मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड

Amravati Melghat Water Problem : हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा म्हणजे मेळघाट. …