कोणत्याही परिस्थितीत भारताला आपल्या बाजुने घ्या, जपानच्या माजी पंतप्रधानांनी का केलं हे वक्तव्य

टोकियो : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. भारत वगळता क्वाडचे सर्व सदस्य देश (अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करत आहेत आणि त्यांनी रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. मात्र रशिया-युक्रेन युद्धावर भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. रशियावर कारवाई करण्यासाठी अमेरिका भारतावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता क्वाडचे सदस्य योशिहिदे सुगा, जपानचे माजी पंतप्रधान, यांनीही रशियन हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

सुगा (Yoshihide Suga) म्हणाले की, रशियन हल्ल्याचा निषेध करण्यास भारताची इच्छा नसतानाही, क्वाड देश अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने भारताला आपल्या बाजुने ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जपानच्या फुजी टीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना ते (Yoshihide Suga) म्हणाले की, स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिकच्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी या चार राष्ट्रांच्या फ्रेमवर्कचे (QUAD) संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असेल. जपान भारताला संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.

या कार्यक्रमात त्यांना (Yoshihide Suga) विचारण्यात आले की, “रशियाच्या युद्धाविरुद्ध समान भूमिका घेण्यास भारताचे मन वळवण्यात क्वाड सिक्युरिटी डायलॉगचे सदस्य यशस्वी का झाले नाहीत?” संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियन आक्रमणाचा निषेध करणाऱ्या ठरावावर मतदान करण्यापासूनही भारताने अंतर राखले आहे, यावरून भारताला या मुद्द्यावर तटस्थ राहायचे आहे हे दिसून येते.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला माणूस शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

वरील प्रश्नाला उत्तर देताना योशिहिदे सुगा म्हणाले की, ‘भारतासमोर सुरुवातीपासूनच सर्वात मोठे आव्हान होते.’ ते म्हणाले की इंडो-पॅसिफिकसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून क्वाडचा पाठपुरावा करण्यात भारताला सुरुवातीला रस नव्हता. सुगा म्हणाले, ‘परंतु जपानच्या दृष्टिकोनातून भारताचा क्वाडमध्ये समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे होते, त्यामुळे भारताचा क्वाडमध्ये समावेश करण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले.’

ते पुढे म्हणाले, ‘मी पंतप्रधान असताना चारही देशांचे नेते प्रत्यक्ष भेटले. आता पुन्हा हे चार नेते जपानमध्ये एकत्र येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

जपानच्या माजी पंतप्रधानांनी देखील रशियाबद्दल भारताच्या भूमिकेबद्दल आपली समज दर्शविली. ते म्हणाले, ‘चीनसोबत भारताचे संबंध तणावपूर्ण आहेत. भारत रशियाला महत्त्वाचा देश मानतो.

क्वाडसाठी केवळ भारतालाच आपल्या बाजूने ठेवणे महत्त्वाचे नाही, तर इतर देशांनाही आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचे योशिहिदे सुगा यांनी सांगितले. आशियाई देशांनाही आपल्या बाजुने आणले पाहिजे.

ते (योशिहिदे सुगा) म्हणाले की, ‘जर जपानच्या राष्ट्रीय हिताचा विचार केला तर भारताला क्वाड ग्रुपमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच आपण चीनला स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशात प्रवेश करण्यापासून रोखू नये.

हेही वाचा :  चांद्रयान-3 नंतर भारत आता थेट मानवाला अवकाशात पाठवणार; 'गगनयान' मोहिमेतील महत्वाची चाचणी यशस्वी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …