“मोदी सरकारमुळे महिलांची उंची वाढली”; जाहीर सभेत भाजपा नेत्याचं अजब विधान

The Height Of Women Increased In Modi Government: भारतीय जनता पार्टीकडून (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) सरकारला सत्तेत येऊन 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन मागील काही दिवसांपासून केलं जात आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात नेमकं काय काय काम झालं हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मोहिमेमधून केला जात आहे. यामध्ये अगदी उज्वला योजनेपासून ते नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकपासून ते आर्थिक विकासाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. मात्र हरियाणामधील भाजपाच्या एका मंत्र्याने एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय महिलांची उंची वाढल्याचा अजब दावा केला आहे. महिलांच्या उंचीचा संबंध या नेत्याने सरकारकडून ग्रामीण भागात पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आणि रोजगाराशी जोडला आहे.

नेमकं काय म्हणाला हा नेता?

पन्नाप्रमुख संमेलनामध्ये बोलताना भाजपाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी हे विधान केलं आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये माझ्या बहिणींची उंची 2-2 इंचांनी वाढली असल्याचा दावा करतानाच सर्वच महिलांबरोबर असं झाल्याचं धनखड म्हणाले आहेत. “आधी महिला डोक्यावर पाणी आणि शेण वाहून न्यायच्या मात्र आता मोदी सरकारने प्रत्येक घरात गॅस आणि पिण्याचं पाणी पोहचवल्याने माहिलांची या कामातून मुक्तता झाली आहे. त्यामुळेच त्यांची उंची वाढली आहे,” असं धनखड यांनी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना बरंच अंतर डोक्यावर हंडे घेऊन यावं लागायचं. तसेच शेण म्हणजेच चुल्हीच्या इंधनासाठीही त्यांना डोक्यावरुन भार आणावा लागायचं हे आता बंद झाल्याने महिलांची उंची वाढल्याचं तर्क धनखड यांनी आपल्या विधानामधून मांडलं आहे. त्यांच्या विधानाचा हा व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

भाजपा नेता होतोय ट्रोल, लोक म्हणाले, मोदी अजून एकदा निवडून आले तर…

या विधानावरुन लोकांनी धनखड यांना ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळे तर्क लावत या नेत्याच्या विधानावरुन प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हेही वाचा :  समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्याला होणार थेट फायदा, वाचा संपूर्ण प्लान

1) काय बोललात तुम्ही?

2) हेच सर्वात मोठे भक्त

3) हे खरं असू शकतं

4) अजून एकदा मोदी निवडून आले तर..

5) माझी नाही वाढली उंची

मागील 2 दिवसांपासून धनखड यांचं हे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा :  Knee pain: तुम्हाला ही गुडघे दुखीचा त्रास आहे? वैज्ञानिकांनी शोधला नैसर्गिक उपचार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

याला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजारच्यांचा दारात जाऊन आईने वाजवला ढोल… Video व्हायरल

Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना यश-अपयशाचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी चांगले गुण …

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …