Maharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रातून आता अवकाळीनं काढता पाय घेतला असून, कमाल तापमानाच काहीशी वाढ नोंदवली जाऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. तसं झालंही. सकाळच्या वेळी राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं. पण, आता पुन्हा एकदा राज्याला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather heavy rain storm predictions hailstorm in northern india )

7 ते 9 एप्रिल या दिवसांदरम्यान राज्यात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात पावसामुळं शेतपिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. 

जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, वर्धा, नागपूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालू शकतो. तर, तिथे कोकण किनारपट्टीवर उष्ण- दमट वारे पुन्हा वाहून दुपारच्या वेळी उन्हची चांगलीच तीव्रता जाणवू शकते. त्यामुळं आवश्यकता नसल्याच दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे. 

देशातील हवामानाची काय परिस्थिती? 

‘स्कायमेट’च्या (Skymet) अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये आसाम, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल. तर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पर्वतीय पट्ट्यांमध्ये हलक्या स्वरुपातील बर्फवृष्टी होऊ शकते. उर्वरित पूर्वोत्तर भारत, केरळ, तामिळनाडूच्या काही भागांत हलक्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आलीआहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, कर्नाटक, ओडिशा, हिमालयाचा पश्चिम भाग आणि पंजाबमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. 

हेही वाचा :  Google Search चे एक्सपर्ट व्हाल, फक्त या ५ सोप्या ट्रिक्स करा फॉलो

पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं देशातील बहुतांश राज्यांत पावसाचा शिडकावा होऊ शकतं अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. किमान 2 ते 3 दिवसांनी ही परिस्थिती सुधारणार असून, त्यानंतर कमाल तापमानात वाढ होईल. 

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), काश्मीरचं खोरं (Kashmir), स्पितीचं खोरं या भागांत थंडी काही अंशी वाढेल, तर अती उंचीवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टीचाही इशारा हवामान खात्यानं दिला आहे. सध्याच्या घडीला हिमाचल आणि त्या आजुबाजूच्या पट्ट्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या पाहता तिथल्या हवामानाचा अंदाज घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. 

 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …