महाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात ‘वज्रमूठ’, 16 एप्रिलला ‘विश्वास प्रदर्शन’

Maha vikas Aghadi Sabha in Nagpur  : नागपूर : छत्रपती संभाजीनगरनंतर महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला ‘वज्रमूठ’ सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे. सभा जागेचे मविआच्या नेत्यांनी पाहणी केली. 16 एप्रिलची सभा शक्तिप्रदर्शन नसून लोकांचे विश्वास प्रदर्शन असणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते सुनील केदार यांनी दिली आहे. 

 महाविकास आघाडीची बैठक झाली. दर्शन कॉलनीतील ग्राउंड सभेसाठी ठरले आहे. 16 तारखेच्या सभेतून राजकीय उत्तर मिळतील. नागपुरातील महाविकास सभेसाठी नागपुरातील दर्शन कॉलनीचे मैदान निश्चित केले आहे. ज्या जिल्हयात झेडपी, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत आम्ही निवडणून येतो तो भाजपचा गड कसा, असा सवाल कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

ही सभा लोकांचे विश्वास प्रदर्शन असणार आहे, ती सभा राहणार आहे, शक्तीप्रदर्शन राहणार नाही. टार्गेट नाही राहणार, सर्वाधिक मोठी सभा होईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सभेच्या मुख्य आयोजक म्हणून सुनील केदार यांची निवड करण्यात आली. विदर्भात प्रसिद्धी केली जाईल. तिन्ही पक्षाचा तीन तीन लोकांची समिती तयार केली जाईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा :  मोठी बातमी; इशारा मिळाला आणि नको असतानाही अखेर 'तो' आलाच

विदर्भ ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, ते उपस्थित राहतील. काल उपस्थित राहणार नव्हते हे वेळेपूर्वी कळवले होते. विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सध्या एकमेव आवाज बोंबाबोंब करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याला बोंबाबोंब करत आहे असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.भाजपच्या यात्रेना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गोमूत्र शिंपडत जा असा नवीन फंडा सुरु केला आहे. लोकांना माहीत आहे, मागील दहा महिन्यात जे झाले. न्यायालयाने नपुंसक म्हटले आहे. त्यामुळे खरंतर त्यांच्यावर गोमूत्र शिंडपण्ची वेळ आली आहे, अशी भाजपवर त्यांनी यावेळी टीका केली. 

दरम्यान, वडेट्टीवार यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खुर्ची मोठी होती. हे विरोधकाने पेरलेली बातमी आहे. आमच्यामध्ये कोणाची खुर्ची मोठी आणि लहान हे ठरवण्याचा अधिकार महाविकास आघाडीला आहे. मुख्यमंत्री मोठे उपमुख्यमंत्री मोठे यावर बोलायची गरज नाही.  बावनकुळे 58 कुळे 56 कुळे काय म्हणाले ते सोडा…16 एप्रिलला सभा होणार आहे, हे लक्षात घ्या, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …