राज्य शासन पाडणे निष्फळ ठरल्याने आता मंत्री, नेत्यांच्या बदनामीची मोहीम

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने भाजपने आता या सरकारचे मंत्री व नेते यांना बदनाम करण्याची मोहीमच उघडली असल्याचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर साधला.

Jayant Patil advises Modi government to bring back Indians stranded in Ukraine

जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा

कराड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने भाजपने आता या सरकारचे मंत्री व नेते यांना बदनाम करण्याची मोहीमच उघडली असल्याचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर साधला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमानिमित्ताने कराडमध्ये आलेले जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांना एक प्रकारे ओढून-ताणून अडचणीत आणण्याच्या दृष्टीने हे कारवाईचे प्रकरण तयार करण्यात आले असल्याचे सांगत पाटील यांनी सक्त वसुली संचनालयाच्या ( ईडी) कारवायांबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत पाटील म्हणाले, की रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे याबाबत वाद निर्माण करण्याची गरज नाही.

हेही वाचा :  लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State government failed campaign discredit ministers leaders yshSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …