राम नवमीच्या उपवासाचे आरोग्याला होणारे फायदे, काय सांगतात तज्ज्ञ

‘उपाशी दुप्पट खाशी’ असं खरं तर म्हटलं जातं. पण आपण उपवास हा खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या आणि भक्तीपूर्णदृष्ट्या दोन्ही अर्थाने करायला हवा. एक दिवस उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून पोटातील जळजळ आणि त्रास याला आराम देण्याला महत्त्व आहे.

राम नवमीच्या दिवशी तुम्हीही उपवास करणार असाल तर आरोग्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेऊन त्याप्रमाणेच उपवास करा. तुपकट आणि तेलकट उपवासाचे पदार्थ न खाता सात्विक पदार्थांकडे, ताज्या फळांकडे लक्ष देऊन त्याचे सेवन करा आणि उपवास सफल करा. आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी या उपवासाचे महत्त्व आरोग्यदृष्ट्या काय असावे सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

शरीरातील विषहरण

शरीरातील विषहरण

रामनवमीच्या उपवासादरम्यान हानिकारक विषारी पदार्थ आणि अपचन होणारे पदार्थ शरीरातून काढून टाकून शरीरातील विषहरण करण्यास मदत करणे हाच उद्देश आहे. यामुळे शारीरिक स्वास्थ्य आणि आजारापासून दूर राहण्याचा महत्त्वाचा भाग आहे. मार्च – एप्रिल महिन्यात वातावरण बदलून अचानक उष्णता वाढते. याचाच परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून हे व्रत करण्यात येते.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

मानसिक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

अपचन, पोटात जळजळ अथवा वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने आणि वातावरण बदलल्याने मानसिक त्रासही होत असतो. उपवास केल्याने पोटाला शांतता मिळते आणि मानसिक आरोग्यातही बदल घडण्यास मदत मिळते. त्यामुळे रामनवमीच नाही तर किमान आठवड्यातून एकदा उपवास करणे योग्य ठरते असे डॉक्टरांनी सांगितले.

(वाचा – नियमित हुक्का पिण्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा कॅन्सर, वेळीच व्हा सावध! तज्ज्ञांचा इशारा)

उपवासाचा प्रकार निवडा

उपवासाचा प्रकार निवडा

उपवास करण्याआधी तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवासाचा प्रकार निवडा. काही व्यक्कती पूर्ण दिवस उपवास करतात ज्यामध्ये काहीच खाल्लं जात नाही. मात्र हे योग्य नाही. तर काही जण अंशिक उपवास करतात. यामध्ये फळ, दुधाचे सेवन करण्यात येते.

तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. मात्र अंशिक उपवास करून फळ, दुधाचे सेवन अथवा काही अंशी खाण्याचे पदार्थ खाणे पोटासाठी उत्तम ठरते. जेणेकरून पोटात गॅस निर्माण होत नाही आणि सात्विक पदार्थ पोटात जाऊन पोट शांत राहाते.

(वाचा – Weight Loss: वजन कमी करण्यासाठी १ चमचा अळीव ठरतील फायदेशीर, लोण्यासारखी वितळेल पोटावरील चरबी)

हेही वाचा :  आता शास्त्रज्ञांनीच सांगितले नवरात्री आणि रमजानच्या उपवासाचे फायदे

वेळेचे पालन करा

वेळेचे पालन करा

उपवास करताना वेळेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्यतः उपवास सूर्योदयापूर्वी सुरू होतो आणि सूर्यास्तानंतर समाप्त होतो. या दरम्यान अति तिखट अथवा तेलकट – तुपकट पदार्थ खाण्यापासून दूर राहावे. उदा. साबुदाणे वडे अथवा उपवासाचे बटाटेवडे असे पदार्थ खाऊ नये.

दारू-सिगारेटपासून दूर राहा

दारू-सिगारेटपासून दूर राहा

आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या दारू अथवा सिगारेट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे आरोग्य खराब होते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी या गोष्टी अधिक काटेकोरपणे पाळाव्यात. अन्य दिवशीही याचा वापर न केल्यास उत्तम.

(वाचा – रमजानला खाल्ल्या जाणाऱ्या खजुराचे आहेत जादुई फायदे, रोज सकाळी खा भिजवलेले ४ खजूर)

उपवास कसा सोडावा

उपवास कसा सोडावा

आरोग्याची काळजी घेताना उपवास सोडतानाही काळजीपूर्व सोडावा. फळं, दूध अशा साधारण खाद्यपदार्थांनीच सुरूवात करावी आणि उपवास सोडताना मसालेदार अथवा तेलकट खाण्यापासून दूर राहावे. असे केल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवणार नाही आणि जेणेकरून तुमच्या उपवासाचा उद्देश पूर्ण होईल आणि आरोग्य चांगले राहील.

रामनवमी असो अथवा कोणताही उपवास असो आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आरोग्याला फायदेच मिळतात असे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा :  Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: ‘अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..’, पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप

Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार …

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र …