Crime News: मुंबईत महिला सब-इन्स्पेक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ, तोडून दरवाजा उघडला तर समोर…

Crime News: मुंबईतील (Navi Mumbai) कुर्ला येथे नियुक्त करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. कुर्ला येथील निवासस्थानी तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. शीतल येडके असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. नेहरु नगर पोलीस ठाण्यात तिची नियुक्ती होती. शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने एका वर्षापेक्षा अधिक काळ ती सेवेतून बाहेर होती.

शीतलच्या घऱातून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीचा वास येत होता. यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन सांगितलं असता ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरवाजा तोडून आत घरात प्रवेश केला असता शीतल येडके खाली जमिनीवर मृतावस्थेत पडलेली होती.

हा मृतदेह कुजू लागला होता. पोलिसांनी यानंतर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. सरकारी रुग्णालयात मृतदेहाची तपासणी केली जात आहे. मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नेहरु नगरमधील महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्या घऱात सापडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला घटनास्थळी सुसाईड नोट किंवा कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही. याप्रकरणी तपास सुरु आहे”.

शीतल येडके कुर्ला येथील कामगार नगरमध्ये एकटीच राहत होती. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने गेल्या एक वर्षापेक्षा अधिक काळापासून शीतल येडके सेवेत नव्हती

हेही वाचा :  धक्कादायक! राज्यामध्ये होमगार्डची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; थरार CCTV मध्ये कैद



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …