राहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर…; ‘मी सावरकर नाही’ विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले

Eknath Shinde on Rahul Gandhi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिवेशनाच्या समारोपाचं भाषण करताना अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांना लक्ष्य करताना फक्त पायऱ्यांवर बसून स्टंटबाजी करण्यात मश्गुल आहेत अशी टीका केली. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींबद्दल केलेल्या टिप्पणीचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. सावकरांचा (Veer Savarkar) अपमान सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. 

“विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. आम्ही फार संयम ठेवला. कोणीही मर्यादा ओलांडण्याची गरज नाही, त्याची एक सीमा असते. आम्ही फक्त एक दिवस उत्तर दिल्यानंतर लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असा आरोप आमच्यावर करण्यात आला. सावकरांचा वारंवार अपमान राहुल गांधी करत आहेत. आजही त्यांनी अपमान केला आहे. सावरकर हे फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचं दैवत आहे. ज्या मरणयातना त्यांनी भोगल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतक्या हालअपेष्टा सोसल्या. राहुल गांधींनी एक दिवस सेल्यूलर जेमध्ये जाऊन राहावं. अर्ध्या एका तासासाठी घाण्याला जुंपल्यानंतर त्यांना त्यांच्या काय वेदना आहेत त्या कळेल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

हेही वाचा :  Eknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण; वाचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम

“त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. आम्हाला संताप, राग, चीड येण्याचं कारण काय हेदेखील समजलं आहे. रोज जर तुम्ही सावरकरांचा अपमान केलात तर सहन करणार नाही. राहुल गांधींना शिक्षा मिळालीच पाहिजे,” असंही एकनाथ शिदे म्हणाले. 

पुढे त्यांनी सांगितलं की “मोदींबद्दल जे विधान केलं त्याबद्दल कोर्टाने शिक्षा दिली आहे. हा कायदा काँग्रेसनेच केला होता. सुप्रीम कोर्टाने निकालात या कायद्यामुळे, नियमामुळे लालूप्रसाद, जयललिता. रशिद मसूद, जगदीश शर्मा, मोहम्मद फैजल, आशा राणी, सुरेश हळवणकर असे बरेच जण निलंबित झाले. त्यावेळी कोणी अशी निदर्शनं केली नाहीत. तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का?,” अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली. 

“राहुल गांधी यांनी पंतप्रधान नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. या निर्णयानंतर कायदा करण्यासाठी विधेयक काढलं होतं, ते यांनीच फाडलं होतं. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांनी हा काय मूर्खपणा म्हणत विधेयक फाडून टाकलं होतं. राहुल गांधींना निलंबित करताना नियमाची अंमलबजावणी केली आहे. राहुल गांधी आजही त्याच पद्दतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, रस्त्यावर फिरुन देणार नाही,” असा इशारा देत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केला. 

हेही वाचा :  वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार

Weather Update in India, Heavy Rainfall : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स हाती आली आहे. देशात उष्णतेच्या …

नव्या संसद भवनाचे आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन, 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन …