Adani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले…

Adani Group counters Rahul Gandhi: भर सभागृहात काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक फोटो झळकावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचा हा फोटो होता. त्यावेळी राहूल गांधी यांनी खणखणीत भाषण ठोकत अदानी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळी त्यांनी 20,000 कोटी कुठून आले? असा प्रश्न उपस्थित करत भाजपवर सडकून टीका देखील केली होती. त्यानंतर आता अदानी समुहाने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

अब्जाधीश उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांच्या समुहाने सोमवारी, 2019 पासून त्यांच्या कंपन्यांमधील 2.87 अब्ज डॉलर किमतीच्या भागविक्रीचे तपशील सूचीबद्ध केले आहेत. अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.

Adani Group ने काय उत्तर दिलं?

अबू धाबीमध्ये असलेल्या जागतिक धोरणात्मक गुंतवणूक कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी PJSC (IHC) यांच्यासारख्या गुंतवणूकदारांनी, अदानी एंटरप्राइझ लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) सारख्या कंपन्यांमध्ये USD 2.593 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :  तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?

नवीन व्यवसाय विकासासाठी आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड सारख्या पोर्टफोलिओ कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवल्याची माहिती अदानी समुहाने (Adani Group) दिली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जे आरोप केले होते, ते आरोप एका रिपोर्टमध्ये करण्यात आले होते. त्या रिपोर्टचं खंडण अदानी समुहाकडून करण्यात आलंय. आम्ही एक्सचेंजच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत आहोत, असं समुहाने सांगितलंय. प्रवर्तक, मालकी आणि निधी उभारणी यांसारख्या गोष्टींमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

आणखी वाचा – Sharad Pawar : अदानी प्रकरणानंतर आता मोदी डिग्री प्रकरणावरुन शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर

दरम्यान, अदानी टोटल गॅस लिमिटेडमधील 37.4 टक्के भागभांडवल फ्रेंच फर्मला USD 783 दशलक्षमध्ये विकलं गेलं, अशी माहिती देखील दिली आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समुहावर अनेक आरोप केले जात होते. तर राजकीय कट्ट्यावर देखील हा मुद्दा उपस्थित केला जात होता. त्यानंतर आता अदानी समुहाने उत्तर दिलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …