सलमानच्या या अभिनेत्रीने सांगलीच्या राजमहालातून पळून केले एका सामान्य माणसाशी लग्न

रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या भाग्यश्रीची लव्हास्टोरी देखील खूपच युनिक आहे. भाग्यश्रीने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सांगलीच्या राजघराण्यातील ही राजकुमारी तिच्या प्रेमासाठी सर्व बंधने तोडून एका सामन्य माणसाच्या प्रेमात पडली. (फोटो सौजन्य :- bhagyashree.online)

कशी झाली पहिली भेट

कशी झाली पहिली भेट

या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने तिची हिमालय दसानीला कशी भेटली याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी तिने सांगितले की ते दोघेही एकाच शाळेत शिकायचे. शाळेच्या आठवणींना उजाळा देताना भाग्यश्री म्हणाली आम्ही एकत्र शाळेत जायचो. हिमालय दसानी वर्गातील सर्वात खोडकर माणूस होता तो वर्गाचा मॉनिटर होतो. त्यावेळी भाग्यश्री आणि हिमालय दसानी नेहमी भांडायचे. पण काही काळात ते एकमेकांसाठीच बनले आहेत ही गोष्ट त्या दोघांना कळून चुकली. यावेळी त्या दोघांनी सांगितले की आम्ही एकमेकांना कधीच डेट केले नाही. शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला माझ्याबद्दल असणाऱ्या भावना त्याने व्यक्त केल्या.

हेही वाचा :  चीनमध्ये जगातील सर्वात खतरनाक ड्रायव्हिंग टेस्ट, Video पाहून तुम्हीच म्हणाल खरंय...

(वाचा :- Ram Charan Birthday special : 5 वर्षांच्या भयंकर भांडणानंतर अशी सुरु झाली राम चरण-उपासनाची लव्हस्टोरी)​

आठवडाभर आधी तयारी

आठवडाभर आधी तयारी

जवळजवळ आठवडाभर त्याने मला त्याच्या भावना कशा पद्धतीत सांगणार याचा विचार केला.पण तो नेहमी बोलण्यास टाळाटाळ करत होता. त्याला माझे उत्तर माहित होते त्यामुळे आमचे प्रेम खूपच खुलले. आम्ही एकमेकांच्या प्रेमांत अकंठ बुडाले होतो.

(वाचा :- लग्नाआधी म्हणाली तुझे आई बाई माझ्यासाठी देवच, लग्ननंतर पत्नीने सरड्यासारखे रंग बदलले) ​

प्रेमासाठी सोडले राजघर

प्रेमासाठी सोडले राजघर

भाग्यश्रीचे वडील महाराष्ट्रातील सांगलीचे राजे राहिले आहेत. भाग्यश्रीच्या घरच्यांना जेव्हा तिच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा ते तिच्या विरोधात गेले. कुटुंबासाठी दोघांचे ब्रेकअप झाले होते. यावर अभिनेत्रीने सांगितले की आम्ही कॉलेजमध्ये होतो, पण फोनवर कधीच भेटायचो किंवा बोलायचो नाही. पण मला महित होते की त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण आमचे ब्रेकअप झाले आणि तो अमेरिकेत शिकण्यासाठी गेला आणि त्यानंतर ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट साइन केला. पण कुठे तरी भाग्यश्रीला माहित होते की ते दोघे पुन्हा भेटतील. आणि तसे झाले सुद्धा.

हेही वाचा :  गृहिणींनो लगेच मसाला करायला घ्या! मिरचीचे भाव कोसळले; मागील वर्षीच्या तुलनेत दर अर्धापेक्षा कमी

(वाचा :- लग्न करणं खरच महत्त्वाचं आहे का? श्री श्री रविशंकर भन्नाट उत्तर ऐकून अवाक व्हाल)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …