भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई, पुणे, नाशिकचा दौऱ्याला आजपासून सुरूवात झालीये. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीतून आळंदीकडे निघालेत. तर उद्या नवी मुंबईतल्या कामोठेत सकाळी तर, संध्याकाळी मुंबईत दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला ते जातील. 8 फेब्रुवारीला सटाणा आणि 9 फेब्रुवारीला बीडमध्ये त्यांचा दौरा आहे. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे यांनी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे यांचा इशारा
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर (GR) मराठा आरक्षणाबाबतचं आंदोलन जरांगेंनी मागे घेतलं होतं. मात्र सोशल मीडियावरुन जरांगेंविरोधात जोरदार टीका झाली. जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती. त्यावरुन आता जरांगे चांगलेच संतापले आहेत. आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. हा कट रचणाऱ्यांची नावं उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिलाय.

आरक्षण ओबीसीतूनच घेणार
छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) राजीनाम्याचा विषय छेडत जरांगे-पाटलांनी टोला लगावलाय. भुजबळांनी राजीनामा दिलाच नसेल, ते राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार असं आव्हानच जरांगेंनी दिलंय. इतकंच नाही तर भुजबळांनी आता तलाठी बनावं असा सल्लाही जरांगेंनी दिलाय त्याला भुजबळांनी प्रत्यत्तर दिलंय. जरांगेंनी आधी ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी असा सल्ला भुजबळांनी दिलाय. 

हेही वाचा :  Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश
कुणबी प्रमाणपत्र अधिसूचनेविरोधात ओबीसी वेल्फेअर असोशिएअननं दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. ओबीसी वेलफेअर असोशिएअनच्या याचिकेत महाधिवक्त्यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं, यावरुन कोर्टानं फटकारलंय. तुम्ही महाधिवक्त्यांना प्रतिवादी कसे करु शकता असं म्हणत कोर्टानं याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश दिले.. 

ओबीसींच्या नव्या पक्षाची घोषणा
ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी ओबीसींच्या पक्षाची घोषणा केलीय. अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही, त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता असं शेंडगेंनी म्हटलंय. ओबीसी पक्षाचं नाव, त्याची कार्यकारिणी, संघटन, विस्तार याबद्दल लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …

मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?

PM Modi Shared Own Viral Video: लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला …