आता घरीच करा पुदिना लागवड, इतकी सोपी पद्धत की पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही

पुदिन्याचे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे मात्र विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात अंगातील उष्णता कमी करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. पुदिन्याच्या सेवनामुळे अनेक आजार दूर होतात. पुदिना खाल्ल्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर यावरदेखील पुदीना गुणकारी ठरू शकतो. पुदिना चावल्याने तुमचा श्वास कायम ताजा राहातो. हा पुदिना आणायला आता सारखं बाजारात जाण्याची गरज नाही. तर घरीच तुम्ही पुदिन्याचे झाड लावू शकता. एखाद्या लहानशा कुंडीतही तुम्हाला पुदिना लावता येईल. हे १२ महिने फुलणारा झाड आहे. उत्तर भारतात याची लागवड जास्त प्रमाणात होत असली तरीही तुम्ही सहजपणे याची वाढ घरात करू शकता. घरच्या घरी पुदिना कसा लावावा ते जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​४-६ इंचाच्या कंटेनरमध्ये उगवता येईल पुदिना​

​४-६ इंचाच्या कंटेनरमध्ये उगवता येईल पुदिना​

तुम्ही घरच्या घरी कंटेनरमध्ये पुदिन्याचे झाड लाऊन त्याची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला साधारणतः ४-६ इंचाचा रूंद कंटेनर पाहावा लागेल. लक्षात ठेवा पुदिना नेहमी हलक्याशा ओल्या मातीत व्यवस्थित वाढतो. वसंत ऋतुमध्ये पुदिन्याचे झाड अधिक जोमाने वाढते.

हेही वाचा :  33 वर्षं राबलेल्या कर्मचाऱ्याला Microsoft नं वाईट पद्धतीनं कामावरून काढलं; त्याच्या 'त्या' कृतीनं सर्वांनाच रडवलं...

​झाडासाठी योग्य तापमान कोणते?​

​झाडासाठी योग्य तापमान कोणते?​

पुदिन्याचे झाड लावले म्हणजे झाले असं होत नाही. तर झाड लावल्यानंतर त्यासाठी योग्य तापमान आहे की नाही याचीही काळजी घ्यावी लागते. पुदिन्यासाठी साधारणतः १५ ते २५ अंश सेल्सियस इतके तापमान नियमित असण्याची गरज आहे. अशा तापमानात पुदिना चांगला वाढतो.

(वाचा – अशी बनवा आलं-लसूण पेस्ट ६ महिने होणार नाही खराब, बाजारातून आणण्याची पडणार नाही गरज)

​बियांपासून तयार होऊ शकतो पुदिना​

​बियांपासून तयार होऊ शकतो पुदिना​

पुदिन्याची लागवड तुम्ही बियांपासूनही करू शकता. याशिवाय तुम्हाला कलमांचाही वापर करता येऊ शकतो. बी तुम्ही रूजत घातल्यानंतर साधारणतः ७ ते २५ दिवसानंतर त्याला अंकुर फुटू लागतो आणि साधारणतः ४० दिवसानंतर तुम्ही पुदिनाची पाने तोडून घेऊ शकता. वास्तविक पुदिना लागवडीपूर्वी त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते.

(वाचा – Cooking Hacks: हे ५ हॅक्स वापरून घरीच बनवू शकता सॉफ्ट इडली, बॅटर बिघडत असेल तर द्या वेळीच लक्ष)

​४ – ६ तास उन्हाची गरज​

​४ - ६ तास उन्हाची गरज​

पुदिन्याच्या झाडाला किमान ४-६ तास उन्हाची गरज भासते. ६ तासापेक्षा अधिक ऊन मात्र याला देऊ नका. तसंच तळपत्या उन्हात पुदिना ठेऊ नका. याची व्यवस्थित काळजी घ्या. अशाच जागेवर ठेवा जिथे ऊन व्यवस्थित ६ तासापर्यंत येऊ शकते.

हेही वाचा :  सावरकरांच्या नावाने महाराष्ट्रात गोंधळ, उद्धव ठाकरे महाआघाडीतून बाहेर पडणार?

(वाचा – Cooking Hacks: कुकरमध्ये असा शिजवा भात होणार नाही कोरडा, सुटसुटीत आणि मोकळ्या भाताची योग्य पद्धत)

​अशा पद्धतीने काढा पुदिना​

​अशा पद्धतीने काढा पुदिना​

पुदिना लावल्यानंतर साधारण ४० दिवसानंतर योग्य पाने उमलून येतात. त्यानंतर तुम्ही पुदिन्याची पाने वापरू शकता. मात्र ही कोरडी होणार नाहीत याची काळजी घ्या. तसंच पानांना योग्य पोषण मिळत राहील याची काळजी घेत योग्य पाण्याचा वापर करावा.

​महत्त्वाच्या गोष्टी​

​महत्त्वाच्या गोष्टी​
  • पुदिना खराब होत असल्यास, तुम्ही त्याची कुंडीतील माती मोकळी करा. यामुळे पुदिना वाढायला मदत मिळते
  • पुदिन्याला तुम्हाला खत घालायचे असेल तर घरात तयार करण्यात आलेले डाळींचे पाणी, भाजी धुतलेले अथवा तांदूळ धुतलेले पाणी तुम्ही घालू शकता. यामुळे पुदिना चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत मिळते
  • झाड वाढायला लागल्यानंतर काही दिवसांनी त्याची छाटणी करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक कराmaharashtratimes.com​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …