डायबिटीजचा दुश्मन नैसर्गिक इन्सुलिनची ही 5 ड्रिंक, कितीही गोड खा, वाढणार नाही रक्तातील साखर

Diabetes अर्थात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते ज्यामुळे त्याला जास्त तहान लागणे, लघवीला होणे, थकवा येणे, वजन कमी होणे, अंधुक दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. रक्तातील साखरेवर बराच काळ नियंत्रण न राहिल्यास शरीराच्या अनेक भागांना इजा होण्याचा देखील धोका असतो. उन्हाळ्याच्या काळात तर Blood Sugar नियंत्रणात ठेवणे खूप जास्त गरजेचे होऊन बसते. ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स लेव्हल कमी आहे कारण असे पदार्थ वा अशा गोष्टी रक्तातील साखर वाढवत नाहीत.

उन्हाळ्यात आपण भरपूर पाणी पितो आणि इतर द्रव पदार्थांचे सेवन देखील करतो. अशावेळी जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर उन्हाळ्यात साखरयुक्त किंवा कॅलरीयुक्त ड्रिंक्स टाळावीत. मुळ समस्या अशी आहे की उन्हाळ्यात जी पेये उपलब्ध असतात ती गोड असतात. यामुळे तुमच्या रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर, न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा सांगतात की, कोणती उन्हाळ्यातील ड्रिंक्स रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि उष्णतेवर मात करतात.

हेही वाचा :  काय आहे 75 HARD Challenge? ज्यामुळे फुटतोय दरदरून घाम, 95% लोकांनी मानली हार

पाणी प्या

पाणी प्या

रक्तातील साखर नियंत्रणात राहिली नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या सतावू शकते. अशावेळी पुरेसे पाणी प्यायल्याने लघवीद्वारे अतिरिक्त ग्लुकोज बाहेर पडण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे एकाच वेळी उष्णता आणि रक्तातील साखरेवर मात करण्यासाठी भरपूर पाणी प्या.
(वाचा :- हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल व ट्राईग्लिसराईड एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर, खा हे बाराही महिने मिळणारं फळ)​

​लिंबू पाणी

​लिंबू पाणी

उन्हाळ्यात अनेकदा लोक लिंबू पाण्यात साखर घालून पितात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्इ मात्र ही चूक अजिबात चुकूनही करू नका. साखरेऐवजी तुम्ही तुमच्या लिंबू पाण्यात थोडे काळे मीठ घालू शकता. यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल.
(वाचा :- Honey Singh Mental Disease: हनी सिंगला झालेला हा आजार, उपचारासाठी लागले तब्बल 7 डॉक्टर्स, ही होती भयंकर लक्षणं)​

फ्रुट ज्यूसपेक्षा व्हेजिटेबल ज्यूस प्या

फ्रुट ज्यूसपेक्षा व्हेजिटेबल ज्यूस प्या

उन्हाळ्यात फळांचा रस पिणे टाळावे. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. अशावेळी पर्याय म्हणन भाज्यांचा रस पिणे चांगले. भाज्यांचा रस प्यायल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
(वाचा :- सावधान, XBB 1.16 च्या रूपात पुन्हा आला कोरोना,महाराष्ट्र-गुजरातमध्ये 754 लोक आजारी, 9 लक्षणांवर ठेवा बारीक नजर)​

हेही वाचा :  Diabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती

नारळ पाणी आहे फायदेशीर

नारळ पाणी आहे फायदेशीर

नारळ पाणी हे जगातील सर्वात आरोग्यदायी पेयांपैकी एक आहे. हे चवदार तसेच पौष्टिक देखील आहे. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि खूप कमी नैसर्गिक साखर असते. यामध्ये असलेली पोषक तत्वे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
(वाचा :- 24 वर्षीय शिंवागी जोशीला Kidney Infection, दिसली ही 8 लक्षणं, अभिनेत्रीचा हा सल्ला खूप महत्त्वाचा आणि इशा-याचा)​

ताकाचे करा सेवन

ताकाचे करा सेवन

या देसी इंडियन सुपर ड्रिंकचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. ताक हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे जे आतड्यांचे आरोग्य सुधारते. ताक प्यायल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक उत्तम पेय आहे कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स, कमी फॅट्स आणि कमी कॅलरीज असतात.
(वाचा :- Weight Loss Cancer या पद्धतीने वेटलॉस करणं खूप लाभदायक व सुरक्षित, नाहीतर ब्लड सेल्समध्ये कॅन्सर बनवतो लठ्ठपणा)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  रक्तातील साखर व डायबिटीजपासून होईल कायमचा बचाव, फक्त खा या 5 भाज्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …