जास्त मीठ खाताय? तुमचं शरीर देते हे सिग्नल , WHO ने सांगितली लाख मोलाची गोष्ट

WHO salt intake guidelines:जर तुम्ही तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर हे अनेक आजारांचे कारण असू शकते. डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणि विकासासाठी पोषण विभागाचे संचालक डॉ.फ्रान्सिस्को ब्रांका यांनी आपण दिवसभरात किती मीठ खावे याबद्दल माहिती दिली आहे.दिवसात किती मीठ खातोय याचा हिशेब ठेवणारे फार कमी लोक असतात. चला तर मग जाणून घेऊयात रोज नक्की किती मीठ खाणं गरजेचे आहे. (फोटो सौजन्य :- istock)

अनेक आरोग्य समस्या

अनेक आरोग्य समस्या

शरीररात मीठाचे प्रमाणे जास्त झाले तर त्याचा परिणाम इतर अवयवांवर परिणाम होतात. यासाठी WHOच्या आरोग्य आणि विकासासाठी पोषण विभागाचे संचालक डॉ.फ्रान्सिस्को ब्रांका यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मीठाचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.

मीठाचे प्रमाण किती असावे

जास्त मीठ म्हणजे आरोग्याला धोका

जास्त मीठ म्हणजे आरोग्याला धोका

मीठामध्ये मोठ्याप्रमाणात सोडियम आणि पोटॅशियम असते. डब्ल्यूएचओच्या मते, आपण खातो त्या मीठामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, तर पोटॅशियमचे प्रमाण खूप कमी असते. सोडियम जास्त प्रमाणात घेतल्यास लोक रक्तदाबाचे बळी होतात आणि त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका नेहमीच असतो.

हेही वाचा :  विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update

जास्त मीठ खाल्ल्याने देखील शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हाडे वयाच्या आधी कमकुवत होतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे आहारात मीठचे सेवन कमी ठेवावे.

जास्त मिठाचे धोके काय आहेत

जास्त मिठाचे धोके काय आहेत

असे बरेच लोक आहेत ज्यांना जेवणात मीठ घालण्याची सवय असते. असे केल्याने त्यांना जेवणात चव तर येतेच, पण त्यांचे शरीर फुगलेले दिसते. अनेक संशोधनांनुसार, अधिक मीठ खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.

WHO नुसार एका दिवसात किती मीठ खावे

who-

डॉ. ब्रँका यांच्या मते, आपल्यापैकी बहुतेकजण प्रत्येक गोष्टीत जास्त मीठ वापरतात. डब्ल्यूएचओच्या मते, दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे असेल, तर लक्षात ठेवा की तुमच्या प्रत्येक जेवणात फक्त एक छोटा चमचा मीठ असावा. यापेक्षा जास्त सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही.

चिप्सच्या पॅकेटमध्ये मीठ भरले जाते

चिप्सच्या पॅकेटमध्ये मीठ भरले जाते

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही घराबाहेर जे काही पदार्थ खाता, त्यात मीठाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असते. तुम्हाला एका दिवसात खाण्यासाठी आवश्यक असलेले अर्धे मीठ 150 ग्रॅम चिप्सच्या पॅकेटमध्ये मिळते.

हेही वाचा :  आंघोळीसाठी काढून ठेवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

आरोग्य अहवालानुसार, बटाटा चिप्सच्या एका सर्व्हिंगमध्ये 170 मिलीग्राम सोडियम असते. जे शरीराच्या गरजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे पॅकेट फुड शक्यतो टाळाच.

रेडी टू इट फूडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते

रेडी टू इट फूडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते

आज काल अनेक जण रेडी टू इट फूडवर अवलंबून असते. पण डॉ. ब्रँका यांच्या मते या पदार्थांमध्ये 80 टक्के मीठ आढळते. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळा.

प्रोसेस फुड टाळा

प्रोसेस फुड टाळा

आपल्याला सर्वांना महित आहे की मीठाचा वापर केल्याने अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. डॉ. ब्रँका म्हणतात की आपण सर्वजण प्रक्रिया केलेले अन्न जितके टाळू तितके चांगले. यामध्ये मीठाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांना किमान खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

बाजारातील स्नॅक्स खाण्याऐवजी फळे आणि भाज्या खाण्याची सवय लावा. त्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी तर असतेच पण त्याचे सेवन केल्याने शरीरातील आवश्यक खनिजांची कमतरताही पूर्ण होते.

हळूहळू मीठ सेवन कमी करा

हळूहळू मीठ सेवन कमी करा

जर तुम्हाला मीठ खाण्याची सवय असेल तर त्याचे सेवन पूर्णपणे कमी करू नका. डॉ. ब्रॅन्का तुमच्या चवीशी जुळवून घेण्यासाठी तुमचे सेवन हळूहळू कमी करण्याचा सल्ला देतात. ही सवय सोडायला काही आठवडे लागणार असले तरी ते शक्य आहे. याशिवाय तज्ज्ञांनी जेवणात मीठ कमी घालण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा :  घनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …