काळ्या ड्रेसमध्ये दिशा पटानीने फ्लॉन्ट केली फिगर, उर्फी जावेदने डिझाईन केले म्हणत चाहत्याने केले ट्रोल

दिशा पाटनीची फिगर ही नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रींपैकी उत्तम फिगर असणाऱ्यांपैकी दिशा एक आहे. दिशाचा फॅशन सेन्सही उत्तम असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या कथित बॉयफ्रेंडबरोबर काळ्या टाईट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचा हा फॅशन सेन्स यावेळी चाहत्यांना आवडलेला दिसून येत नाही. तिची फॅशन स्टाईल यावेळी मात्र उर्फी जावेदच्या स्टाईलसह चाहत्यांनी तुलना करत ट्रोल केलेली दिसून येत आहे. अनेकांनी तिच्या या फॅशन स्टाईलला उर्फीच्या स्टाईलसह मॅच केले आहे. तसंच तिला ट्रोल करत आता ड्रेसचे डिझाईन्स उर्फी करतेय का असेही म्हटलं आहे.

दिशाचा मोनोकिन कम वनपिस

दिशा नेहमीच बिकिनी अथवा मोनोकिनीमध्ये फोटो शेअर करत असते. दिशाची फिगर ही प्रेरणात्मकच आहे. दिशाने घातलेला हा काळा ड्रेस ना धड वनपिस आहे ना मोनोकिनी. मोनोकिनी कम वनपिस अशी काहीशी स्टाईल दिशाने यावेळी केलेली दिसून येत आहे. या ड्रेसमध्ये तिची फिगर अप्रतिम दिसत असली तरीही तिची ही स्टाईल मात्र यावेळी चाहत्यांना आवडलेली दिसून येत नाहीये.

हेही वाचा :  ​तुमच्या Earphone मध्ये आवाज कमी येतोय? 'या' सोप्या टीप्स करा फॉलो

लेसचा ड्रेस

ट्रान्सपरंट आणि लेस असणारा असा हा टाईट वनपिस नक्की कशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. नक्की याला कोणती फॅशन म्हणायची? अशाही प्रतिक्रिया या स्टाईलवर उमटलेल्या दिसून येत आहे. तसंच या स्टाईलची प्रेरणा फॅशनिस्टा उर्फी जावेदकडून घेण्यात तर आली ना? असेही अनेकांनी दिशाला ट्रोल करत विचारले आहे. बऱ्याच चाहत्यांना दिशाचा हा ड्रेस अजिबातच आवडलेला नसल्याचेही दिसून आले आहे.

(वाचा – अभिनेत्री तन्वी मुंडले ऊर्फ कावेरीचे वेड लावणारे लुक्स, चाहत्यांना केले घायाळ)

कथित बॉयफ्रेंडसह सेल्फी

दिशा सध्या एका फॉरेनरसह नेहमी दिसून येत आहे. हा काळा ड्रेस आणि फिगर फ्लॉन्ट करत दिशाने आपल्या कथित बॉयफ्रेंडसह सेल्फी घेतली आहे. यामध्ये तिने घातलेल्या ड्रेसचा वरचा भाग हा मोनोकिनीप्रमाणे असल्याची फॅशन दिसतेय. तर वरून ट्रान्सपरंट कपडा अटॅच असल्यासारखी फॅशन दिसून येत आहे. ज्यामध्ये हातापासून ते पायापर्यंत साईड कट ऐवजी लेसचा वापर करून शरीराचा भाग दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी कमेंट्स सेक्शनमध्ये हा तर उंदीर आणि झुरळाने कुरतडलेला ड्रेस असेही म्हटलं आहे.

हेही वाचा :  Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

(वाचा – दिवसेंदिवस होतेय अधिक तरूण, मलायकाचे २०२२ मधील सर्वाधिक व्हायरल फोटोज)

ऑफशोल्डरचाही देण्यात आलेला टच

एकाच ड्रेसमध्ये खूप वेगवेगळी फॅशन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या ड्रेसमध्येच ऑफशोल्डर टच देण्यात आला आहे. त्यामुळे नक्की दिशाच्या या काळ्या ड्रेसला कोणते नाव द्यायचे या संभ्रमात चाहते आहेत. मोनोकिनी, ऑफशोल्डर, वनपिस, लेस अशा सगळ्याच फॅशन ट्रेंडचा वापर करून हा ड्रेस तयार करण्यात आल्यामुळे दिशाला नक्की काय झालं आहे असाही प्रश्न चाहते विचारत आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या असाच काहीसा प्रकार या ड्रेसमध्ये दिसून येत आहे.

एकंदरीतच दिशाची ही फॅशन स्टाईल अपयशी ठरल्याचं सोशल मीडियावरील कमेंटवरून दिसून येतंय. दिशाच्या करिअरला काहीच दिशा राहिली नाही, किमान आता फॅशनची दिशा तरी भरकटू नये असंच चाहत्यांना वाटतंय.

(फोटो क्रेडिटः Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …