घनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?

Colombia Forest Rescue : कोलंबियातील अॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, अशी माहिती देण्यात आली होती. शोधमोहीम सुरु होती अन् त्याचा डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून प्रत्येक जण अवाक् झालं. चार मुलं, जी चार भावंडं आहेत. विमान अपघातात त्यांनी आपली आई गमावली. पण या भावंडांनी घनदाट अॅमेझॉन जंगलात यमराजाला चकवा दिला. 40 दिवसांपासून त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर त्यांचा संघर्षाला यश आलं आणि त्यांची जंगलातून सुटका करण्यात आली. 

कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव मोहीमेत या चार भावडांना सुखरुप वाचविण्यात आलं. 1 मे रोजी अॅमेझानमधील सॅन जोस डेल शहरात विमानाचे इंजिन बिघडल्याने दुर्घटना झाली होती. या विमानातून 7 जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत पायलट, मुलांची आई मॅग्डालेनासह तीन जणांना मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह विमानात सापडले मात्र इतर 4 मुलं बेपत्ता होती. त्यांचा शोध सुरु होता. 40 दिवस उलटून गेली आहे आता ही मुलं जिवंत नसणार असंच सगळ्यांना वाटतं होतं. मात्र चमत्कार काय असतो याची प्रचिती आली आहे. 

हेही वाचा :  Maharashtra Kesari : शिवराज राक्षेने मारले 'महाराष्ट्र केसरी'चे मैदान, काकासाहेब पवारांच्या शिरपेचात मानाचा तूरा!

वयाने 13, 14, 9 वर्ष आणि 11 महिन्यांची ही मुलं जंगलात जिवंत सापडली. एवढ्या मोठ्या भूषण विमान अपघातातून ही मुलं वाचली तरी कशी? त्यानंतर 40 दिवस त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. या मुलांसाठी बचाव कार्यात 100 हून अधिक सैनिक आणि स्निफर डॉग सहभागी झाले होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार बचाव कर्मचाऱ्यांनी झुडपे आणि काठ्यांच्या साहाय्याने बनवलेला निवारा पाहिला आणि त्यांना शंका आली. तिथे गेल्यावर त्यांनी ही चार भावंडं दिसली. (colombia plane crash four children found alive in amazon forest even after 40 days google trend news today)

मुलांच्या आजोबांना ही बातमी कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला. कोलंबियाच्या सैन्याने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये घनदाट जंगलाच्या मध्यभागी चार मुलांसह सैनिक दिसत आहेत. 

दरम्यान कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या मुलांबद्दल शनिवारी माहिती दिली. ते म्हणाले की, ”इतक्या भीषण परिस्थितीत 40 दिवस टिकून राहणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यांची कहाणी इतिहासाच्या पानात नोंदवली जाईल.”

या मुलांचा शोध सुरु असताना या मुलांना खायला मिळेल आणि जगता येईल या आशेने लष्कराने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी अन्नाची पाकिटे टाकली. एवढंच नाही तर सैनिकांनी मुलांच्या आजीचा रेकॉर्ड केलेला संदेश वाजवला, ज्यामध्ये तिने त्यांना एकत्र राहण्यास सांगितलं आणि हिंमत न हारण्यास सांगितलं. अखेर या शोध मोहीमेला यश आलं आहे. 

हेही वाचा :  सतत नखं चावताय? हा घ्या रामबाण उपाय या 4 प्रकारे सवय कायमची दूर करा

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …