सलमानची हिरॉईन भाग्यश्रीने शेअर केली सौंदर्य वाढवणारी भाजीची रेसिपी

घनदाट काळे केस, चिरतरूण तारुण्य अशी अभिनेत्री भाग्यश्रीची ओळख. वयाच्या ५३ व्या वर्षी भाग्यश्री खूपच सुंदर दिसते. भाग्यश्री तिच्या सोशल मीडियावर अनेक रेसिपी किंवा ब्युटी टिप्स शेअर करत असते. असाचा एक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी भाग्यश्रीने एका भाजीची रेसिपी शेअर केली आहे. या भाजीचे आरोग्यासोबतच त्वचेला देखील खूप फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ही भाजी. (फोटो सौजन्य :- @bhagyashree.online,istock)

भाग्यश्रीने सांगितले या भाजीचे महत्त्व

भाग्यश्रीने सांगितले या भाजीचे महत्त्व

अभिनेत्री भाग्यश्री नेहमीच तिच्या फिटनेस बाबत विशेष माहितीपूर्ण शेअर करत असतो. यावेळी तिने बिन्स म्हणजेच फरसबीची भाजी खाण्याचे फायदे सांगितले आहेत. तिच्या या पोस्टला इन्स्टाग्रामवर भरपूर लाईक्स आले असून ही भाजी खाण्याचे फायदे कोणते ते पाहूया. या फळभाजीमध्ये मॅग्नेशियमचा मोठा साठा असल्याने याचा फायदा त्वचेला होतो.

(वाचा :- Aloe vera benefits : गुढी पाडव्याला चेहरा सतेज हवा असेल तर बहुगुणी कोरफडचा असा करा वापर) ​

हेही वाचा :  डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही

अशी करा भाजी…

फरसबी खाण्याचे फायदे

फरसबी खाण्याचे फायदे
  • फरसबीमध्ये मोठ्याप्रमाणात मॅग्नेशियम,पोटॅशियम, फायबर असते. यामुळे हृदयाला खूप फायदा होतो.
  • तर फायबरमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
  • फरसबी व्हिटॅमिन ए, सी, केचा उत्तम स्त्रोत आहे. या भाजीमध्ये साखरेचे परिणाम देखील कमी असते. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते.

भाजी रेसिपी

भाजी रेसिपी

साहित्य –
तेल – १ चमचा
जीरे – अर्धा चमचा
ओवा – अर्धा चमचा
तिखट – अर्धा चमचा
धणे पावडर – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
साखर – अर्धा चमचा
फरसबी – पाव किलो
ओलं खोबरं – अर्धी वाटी
हिंग – पाव चमचा
कोथिंबीर – अर्धी वाटी

अशी तयार करा भाजी

अशी तयार करा भाजी
  • सर्वप्रथाम फरसबी धुवून बारीक चिरुन घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरं, ओवा आणि हिंग घालायचं.
  • त्यात फरसबी घालून वरुन धणे पावडर, तिखट, मीठ आणि साखर घालायची.
  • मीठ आणि साखर घातल्यानंतर भाजीला थोडं पाणी सुटतं.
  • कढईवर झाकण ठेवून त्या झाकणावर थोडं पाणी घाला.
  • भाजी शिजली की त्यावर वरुन ओलं खोबरं घाला.
हेही वाचा :  गरोदरपणात मधुमेह झाला असेल तर हे नक्की वाचा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …