फॅट नाही फॅक्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं साजूक तूपचं महत्त्व, करीना कपूरने ही सांगितला तिचा अनुभव

आजकाल डायटच्या नादात आपण आपण तेलकट किंवा तूप असलेल्या गोष्टी टाळतो. पण या साजूक तूपाचा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. यासाठीच बॉलिवूड सेलिब्रिटी न्युट्रिशियन ऋजुता दिवेकरने यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ऋजुता दिवेकर यांच्या मते तूपाचा समावेश सुपरफुडमध्ये केला जातो.

अशात तुमच्या दिवसाची सुरुवात जर तुम्ही एक चमचा तुपाने केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. यासोबतच अभिनेत्री करिना कपूरने देखील तिचा अनुभव सांगितला आहे. तुपामध्ये फॅटचे प्रमाणे जास्त असते ही गोष्ट जरी खरी असली तर तुपाचा योग्य पद्धातीने वापर केल्यास तूप तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही वरदानापेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य : IStock)

​तुपामधील या गुणामुळे त्वचा मुलायम बनते

तुपामध्ये असलेले पोषक घटक तुमची त्वचा मऊ करतात तसेच त्वचेतील वाईट गोष्टी दूर करते. त्यामुळे चेहऱ्यावरही तूप लावले जाते. चेहऱ्यावर तूप लावल्याने डाग, पिंपल्स आणि काळी वर्तुळाच्या समस्येपासून आराम मिळतो.

साजूक तूपात जीवनसत्त्व अ, ड, ई आणि केने समृद्ध असते. त्याच प्रमाणे तूपामध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील प्रचंड प्रमाणात आढळतात. ओमेगा 3 चा त्वचेला आणि केसांना प्रचंड फायदा होतो. पण चेहऱ्यावर तूप लावण्याची योग्य पद्धत अनेकांना माहिती नसते. (वाचा :- ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीने सांगितला तो अनुभव कॉलेजच्या दिवसांमध्ये कॉपी केली होती अ‍ॅक्टर सुर्याची हेअरस्टाईल )

हेही वाचा :  प्रेग्नेंसीमध्ये बाळासोबतच घ्या सौंदर्यची काळजी, या 10 सौंदर्य टिप्स फॉलो करुन मिळवा निखळ त्वचा

​काय म्हणाल्या ऋजुता दिवेकर

आपली आजी लहानपणी आपल्याला साजूक तूप द्याची यामागे काही कारणे होती. तूपामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होते. आपण अधुनिक गोष्टींचा अवलंब तर करायलाच हवा पण त्याच बरोबर आपण आपल्या पारंपारिक गोष्टींना विसरुन चालणार नाही. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

तूपाचा असा करा वापर

​करिनाचा अनुभव

सर्वांचा लाडकी बेबोची त्वचा सर्वांनाच खूप आवडते पण यामध्ये काही घरगुती उपाय आहेत. करिना म्हणतेय की लहानपणी आजी तूपाचे महत्त्व सांगायची त्यावरून तुप आपल्या आयुष्यात किती म्हत्त्वाचे आहे हे समजून येतं. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

​चेहऱ्यावर तूप कसे लावता येईल?

मनात कोणताही संकोच न ठेवता आणि दुष्परिणामांची काळजी न करता तूप वापरू शकता. यासाठी तळहातात थोडे तूप घेऊन चेहऱ्याला चांगले चोळा. यामुळे त्वचा चमकदार होईल. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली तूप लावल्याने डार्क सर्कलची समस्या दूर होते. बोटांमध्ये घेऊन मुरुमांवरही तूप लावता येते. (वाचा :- त्वचेच्या आरोग्यासाठी आणि घनदाट केसांची काळजी घेण्यासाठी 4 गोष्टींनी बनलेले हे डिटॉक्स ड्रिंक नक्की ट्राय करा)

हेही वाचा :  Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके

​तूपचा फेस पॅक

  • तूपापासून जर तुम्हाला फेस पॅक बनवायचा असेल तर बेसन, केशर आणि हळद मिसळूनही तूपचा वापर करता येईल. चेहऱ्यावरील सुरकुत्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तुपात केशर मिसळून चेहऱ्यावर लावा. एक ते दीड चमचा तूप घेऊन त्यात ३-४ केशराच्या कड्या मिक्स करा. काही वेळ बाजूला ठेवून नंतर 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि चेहरा धुतल्यानंतर सूती आणि मऊ कापडाने चेहरा पुसून टाका.
  • चेहऱ्यावरील दागांसाठी 2 चमचे तुपात एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि 4 थेंब लिंबाचा रस मिसळा. हा फेस पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
  • त्याचबरोबर टॅनिंग आणि डाग दूर करण्यासाठी तूप आणि हळदीचा फेस पॅक लावला जाऊ शकतो. यासाठी प्रथम एका भांड्यात अर्धा चमचा हळद दोन ते चार चमचे तुपात मिसळा आणि हे मिश्रण चांगले मिसळा आणि १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. तुमचा चेहरा नक्कीच उजळेल. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

​तूप लावण्याचे फायदे

  • तूपाचा तुमच्या त्वचेवर चमत्कारिक प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत सर्व वयोगटातील लोकांनी चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तूप लावावे. स्वतःमध्ये अनेक जीवनसत्त्वे असलेले तूप सुरकुत्या कमी करण्यात प्रभावी ठरते, कारण ते वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत.
  • कोरड्या त्वचेला ओलावा देण्यासाठी यापेक्षा चांगले औषध नाही. याउलट चेहऱ्यावर खाज येत असेल तर तिथे थोडे शुद्ध तूप लावू शकता.
  • ओठांवर तूप लावल्यास ते कापून फाटण्याची समस्या दूर होते. त्याचबरोबर डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रोज रात्री तूप लावू शकता.
  • साजूक तूप चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्ससाठी देखील खूप प्रभावी आहे. (वाचा :- Hair Loss : पुरुषांच्या 6 गंभीर चुकांमुळे केस गळतात, कमी वयातच पडते टक्कल )
हेही वाचा :  Skin Care Tips: हळदीचा 'हा' फेसपॅक चेहर्‍यावर लावा आणि मिळवा सुंदर त्वचा, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत व त्याचे फायदे| Apply this face pack of turmeric on your face and get beautiful skin know the method of preparation and its benefits

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …