कियारासारखी त्वचा हवी असेल तर करा तुपाने रोज त्वचेवर मसाज, चमकदार आणि तुकतुकीत होईल त्वचा

चांगली त्वचा कोणाला आवडत नाही? कियारा अडवाणी ही अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच. पण तिच्या त्वचेबाबतही नेहमी चर्चा होत असते. कियारा अडवाणीसारखी त्वचा हवी असेल तर तुम्ही तुपाचा वापर त्वचेसाठी करून घ्या. तुपामध्ये विटामिन ए, डी, ई आणि के तसंच ओमेगा-३ फॅटी एसिड्ससारखे महत्त्वाचे घटक आढळतात. तुपामुळे आपल्या अन्नाचा स्वाद ज्याप्रमाणे वाढतो, तसाच तुमच्या त्वचेच्या काळजीसाठीही तूप उपयुक्त आहे. कियारासारखी त्वचा मिळविण्यासाठी तुपाचा वापर कसा करावा हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत.

त्वचेला तूप लावावे नियमित

तुपाचे आरोग्यदायी फायदे आहेत, तसेच त्वचेसाठीही याचे अनेक फायदे मिळतात. तुपामुळे तुमच्या त्वचेमधून अशुद्ध गोष्टी बाहेर येण्यास, त्वचेतील घाण बाहेर येण्यास मदत मिळते. त्यामुळे त्वचेवर असणारे डाग, पिंपल्स अर्थात मुरूमं आणि डोळ्याखालील काळ्या वर्तुळांसारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. तसंच तुपाचा नियमित वापर केल्याने कोमल आणि चमकदार त्वचाही मिळते. तुकतुकीत त्वचा हवी असेल तर तुम्ही नक्कीच तुपाचा उपयोग त्वचेवर करून पाहावा. चेहऱ्यावर तूप कसे लावावे ते जाणून घ्या.

हेही वाचा :  अज्ञात जिवाणुमुळे बटाटा पिकाची नासाडी; शास्त्रज्ञदेखील धास्तावले

हळद आणि तूप

हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स गुण आढळतात. तसंच त्वचा उजविण्यासाठी हळदीचा नेहमीच उपयोग केला जातो. हे दोन्ही घटक नैसर्गिक असल्याने त्वचेवर याचा उपयोग करून घेता येतो.

  • सर्वात पहिले एका बाऊलमध्ये आवश्यकतेनुसार एक चमचा तूप घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद पावडर मिसळून घ्या
  • त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा
  • साधारण १०-१५ मिनिट्स हे तसंच राहू द्या
  • त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा आणि तूप जाण्यासाठी सॉफ्ट फेसवॉशचा वापर करावा

यामुळे त्वचेवरील आलेले टॅनिंग आणि काळे डाग दूर होण्यास मदत मिळते. तसंच चेहऱ्यावर उजळपणा अधिक येतो.

बेसन आणि तूप

बेसन हादेखील असा घटक आहे, जो त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. केवळ बेसन चेहऱ्याला लावल्यानेदेखील त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.

  • एका बाऊलमध्ये २ चमचे तूप, एक चमचा बेसन, चिमूटभर हळद पावड आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून पेस्ट करून घ्या
  • हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावा
  • साधारण १५ मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहरा धुवा

या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन अथवा सुरकुत्या असतील तर दूर होण्यास मदत मिळते. सर्व नैसर्गिक घटक असल्यामुळे याचा दुष्परिणाम चेहऱ्यावर होत नाही.

(वाचा – आंघोळीच्या पाण्यात मिसळा हा घरगुती पदार्थ, मिळेल तुकतुकीत त्वचा आणि होईल मॉईस्चराईज)

हेही वाचा :  Bhool Bhulaiyaa 2 : तब्बूने 'भूल भुलैया 2' सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

केशर आणि तूप

केशर अत्यंत महाग असते हे खरे असले तरीही त्वचेसाठी याचा अत्यंत चांगला उपयोग होतो. केशर आणि तुपाचे समीकरण अधिक फायदेशीर ठरते.

  • एका बाऊलमध्ये एक ते दीड चमचा तूप घ्या आणि त्यात ३-४ केशरच्या काड्या मिक्स करा
  • त्यानंतर काही वेळ तसंच ठेवा आणि मग चेहऱ्यावर हे मिश्रण लावा
  • साधारण २० मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहरा धुवा

तुपामध्ये अँटी-एजिंग गुण असून सदर फेसपॅकमुळे तारूण्य टिकून राहण्यास मदत मिळते. तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत आणि तुमची त्वचा अधिक चमकदार दिसते.

(वाचा – Kiara Advani : कियाराचे ‘ब्युटी सिक्रेट’ स्वयंपाकघरात ! पार्लर नको घरातच करा हा रामबाण उपाय)

साधे तूप

आपल्या हातावर थोडेसे तूप घ्या आणि चेहऱ्याला लावा आणि मग हलक्या हाताने मसाज करा. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली तूप लावून मसाज केल्यास, डोळ्याखालील काळी वर्तुळं निघण्यास मदत मिळते. तसंच तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत मिळते.

(वाचा – कियारा अडवाणी चेहऱ्यावर लावते स्वयंपाक घरातील ही स्वस्त गोष्ट, शेअर केले मॉम सिक्रेट)

त्वचेवर तूप लावण्याचे फायदे

Benefits Of Applying Ghee On Face: चेहऱ्यावर तूप लावल्याने नैसर्गिक चमक येते आणि यातील अँटी-एजिंग गुणांमुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्याही येत नाहीत.

  • चेहऱ्यावर नियमित तूप लावल्यामुळे खाजेची समस्या उद्भवत नाही
  • हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्यास, तुपाच्या वापराने त्वचेमध्ये कोमलपणा राहतो
  • चेहऱ्यावरील मुरूमं आणि काळी वर्तुळं घालविण्यासाठी उपयुक्त
  • फुटलेल्या ओठांवर रामबाण उपाय
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या काढून टाकण्यास फायदेशीर
हेही वाचा :  चकाकत्या बॅकलेस ड्रेसमधील कतरिनाच्या ग्लॅमरस एंट्रीवर लोक घायाळ

तुपाचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच याचे महत्त्वही कळले असेल. कियारासारखी त्वचा मिळवायला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तर घरातील तुपाचा वापर करूनही तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता.

(फोटो क्रेडिटः Freepik.com, Canva)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …